Maharashtra Breaking News 26 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर सुरु असलेल्या ब्लॅाकची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडी पाहून तातडीनं जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, नॅशनल हायवे प्रशासन आणि एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना उद्या सकाळी साडेअकरा वाजता पाहणी करायच्या सूचना दिल्या.
पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाशांनी थेट साताऱ्याला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील फ्लायओव्हरपाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पहाणी करून प्रवाशांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत.
अंधेरी रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये एकूण 18 जण अडकले होते. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश होता. यापैकी 17 जणांना आता सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर गरोदर महिला जखमी झाली आहे. या महिलेला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
भाजपच्या श्रीकांत देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. बलात्काराच्या आरोपांत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. देशमुख हे भाजपचे माजी सोलापूर जिल्हाप्रमुख आहेत. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 12 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली असून तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आज सर्वत्र पोळा सण साजरा होत असतानाच येवला तालुक्यातील कुसूर गावातील तरुण बैल धुण्यास बंधाऱ्यावर गेला असता या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन पोळा सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मधुकर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.
Beed News : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या नागदार पोळा हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्वच बैल सजवले जातात. सजवलेल्या बैलांना वाजतगाजत गावातील महादेवाच्या मंदिरासमोर एकत्र आणले जाते. त्या ठिकाणी बैलांचे सामूहिक पूजन करून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात. गेल्या 12 वर्षांपासून ही परंपरा चालत आली असून बैल स्वत:हून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील लोक हा बैलपोळा बघायला नागदरा या गावी येत असतात.
लाचखोर अधिकारी दिनेश कुमार बागुल यांच्या पुण्यातील निवासस्थानी काल रात्री एसीबीने छापेमारी केली आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील गायत्री विला येथील निवासस्थानी एसीबीकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईत घरातून 45 लाख रुपयांची रोकड, काही कागदपत्रे आणि काही सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती मिळाली आहे.
Hingoli News : आज बैलपोळा बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैल पोळ्याच्या दिवशी शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांसाठी हा सण साजरा केला जातो. आज हिंगोली जिल्ह्यातही हा बैलपोळा साजरा करण्यात आला आहे. प्रत्येक गावात शेतकरी बांधवांनी स्वतःच्या बैलांसोबत हा सण साजरा केला आहे. गावातील देवी देवतेला शेतकऱ्यांनी बैलांसोबत प्रदक्षिणा घालून पुढील वर्षी शेतात चांगले उत्पन्न निघू देत अशी प्रार्थना केली. बैलांना साजशृंगार करून हा बैलपोळा साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी बैलांना पुरणपोळी चारून घरातील मालकीण बाई बैलांचं औक्षण करून बळीराजा प्रती प्रेम व्यक्त केलं जातं.
Beed News : परळी शहरातील मोंढा भागात रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होत असल्याने व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन परळी शहरातील मुख्य बाजारपेठ ऐन पोळ्याच्या दिवशी बंद ठेवली होती. मोंढ्यात येणारा रस्ता भाजीपाला विक्रेत्यांमुळे बंद असून वाहनांची कोंडी होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. याबाबत नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले आहेत. अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढल्याची माहिती मिळाली आहे. छातीत दुखत असल्यामुळे देशमुख यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Nashik CBI Raid : नाशिकमध्ये जीएसटी विभागाचे अध्यक्ष सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिडको कार्यालया मधून चंद्रकांत चव्हाणके यांना अटक करण्यात आली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
Buldhana News : पुण्यातून बिहारच्या बक्सर इथे आपल्या वडिलांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना, रुग्णवाहिकेच्या मागे जात असलेल्या कारला बुलढाणा जिल्ह्यातील डोनगावजवळ समोरुन येणाऱ्या ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. यातील एका जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे इथे नोकरी निमित्त राहत असलेल्या राम वर्मा यांच्या वडिलांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव आपल्या मूळगावी बिहारमधील बक्सर इथे रुग्णवाहिकेने घेऊन जात होते. तर राम वर्मा हे रुग्णवाहिकेच्या मागे आपल्या परिवारासह ऑल्टो कार घेऊन जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात कारमधील चौघे जण जखमी झाले आहेत. सध्या पार्थिव असलेली रुग्णवाहिका थांबवून वर्मा कुटुंबीयांवर मेहकर येथे उपचार सुरु आहेत.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील काम पूर्ण, दोन तासांचा ब्लॉक संपला, मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली
Breaking : लाचखोर दिनेशकुमार बागुलला 28 ऑगस्ट पर्यत न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
टी. राजा यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायलयात मागितली जाणार दाद, टी. राजा यांच्यावर करण्यात आलेली PD अॅक्ट नुसारची कारवाई विरोधात उच्च न्यायलयात दाद मागणार असल्याची माहिती
सोमवारी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची टी. राजा यांचे वकील करुणासागर यांची माहिती
टी. राजा यांच्याविरोधात काल हैदराबाद पोलिसांनी PD ऍक्ट नुसार कारवाई करत घेतलं आहेत ताब्यात
सराईत गुन्हेगार ज्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा गुन्हेगाराविरोधात केली जाते PD अॅक्ट नुसार कारवाई
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक सुरू, ब्लॉक दरम्यान ओव्हरहेड ग्रॅंटी बसविणार, दुपारी दोन पर्यंत काम सुरू राहणार, वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली
Supreme Court Live Stream : भारताचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice NV Ramana) आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाचं (Supreme Court) कामकाजाचं लाईव्ह स्ट्रिमिंग (Live Streamed) केलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2018च्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, औरंगाबाद कोर्टात आरोपपत्र दाखल, तपासात भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे सापडले, राज ठाकरेंविरोधात औरंगाबाद कोर्टात आरोपपत्र दाखल, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी केलं होतं भाषण, राज यांना कोर्टात हजर राहावं लागणार, नोटीस बजावली
शेतकरी नेते पाशा पटेल यांचे द्वितीय चिरंजीव अॅड हसन पाशा पटेल यांचं हृदय विकाराच्या धक्क्याने निधन, काल रात्री निधन झाल्याची कुटुंबीयांची माहिती
हसन पाशा पटेल यांची मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कारकीर्द
Kolhapur News : आयकर विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये छापा
साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन आयकर विभागाकडून केली कसून चौकशी
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा
आयकर विभागाकडून घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती
Income Tax Notice to Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी 814 कोटींच्या संपत्तीवर 420 कोटी रुपयांच्या करचोरीच्या आरोपप्रकरणी आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. अनिल अंबानी यांच्यावर ब्लॅक मनी अॅक्टनुसार आयकर खात्यानं ही नोटिस पाठवली आहे. याबाबत अनिल अंबानी यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
कोल्हापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले, मध्यरात्री जवळपास सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती..
Maratha Reservation Meeting : राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीत सांगितलं. काल रात्री आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर काल रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी
धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच पुण्यतिथी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सकाळ 11 वाजता शक्तीस्थळ येथे उपस्थित राहणार आहेत. सोबत दादा भुसे आणि इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. एका फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी केले जाणार आहे. दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेले खासदार राजन विचारे, अनिता बिर्जे, केदार दिघे देखील शक्तीस्थळवर येणार आहेत.
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा निवृत्त होणार
भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज सेवानिवृत्त होणार आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधिश होणार आहेत.
सोलापुरातील आयकर विभागाची कारवाई सुरुच
सोलापूर शहरात जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाच्या पथकांची तपासणी सुरु आहे. काल सकाळी 7 वाजता सुरु झालेली ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरूच होती.
मुंबई गोवा महामार्गाची मंत्र्यांकडून पाहणी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार आहेत. त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम उपस्थित होती.
तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा यांना अटक
इस्लाम आणि मोहम्मद पैगंबरांवर यांच्या बद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करण्या प्रकरणात भाजपकडून निलंबित आमदार टी राजा यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. यावर आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.
आज बैलपोळा सण
आज राज्यात बैलपोळा सण साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने विविध भागात बैलांची मिरवणूक निघणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -