Maharashtra Breaking News LIVE Updates: मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 34 जणांना 10 लाख, मृतांच्या कुटुंबियांना मिळणार शासकीय नोकरी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 11 Dec 2021 06:38 PM
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 34 जणांना 10 लाख, मृतांच्या कुटुंबियांना मिळणार शासकीय नोकरी

मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 34 जणांना 10 लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बरोबरच मृतांच्या कुटुंबात शैक्षणिक पात्रते नुसार एक तर MSRTC किंवा ते  उच्च शिक्षित असतील तर वेगळ्या मार्गानं त्यांना नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नोकरी देण्याच्या कारवाई लवकरच केली जात आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा धुळे आगाराला बसला फटका, सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा धुळे आगाराला बसला फटका, सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान

नांदेड: अमली पदार्थ प्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या आरोपीचा नांदेड येथील कारागृहात मृत्यू

नांदेड येथील गांजा प्रकरणात 18 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी सुनावलेला व नांदेड येथील कारागृहात असणारा आरोपी जितेंद्रसिंग परगणसिंग भुल्लर यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मयत झाला असल्याची प्राथमिक माहिती कारागृह प्रशासनाने दिली. 

महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले; भाजप नेते बावनकुळे यांची टीका

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण गेले आहे. हे सरकार खोटं बोलून वेळकाढूपणा करत आहे. 9 महिन्यापुर्वीच काम सुरू केलं असतं तर आज इम्पेरिकल डेटा तयार झाला असता  असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. 

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र; उरणमध्ये शिवसेनेचा मोर्चा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठविलेल्या धमकीच्या पत्राविरोधात उरणमध्ये शिवसेनेने मोर्चा  काढून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी उरण पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.  

नागपूर: नाना पटोले ह्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा: बावनकुळे

नाना पटोले ह्यांना दोन मंत्र्यांमुळे नामुष्की ओढवली असल्याचे सांगत त्यांनी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले 

नाशिक: मालेगाव पोलिसांकडून एमआयएम कार्यकर्ते ताब्यात, तिरंगा रॅलीसाठी मुंबईत जाण्याचा प्रयत्न

तिरंगा रॅलीसाठी मालेगाव आणि धुळ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण: सीबीआयकडून सात पोलिसांचा जबाब

सीबीआयने नोंदवला सात पोलिसांचा जबाब; अनिल देशमुख गृहमंत्री असताना शासकीय बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची सीबीआयकडून चौकशी

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण: सीबीआयकडून सात पोलिसांचा जबाब

सीबीआयने नोंदवला सात पोलिसांचा जबाब; अनिल देशमुख गृहमंत्री असताना शासकीय बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची सीबीआयकडून चौकशी

नाशिक: तमाशा कलावंतांचा आत्मदहनाचा इशारा

15 डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा तमाशा कलावंतांनी दिला. राज्य सरकारने लोककला, तमाशा सादरीकरणाला परवानगी दिली. मात्र,  ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे.

कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थांना तशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही- गृहमंत्री वळसे पाटील

पोलिसांनी मुंबईच्या संपूर्ण परिसरात कोणतीही रॅली किंवा सभा घेण्यासाठी बंदी घातली आहे, तसा आदेश काढलेला आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थांना तशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही..मुंबई पोलिसांनी जे आदेश काढले आहेत तोच अंतिम आहे असं समजायचं- गृहमंत्री वळसे पाटील

औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघालेली एमआयएमची रॅली अहमदनगर सीमेवरच पोलिसांनी अडवली, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या

औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघालेली एमआयएमची रॅली अहमदनगर सीमेवरच पोलिसांनी अडवलीय. त्यामुळं एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.... 

मुंबईकडे गाड्यांचा ताफा घेऊन निघालेल्या खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद-अहमदनगर सीमेवर पोलिसांनी रोखलं






 #BREAKING : मुंबईकडे गाड्यांचा ताफा घेऊन निघालेल्या खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद-अहमदनगर सीमेवर पोलिसांनी रोखलं, सरकार दबाव टाकत असल्याचा जलील यांचा आरोप






पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...



1.धारावीसह मुंबईत ओमायक्रॉनचे तीन, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी चार रुग्णांची नोंद, राज्यातल्या 17 रुग्णांसह देशातला आकडा 32 वर


2. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएमची रॅली मुंबईच्या दिशेनं रवाना, मुस्लिम आरक्षणासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर हल्लाबोल


3. परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी BMCकडून मोफत विलगीकरण व्यवस्था; पंचतारांकित हॉटेलचे दर जाहीर


4. नाशिकला आयटी हबचं रूप देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विशेष कंपनी स्थापन करणार, केंद्राच्या मंजुरीमुळं महापालिकेच्या कामाला वेग


5.सरकारी पाहुणे येणार आहेत, गांधी गोऱ्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढणार; नवाब मलिकांच्या ट्वीटने चर्चांना उधाण


6. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर आज नो व्हेईकल डे, वाहनांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा उपक्रम


7. एसटीच्या संपामुळं विद्यार्थिनीची शाळा गाठण्यासाठी घोडेस्वारी, बीडच्या माधवी कांगणेची जिल्ह्यात जोरदार चर्चा


8. एसबीआय बँकेची सर्व ऑनलाईन सेवा 12 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत बंद राहणार, आयटी सेवा सुधारण्यासाठी काही काळ सेवा बंद करणार


9.बालकांमध्ये ऑनलाईन खेळांचं व्यसन वाढलं, केंद्राकडून पालक, शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 


10. बीसीसीआयमधील काही लोकांची मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू नये अशी इच्छा, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा आरोप


 


परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी BMCकडून मोफत विलगीकरण व्यवस्था; पंचतारांकित हॉटेलचे दर जाहीर


BMC on Omicron : ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भायखळा येथे मोफत व्यवस्था करण्यात आली असून ज्यांना तारांकित हॉटेलचा पर्याय निवडायचा आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने दरपत्रकही जाहीर केले आहेत. मुंबई महापालिकेने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मुंबईत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून संसर्ग फैलावू नये याचीही काळजी घेतली जात आहे. संसर्गाची उच्च जोखीम असलेल्या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता आहे. या प्रवाशांसाठी पालिकेने व्यवस्था केली आहे. 



मुलांमध्ये ऑनलाईन खेळांचं व्यसन वाढलं, केंद्राकडून पालक, शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 
Online Gaming Advisory: कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून शाळा बंद असल्यानं मुलं घरात कोंडली गेली. घरात बसून मोबाईलचा अतिवापर वाढल्यानं मुलांना त्याची सवय लागली आहे. मोबाईलवर गेम खेळण्याचं मुलांना व्यसनच जडलं आहे. हे वाढतं प्रमाण चिंताजनक असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळं केंद्राच्या शिक्षण मंत्रालयानं 'ऑनलाइन गेम' सुरक्षित करण्यासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  केंद्राकडून पालक, शिक्षकांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.यात आईवडिल आणि शिक्षकांना काही 'काय करावं आणि काय नाही' याबाबत सल्ले देण्यात आले आहेत. यात म्हटलं आहे की, आईवडिलांच्या अनुमतीशिवाय अशा ऑनलाईन गेम्स खरेदी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ऑनलाईन गेम्सची  सदस्यता घेण्यासाठी अॅपवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड रजिस्ट्रेशन करु नये. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.