Maharashtra Breaking News LIVE Updates: शिर्डी शहरातील दुकानाला आग, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 10 Dec 2021 11:58 PM
शिर्डी शहरातील दुकानाला आग, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू

शिर्डी शहरातील दुकानाला आग लागली आहे. रिंग रोड जवळ असणाऱ्या ओम साई ट्रेडिंग या दुकानाला आग लागली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

लातूर  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार, दिनांक 11 डिसेंबर, 2021 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील. शनिवार, दिनांक 11 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8-30 वाजता पुणे येथून विमानाने लातूरकडे प्रयाण  9-00 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने 9-15 वाजता सर्किट हाऊस लातूर येथे आगमन व राखीव. 9-50 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूरकडे प्रयाण. 10-00 जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व कोविड -19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजनांचा आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 11-50 वाजता मोटारीने औसाकडे प्रयाण. 12-30 वाजता औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या निवासस्थान. “जुलेखा विला”, तुळजापूर हायवे रोड, औसा जि. लातूर येथे आगमन  व राखीव. 1-20 वाजता मोटारीने औसा नगर परिषद सभागृह मैदान, तहसील शेजारी, औसा कडे प्रयाण 1-30 वाजता औसा नगर परिषद अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन / भुमिपूजन. 3-30 वाजता मोटारीने लातूर विमानतळाकडे प्रयाण. 4-15 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन व 4-30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. 

Omicron In Maharashtra: ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, महाराष्ट्रात आणखी सात नव्या रुग्णांची नोद

महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय. राज्यात आज ओमायक्रॉनचे सात नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईचे तीन तर, पिंपरी चिंचवड येथील चार रुग्ण आहेत. 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला पाच कोटी रुपयांचा निधी वितरीत

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला  पाच कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणला स्थगीती दिल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी ही मागासवर्ग आयोगाच्या पदाधिकारी यांनी निधी संदर्भात नाराजी व्यक्त  केली होती 

धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव

धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला  आहे. पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

इयत्ता पहली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यास 15 डिसेंबरपर्यंत स्थगिती, नागपूर महापालिकेचा निर्णय

 इयत्ता पहली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यास 15 डिसेंबर पर्यंत स्थगिती. नागपूर मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांचे निर्देश. राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागपूर शहरातील शाळा 10 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता... 


आज 10 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक घेऊन शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे... 


15 डिसेंबर रोजी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढचा निर्णय केला जाणार आहे...


 

पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला तर पिंपरी-चिंचवड मधील सहापैकी चार ओमायक्रॉन रुग्ण बरे

पुण्यातील ऑमिक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला.  तर पिंपरी-चिंचवड मधील सहा पैकी चार ऑमिक्रॉनचे रुग्ण बरे झाले 

पिंपरी चिंचवडमधील सहापैकी चार ओमायक्रॉन रुग्ण निगेटिव्ह, दोघांचा अहवाल प्रतीक्षेत

पिंपरी चिंचवडमधील सहापैकी चार ओमायक्रॉन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात चौकशीची मागणी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात चौकशीची मागणी


चित्रपट निर्मिती देखरेख समितीचे सदस्य पंढरीनाथ सावंत यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून  केली चौकशीची मागणी


या चित्रपटाची गुणवत्ता,  फाईल चोरीला जाणे , चित्रपटाचे हक्क विकणे या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी


या चित्रपट निर्मिती मधील वास्तव एबीपी माझाने आणलं होतं समोर


ज्यांना महात्मा फुले यांच्या संदर्भात काहीच माहिती नाही अश्या परराज्यातील कंपनीला कंत्राट दिल्यावरून आक्षेप


या चित्रपट संदर्भातील महत्वाची फाईल गहाळ कोणी व कशी केली याच्या ही चौकशी करण्याची मागणी

वांद्रे शासकीय वसाहतीत पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांची रेड, अनेक सदनिकांमध्ये अनधिकृत रहिवासी वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर

वांद्रे शासकीय वसाहतीत पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांची रेड, अनेक सदनिकांमध्ये अनधिकृत रहिवासी वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर. अनेक अनधिकृत घुसखोरांना घेतले ताब्यात. वांद्रे येथील कला नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. 


या शासकीय वसाहतीत चतुर्थ श्रेणी पासून क्लास वन अधिकारी राहतात.मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी शासकीय वसाहत म्हणून वांद्रे शासकीय वसाहतीची ओळख

अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, पीएमएलए लवादाचे मालमत्तेच्या जप्तीसंदर्भात अंतिम आदेश येईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका - हायकोर्ट

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची सोशल मीडियाविरोधात कोर्टात याचिका

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची सोशल मीडियाविरोधात कोर्टात याचिका


फेसबुक, ट्विटर आणि गुगलवरील वानखेडेंबाबतचा आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याची मागणी


दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी 17 डिसेंबरला होणार

आशिष शेलार-किशोरी पेडणेकर वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र

आशिष शेलार-किशोरी पेडणेकर वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी


पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ


थोड्याच वेळात महापौर पोलिसांत तक्रार देणार


या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे...


माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे...


गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी


 महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुस-यांदा धमकी

अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण, जामीन मिळूनही आरोपी नरेश गौरची जेलमधून सुटका लांबली

अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण, जामीन मिळूनही आरोपी नरेश गौरची जेलमधून सुटका लांबली


नरेश गौरच्या जामीनाला विरोध करत एनआयएनं हायकोर्टात दाखल केलेलं खंडपीठानं स्विकारलं


बुधवारी हायकोर्ट एनआयएच्या अपीलावर घेणार सुनावणी


मुंबई सत्र न्यायालयातील आजची जामीनाची प्रक्रिया थांबवण्यास याचिकाकर्त्यांची सहमती

कोल्हापूर- दोन दिवस उपनगरात फिरणारा गवा आता शहरात घुसला

कोल्हापूर- दोन दिवस उपनगरात फिरणारा गवा आता शहरात घुसला


पंचगंगा नदीशेजारी जामदार क्लबजवळ गव्याचं दर्शन


वनविभाग, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन घटनास्थळी


गव्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने हाकलून देण्यासाठी प्रयत्न

राज्य सरकार विरोधात भाजपचा आक्रोश मोर्चा

राज्य सरकार विरोधात भाजपचा आक्रोश मोर्चा, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली निघणार मोर्चा, ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगिती, राज्य सरकारचा  दोन वर्षांचा कारभार,नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा

इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नाशिक- इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी कोरोनाबधित आढळल्यानं खळबळ, बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केलं दाखल


विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर, प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट सामना!


Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला (Akola) बुलढाणा (Buldhana)-वाशिम (Vashim) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे. 


Omicron Variant : दिलासादायक बातमी! राजस्थानमधील सर्व 9 ओमायक्रॉन बाधित निगेटिव्ह

Omicron Variant : राजस्थानतील (Rajsthan) जयपूर (Jaipur) मध्ये कोरोना (Corona) च्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) नवीन प्रकारातील सर्व 9 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस (RUHS) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये (Quarantine) राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. देशात 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन' या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमाक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.''



पंकजाताईंचा संकल्प ठरला! 12 डिसेंबरला राबवणार 'हा' उपक्रम, व्हिडीओ केला शेअर  

  
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) या दरवर्षी गोपीनाथ मुंडे (gopinath munde birth anniversary) यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे. दरवर्षी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर  वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. मात्र यावर्षी मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.