Maharashtra Breaking News LIVE Updates : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात एकाला अटक

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 01 Dec 2021 09:55 PM
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात एकाला अटक

आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने औरंगाबादमधून विजय प्रल्हाद मुराडेला अटक केलीय. आरोग्य विभागाच्या 31 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता झालेल्या परीक्षेचा पेपर सकाळी 8.36 वाजताच विजय मुराडेला मिळाला होता.  विजय मुराडेकडून हा पेपर इतरांना फॉरवर्ड करण्यात आला होता. विजय मुराडे हा औरंगाबादमधे तरुणांना वेगवेगळ्या कार्यालयांमधे नोकरी लावून देतो असं सांगून एजंट म्हणून काम करत होता. पोलीसांच्या भितीने औरंगाबादमधील एका हॉटेलमधे लपून बसलेल्या विजय मुराडेला पोलीसांनी सापळा रचून अटक केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आत्मनिर्भर भारतच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर गुजरातचा नारा देत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल महाराष्ट्रात येणार आहे.  मुंबईत एका रोडशोचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.  ममता बॅनर्जी यांच्या जोरदार स्वागतानंतर महाविकास आघाडी गुजरात मुख्यमंत्र्यांचही असच स्वागत करणार का याकडे सर्वांच लक्ष आहे. 

राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. न.चि. अपामार्जने यांचं वृद्धापकाळाने निधन

राष्ट्रीय कीर्तनकार प्रा. न.चि. अपामार्जने यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी कीर्तन क्षेत्रात सेवा दिली. इतकंच नाही तर कीर्तन विद्यालय सुरू करून कीर्तनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत अविरत पणे पोहोचवला. आहे  देशभरात त्यांच्या कीर्तनाचा चाहता वर्ग होता. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मूल आणि एक मुलगी आहे. ते देखील कीर्तनाचा वारसा पुढे नेत आहेत. 

नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर
नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर गेलाय. अवघ्या चारच दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या निर्णयाला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं स्थगिती दिलीय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळं सरकारनं हा निर्णय घेतलाय. नवी तारीख कळेपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे. 

 

महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं- रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं ही मागणी यावेळी त्यांनी अमित शाहांकडे केली
सोबतच उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये भाजपनं आरपीआयला सोबत घ्यावं. किमान 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. राज्यसभेतल्या खासदारांचं निलंबन योग्यच. खरंतर 33 खासदारांचं निलंबन व्हायला हवं होतं, जे गोंधळ घालत होते, पण सरकारनं 12 च खासदारांचं केलं. सलग तीन दिवस सभागृहात गोंधळ घातला की चौथ्या दिवशी थेट वर्षभरासाठी निलंबित असा नियमच बनवायला हवा

शहरी नक्षलवाद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर, मात्र अन्य 8 जणांचा जामीन फेटाळला

शहरी नक्षलवाद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर, मात्र अन्य 8 जणांचा जामीन फेटाळला

नंदूरबार जिल्ह्यातील 1855 प्राथमिक शाळा आजपासून सुरू.....
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा आज श्री गणेशा झालाय. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान होते सकाळीच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली तर शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांचा स्वागताची तयारी करण्यात आली होती विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येत होती त्याच्यासोबत पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत होते जिल्ह्यात 1855 शाळांमध्ये एक लाख 88 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आजपासून दोन वर्षाचा खंडानंतर आपल्या शिक्षणाला सुरुवात करत आहेत एकूणच प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जात आहे शिक्षकांनाही लसी दोघी डोस सक्तीचे करण्यात आले आहे.  
कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली


महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 24 तासानंतर देखील चेकपोस्ट नाही


कालच कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांनी चेक पोस्ट उभा करण्याच्या गेल्या होत्या सूचना 


कोणतीही तपासणी न होता सरसकट वाहनांचा महाराष्ट्रात प्रवेश

शाळांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला किलबिलाट

चंद्रपूर जिल्ह्यात आज तब्बल पावणे 2 वर्षांनंतर प्राथमिक शाळेत पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला आहे. आजपासून जिल्ह्यात कोविड खबरदारी घेत वर्ग 1 ते 4 च्या 2417 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 121226 विद्यार्थी शिकताहेत. प्राथमिक शाळेतील या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा थेट शिक्षणाच्या प्रवाहात आणणे पालका-शिक्षकां पुढे आव्हान असणार आहे. काही शाळांनी शाळा दोन सत्रात राबविण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी अशी व्यवस्था केली आहे. या पुढच्या काळात या सर्व कोविड खबरदारीचे काय परिणाम दिसतील याकडे पालक-शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

एसटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न.

बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी गावातील सतीश वाघमारे या तरुणाची २०१९ मध्ये एसटी महामंडळाने घेतलेल्या दुष्काळग्रस्त भरती मध्ये चालक या पदासाठी प्रशिक्षण पूर्ण झालं होतं पण नियुक्ती न मिळाल्याने व घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या युवकाने मंगळवारी सायंकाळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , त्याने विष घेताना स्वतः मोबाईल कॅमरात व्हिडीओ देखील बनविला .संप काळात आमच्यासारख्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना सेवेत घेण्याची त्याने मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सदर युवकाला अकोला येथील वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार


 

जवळपास पावणेदोन वर्षानंतर शाळांमध्ये लहानग्यांचा किलबिलाट

 

जिल्ह्यात 2 हजार 522 शाळांमध्ये आज वाजणार घंटा

 

जवळपास 46 हजार विद्यार्थी शाळेत लावणार हजेरी
एकवीस महिन्यानंतर जळगावमध्ये आजपासून शाळा भरणार
मागील काळात कोरोना चे पार्शवभूमीवर गेल्या एकवीस महिन्या पासून प्राथमिक शाळा बंद राहिल्या होत्या मात्र कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं दिसून आल्यावर शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णय नुसार आज जळगाव जिल्ह्यात आज प्राथमिक शाळा सुरू होत आहेत आज पहाटे पासूनच शाळा प्रशासन विद्यार्त्यान चया स्वागत साठी  सज्ज असल्याचं दिसून आले आहे एककडे शाळा सुरू होण्याचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मधे दिसून असताना कोरोनचा तिसऱ्या लाटेचा धोका पाहता त्याचा प्रसार होऊ नये या साठी शाळा प्रशासन शासनाच्या नियमनुसर मास्क ,सनी टाई झर,सोशल दिस्टांस सिंग पालन करून विद्यार्त्याना प्रवेश दिला जात आहे. यावेळी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प ,ढोल ताशे आणि मिठाई देऊन केले असल्याचं पाहायला मिळाले आहे.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी ,शिक्षक आणि पालक यांच्या मधे मोठा उत्साह असल्याचं दिसून आले आहे.
धुळे जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरू विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्साह

राज्य सरकारने दिनांक 1 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत, धुळे जिल्ह्यात देखील शाळांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला, शहरी भागात 177 ग्रामीण भागात 1 हजार 370 शाळा सुरु झाल्या. सुरुवातीचे काही दिवस फक्त तीनच तास शाळा सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे तसेच विद्यार्थी आणि पालकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. 

नांदेड जिल्ह्यातील 13 डिसेंबर ला शाळा सुरू होणार
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात येणार होते. नांदेड जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहिम 12 डिसेंबर 2021 पर्यंत राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचा आढावा घेऊन 13 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी याबाबत आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्याचे निर्देश दिले.  

 

जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाची स्थिती व कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट ओ-मायक्रॉनची भिती सर्वत्र निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती पाहता शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्यासाठी उचित होणार नाही. साथरोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन विभाग मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ज्या वर्गाची शाळा सद्यस्थितीत सुरु आहे ती पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील. परंतू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे प्रथम किंवा द्वितीय डोस झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 13 डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या घरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री शालेय प्रशासनाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

 
साहित्य संमेलन पुन्हा वादात! संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच स्थान, भाजपची तीव्र नाराजी

नाशिक : साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता नवं राहिलेलं नाही. नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan देखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. साहित्य संमेलन आता पुन्हा वादात सापडले आहे. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगायला सुरवात झाली आहे. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

आम्हाला सत्तेची भूक नाही - सोमय्या

महाराष्ट्रात कोण सत्तेत आहेत आम्हाला सत्तेची भूक नाही, मात्र राज्यात शरद पवार व ठाकरे सरकार यांनी जी माफियागिरी चालविली आहे , मोठ्या प्रमाणात वसुली चालू आहे, देशात अशी कोणतीही सरकार जन्माला आली नाही की त्यांचे मंत्री जेल मद्धे त्यांचे पोलीस जेल मद्धे आहेत 28 घोटाळेबाज मंत्री चोरी करताना पकडले गेले आहेत आम्हाला फक्त भ्रष्टयाचार मुक्त महाराष्ट्र करायचं आहे अशी तिखट प्रतिक्रिया किरीट सोमया यांनी बुलडाण्यातील चिखली येथे रात्री उशिरा  ते पत्रकार परिषद मद्धे बोलत होते. याच सरकारमधील मंत्र्यानी मागील काळात केलेले घोटाळे काढत आहे आम्ही जर घोटाळे केले असतील तर काढाणा पण आमचे घोटाळेच नाही तर काढणार कुठून, या 23 महिन्यात राज्यात आग लागली आहे सर्वत्र घोटाळेच घोटाळे.. असे अनेक आरोप महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर किरीट सोमया यांनी केले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस


आज जिल्ह्यात हवामान विभागाचा orange अलर्ट


पुढील 3 दिवस जिल्ह्यात हवामान विभागाचा पावसाचा इशारा


मच्छिमार यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

एसटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न.

बुलढाणा जिल्ह्यातील आंबे टाकळी गावातील सतीश वाघमारे या तरुणाची २०१९ मध्ये एसटी महामंडळाने घेतलेल्या दुष्काळग्रस्त भरती मध्ये चालक या पदासाठी प्रशिक्षण पूर्ण झालं होतं पण नियुक्ती न मिळाल्याने व घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या युवकाने काल सायंकाळी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , त्याने विष घेताना स्वतः मोबाईल केमरात व्हिडीओ देखील बनविला .संप काळात आमच्या सारख्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना सेवेत घेण्याची त्याने मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सदर युवकाला अकोला येथील वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

नायजेरियाहून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोघे पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेले दोघे पॉझिटिव्ह आलेले आहेत. सात दिवसांपूर्वी ते शहरात दाखल झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. हे दोघे नायजेरिया हुन थेट मुंबईत आले आणि तिथून पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. सुदैवाने त्यांचा कोणत्याही धोकादायक शहरातून प्रवास झालेला नाही. तरी ही प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांच्या सर्व चाचण्या करण्याचा निर्णय घेतलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates :


सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती
नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.


पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 84 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496772 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 824 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3869 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.


पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आले चार प्रवासी, त्यातील एक प्रवासी पॉझिटिव्ह
पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल  पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.


स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक
कापूस सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक. बुलढाणा शहर पोलोसांनी थोड्या वेळापूर्वी केली अटक. रविकांत तुपकर , त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर व इतर पाच जणांना केली अटक. दुपारी सर्वाना न्यायालयात केले जाणार हजर. अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास जावे लागणार कारागृहात.


या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात - महापौर मुरलीधर मोहोळ
तीन पक्षाच्या राज्य सरकार मध्ये विसंवाद . अजित पवारांचा निर्णय राज्य सरकारने ने बदलला. नाट्यगृह ,सिनेमागृह पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता. मात्र त्याच दिवशी राज्य सरकारने अजित पवारांचा निर्णय डावलून 50 टक्के क्षमता ठेवण्याचा निर्णय घेतला. असं सारखं होतंय ,या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात, शाळा सुरू करण्याबाबत ही संभ्रम, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्या बैठका घेऊन निर्णय घेऊ असं पुण्याची महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.