27 march 2022 Breaking News LIVE Updates : महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
देशात महागाईमुळे जनता बेहाल झालेली आहे...येत्या आठ दिवसात काँग्रेस महागाई विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला महत्व मिळत नाही असे अनेक जण आरडाओरड करीत असतात...महाविकास आघाडी मध्ये आणि देशात काँग्रेस आधीपासून बाप आहे आणि बापच राहणार असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे आणि अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. गेली 2 वर्षे हा दिवस साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला तसेच इथे असलेल्या शिवकालीन तोफांना सार्वजनिक वर्गणी काढून सागवानी तोफगाडे देखील बसवण्यात आले. ज्याचे उदघाटन केले गेले. सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. म्हणून आज ठाणे मुक्ती साजरा करण्यात आला.
ठाण्यातील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून दोघा कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ठाण्याच्या पाचपाखाडी भागात घडली. टाकीत तयार झालेल्या केमिकलच्या वायूने कामगार अक्षरशः तडफडले. या दुर्घटनेत दोन कामगार बचावले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. स्थानिक नौपाडा पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केल्याने दोघा कामगारांचा जीव बचावला. लिफ्ट नसलेली पाच मजली इमारत, गच्चीत २५ फुटांवरील टाकीवर चढून जाण्यासाठी अरुंद शिडी आणि टाकीच्या झाकणावर असलेला उंच मोबाईल टॉवर अशा विविध अडचणींवर मात करत बचाव पथक आणि डॉक्टरांनी दोन कामगारांचा जीव वाचवला
वीज कर्मचारी संपावर जाण्यापूर्वीच राज्य सरकारने मोठं पाऊस उचललं आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारनं मेस्माचं अस्त्र उगारलं आहे. आज मध्यरात्री पासून देशभरातील वीज कर्मचारी संपावर जाणार आहे. केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची घोषणा केली होती. अशातच
तळकोकणात दहा वर्षानंतर बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे या बैलगाडी स्पर्धेत मोठ्या संख्येने शेतकरी या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. केवळ शिवसेनेच्या खासदारांवर बैलगाडी स्पर्धा सुरू झाल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केलं.
नांदेड शहरातील सिडको परिसरातील उस्माननगर रस्त्यावर शाहुनगर पाटीजवळ धावत्या बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळालाय. भर रस्त्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ट्रक चालकाचा जळुन मृत्यू झालाय.सदरची दुर्दैवी घटना काल मध्यरात्री घडलीय. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात (जळीत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान अग्नीशमन विभागाने वेळीच धाव घेतल्याने, आग आटोक्यात आणली व पुढील होणारा अनर्थ टळलाय.तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील उस्माननगर रोडवर बिजली हनुमान मंदिरा समोर व पावर स्टेशन लगत ही घटना घडलीय. नांदेडकडुन उस्माननरकडे जात असलेला ट्रक मध्यरात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास तांदुळ भरून (एम.एच.40 बि.जे9604 ) वरील ठिकाणी आला असता अचानक कबीनने पेट घेतला व पाहता पाहता संपूर्ण ट्रक पेटला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. या घटने दरम्यान ट्रक मधील एका इसमाने प्रसंगावधान पाहून वेळीच ऊडी मारल्याने त्याचा जिव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. तर ट्रक चालक नितीन सटवाजी कांबळे रा.हलदा हा मात्र जण जळुन खाक झाला आहे.
शिवसेना आमदार दिलीप लांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काॅग्रेस नेते नसीम खान सुप्रीम कोर्टात
मागील निवडणुकीत प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते माझ्या मतदार संघात आले होते
या संदर्भात उच्च न्यायालयाने याचीका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी नसीम खान सुप्रीम कोर्टात
प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे माझ्या मतदार संघात आल्याची तक्रार
हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे पक्षाची भुमिका नाही
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Amravati News : अमरावती शहराच्या कठोरा रहाटगाव मार्गावर भीषण अपघात., अपघातात चार जणांचा मृत्यू..
ट्रक आणि तवेरा वाहनात जोरदार धडक...
मृतकांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलीचा समावेश...
आयकर विभागाकडून सुरु असलेल्या यशवंत जाधव यांच्या चौकशीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "डायरीत नेमकी काय नोंद आहे. मी बघितलेली नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहे. त्यासंदर्भात उचित चौकशी करेल." तसेच, बीएमसी च्या माध्यमातून मुंबईकरांना लुटलं जात आहे का? असा प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शंभर टक्के 24 महिन्यात 38 संपत्ती. त्या ही कोविडच्या काळामध्ये. आम्ही आधीच म्हणत होतो की, कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही होत नव्हतं, हे आता स्पष्ट झाले आहे."
Ambernath News : अंबरनाथ : रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू, मयत तरुणाचा वय अंदाजे 30 वर्ष असून ओळख पटली नाही, सकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे ट्रेक ओलांडत असताना झाला अपघात, रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
Sangli Maharashtra News : विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादीकाँग्रेस विरुद्ध भाजप उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने हाय अलर्ट दिला आहे. 2 एप्रिल पर्यंत स्मारक परिसरात संचारबंदी बरोबरच कडेकोट बंदोबस्तासाठी स्मारक परिसरात राज्य राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्या तैनात केल्या गेल्यात. यामुळे स्मारक परिसराला छावणीचे स्वरूप आलेय. शिवाय स्मारकाच्या चारही बाजूनी पत्रे उभे करून स्मारक परिसर बंदिस्त केला गेलाय..
Pune Bhagat singh Koshyari News : अखंड महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत रामदास स्वामी नसते तर शिवाजी ला कोणी विचारलं असतं असे बेताल अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी यासाठी महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र स्वरूपात आंदोलने केलेली आहेत. तरी देखील आजपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागितलेली नाही. राज्यपाल रविवारी 27 मार्च रोजी दुपारी 2 वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे राष्ट्र गौरव पुरस्काराचे वितरण करण्यासाठी येणार आहे. त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चिंचवड येथे काळ्या फिती लावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात येणार आहे असे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
पार्श्वभूमी
मेट्रो 2-ए आणि मेट्रो 7चा पहिला टप्पा 10दिवसांत सेवेत, मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र, पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान आणि सुकर होणार
दिग्विजय सिंह यांच्यासह 6 जणांना एक वर्षासाठी सश्रम कारावास, 11 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; 6 दिवसांतील पाचवी वाढ, पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी कडाडलं
आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. रविवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागलं होतं. तर त्यापूर्वी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 82 तर डिझेल 81 प्रति लिटरने वधारणार आहे
कोरोनामुळं ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्ववत, चीन सोडून 40 देशांच्या विमान कंपन्यांसाठी भारताचं आकाश मोकळं
मुलांनी मन वळवल्यानंतर सिनेसृष्टीला राम राम करण्याचा विचार सोडून दिला, आमीर खानचं वक्तव्य, तर बॉलिवूडमधल्या वर्णभेदावर नवाजुद्दीनचं बोट
परबांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या भाजप नेत्यांच्या अटकेमुळं काल दिवसभर राजकीय नाट्य, उशीरा रात्री पोलिसांकडून सुटका रा
मेंढपाळाच्या हस्ते सांगलीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्याचा पडळकरांचा निर्धार, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटनास तीव्र विरोध
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
रविवारचा मुहूर्त साधत आयपीएलमध्ये डबल धमाका, मुंबई दिल्लीशी भिडणार तर पंजाब किंग आणि आरसीबी आमनेसामने, चेन्नईला पराभूत करुन केकेआरची विजयी सलामी
विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची चांगली सुरुवात, शेफाली वर्मासह स्मृती मानधनाची शानदार खेळी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -