Maharashtra Breaking News LIVE Updates: मराठीवर अन्याय का? राज्याचे मंत्री सुभाष देसाईंचा सवाल

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 02 Dec 2021 07:05 PM
मराठीवर अन्याय का? राज्याचे मंत्री सुभाष देसाईंचा सवाल

मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळावा याची अजूनही प्रतिक्षा असून मराठी वर अन्याय का? असा प्रश्न मराठी राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित केलाय. कुसुमाग्रज नगरी अर्थातच 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सुभाष देसाई यांनी आज सायंकाळी पाहणी करत अभिजात मराठी दालनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच निलंबन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच अखेर निलंबन करण्यात आलं आहे. खंडणी, अॅट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने परमबीर यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे शिष्टमंडळ केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेणार

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे शिष्टमंडळ 8 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे.  वित्त आयोग, पंतप्रधान घरकुल योजना यासह सर्व प्रश्नांबाबतीतल्या अडचणी ग्रामविकास मंत्र्यांसमोर मांडणार आहे.

वरळी बीडीडी चाळ सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर भाजप आक्रमक,आरोग्य समितीवर असलेले भाजपचे सर्व 10 सदस्य राजीनामा देणार

वरळी बीडीडी चाळ सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर भाजप आक्रमक, मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीवर असलेले भाजपचे सर्व 10 सदस्य राजीनामा देणार


- नायरमध्ये उपचारादरम्यान आगीत होरपळलेल्या मुलाचा मृत्यूचा निषेध म्हणून आजच राजीनामा देणार
- उपचार वेळेत मिळाले नसल्याने मृत्यू झाल्याचा भाजपाचा आरोप
- याप्रकरणी भाजपच्या शिस्तमंडळाने  नायरच डीन डॉ. आर. एन. भारमल यांची भेट घेऊन व्यक्त केला निषेध
- सुरुवातीचे 45 मिनिटं या रुग्णांकडे कोणीही लक्ष दिलं नसल्याची डीन यांची कबुली

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती


शरद पवार- ममता बॅनर्जी भेटीवर बोलण टाळलं

शक्ती कायदा संदर्भात आज विधान भवनात होणार बैठक, हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक येणार

शक्ती कायदा संदर्भात आज विधान भवनात होणार बैठक, हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक येणार,  कायद्यासंदर्भात आज होणार शेवटची बैठक

इस्लामपूरमध्ये आज बंदची हाक, मुख्याधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ बंद
इस्लामपूरमध्ये आज बंदची हाक, मुख्याधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ बंद

 

इस्लामपूर शहरातील भुयारी गटारची कामे सुरु करण्यावरून नगरपालिकेच्या सभेत दोन्ही गटांच्या नगरसेवकांत राडा झाला होता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ  इस्लामपूरमध्ये आज विकास आघाडी, शिवसेना, मनसेकडूनबंदची हाक  देण्यात आलीय. मुख्याधिकारी कामे सुरु करीत नसल्याचा आरोप विकास आघाडी, शिवसेना यांचा आहे. त्यामुळे काल झालेल्या सभागृहातच सत्ताधारी व विरोधी राष्ट्रवादी नगरसेवकांत हमरी-तुमरी, धक्काबुक्की झाल्याने राडा झाला. तर मुख्याधिकारी दालनासमोर येवून विकास आघाडीच्या नगरसेवकांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलीस व नगरसेवकांत राडा झाला. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. अखेर पोलीसांनी विकास आघाडी व शिवसेनेच्या सहा नगरसेवकांना ताब्यात घेतले होते.  
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू


व्हायब्रंट गुजरातसाठी महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरात सरकारची हाक


कोटक बॅंकचे संचालक उदय कोटक यांची घेतली भेट


गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याबद्दल झाली चर्चा


तसेच टाटा सन्सचे चेअरमन नटराज चंद्रशेखर यांची भेट घेतली


स्टेच्यू ॲाफ युनिटी येथे पंचतारांकीत हॅाटेल उभ करण्याबाबत चर्चा झाली

हिंगोली जिल्ह्यातील गुंडा गावाच्या शिवरामध्ये हळदीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड





हिंगोली जिल्ह्यातील गुंडा गावाच्या शिवरामध्ये हळदीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती हट्टा पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी सापळा रचत काल कारवाई केली. या कार्यवाहीमध्ये हळदीच्या शेतात 143 गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. जवळपास 7 लाख 80 हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आता हट्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 

 



 


जालना-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच मुक्काम ठोको आंदोलन

जालना- मोसंबीचा मंजूर फळपीक विमा मिळावा या मागणी साठी जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात कालपासून मुक्काम ठोको आंदोलन सुरुय. जालना जिल्ह्यात मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये विमा मंजूर झाला आहे. मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला नाही.त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम करत आंदोलन सुरूच ठेवलंय.

पालघर : आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी केळवे पोलिसांच्या ताब्यात

आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी केळवे पोलिसांच्या ताब्यात, पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचे आमिष देऊन लुबाडणूक केल्याप्रकरणी पालघर मधील केळवे पोलीस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल





पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.


१. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी, कांद्यासह फळबागांचं नुकसान, साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक चिंतेत, कोकणात आंबा पीक धोक्यात
Maharashtra Rain Update : Cyclone Jovad : एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता 'जोवाड' चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

२. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, आज-उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज

३. कुणी लढतच नसेल तर आम्ही काय करणार? पवारांसमोरच ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला, काँग्रेस नेत्यांकडूनही जळजळीत प्रतिक्रिया

४. विमान प्रवासाबाबत राज्यानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप, तर 15 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर

५. कोरोना संसर्गापासून वाचवणाऱ्या च्युइंगमचा शोध लागल्याची चर्चा, 95 टक्के कोरोना पार्टिकल तोंडातच ट्रॅप करण्याची क्षमता

६. नोकरभरती पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादेतून एकाला अटक, 31 ऑक्टोबरचा आरोग्य विभागाचा पेपर व्हायरल केल्याचा ठपका

७. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन, जिल्ह्यात शोककळा,  सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध

८. साहित्य सम्मेलनापुढं अडचणींचा 'पाऊस', आधी वाद, मग ओमिक्रॉन आता अवकाळी पावसाचं संकट!

९. मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये उबेर कंपनीकडून एका विद्यार्थ्याला दोन कोटी 5 लाखांचं पॅकेज ऑफर, मुंबई आयआयटीच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वाधिक वार्षिक पॅकेज

१०. उद्यापासून मुंबईच्या वानखेडेवर रंगणार न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी, विराट कोहली परतणार, अंतिम 11 मधून कोण आऊट होणार याकडे लक्ष
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.