Maharashtra Breaking News LIVE Updates : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वासिंद आणि असनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Apr 2022 08:43 PM
Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वासिंद आणि असनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  झाली आहे.  कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील वासिंद आणि असनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन फेल झाले आहे. कसाराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक नियमित सुरू होण्यासाठी अर्धा ते एक तास लागण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : 1 मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात सभा होण्याची शक्यता

1 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. 

Pune : 30 एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीची निर्धार सभा

पुण्यातल्या अलका चौकात 30 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार असल्याची माहिती आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

Pune : 30 एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीची निर्धार सभा

पुण्यातल्या अलका चौकात 30 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार असल्याची माहिती आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थी मुंबई मंत्रालयात दाखल

Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व विद्यार्थी मुंबई मंत्रालयात दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना आझाद मैदानात उपोषणवेळी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करण्यासाठी आज मुंबई मंत्रालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आले आहेत. सरकारने दिलेल्या तारखा गेल्या नंतरही प्रश्न न सुटल्याने मराठा तरुण व समन्वयक व विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिवांकडे या संदर्भात बैठक सुरु आहे

Ahmednagar : वडापावचे पाच रुपये कमी करण्याचे सांगितल्याने एकाची हत्या

Ahmednagar :  अहमदनगरच्या एमआयडीसी भागातील सह्याद्री चौक परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाची हत्या झालीये. सह्याद्री चौक परिसरात एका वडापावच्या दुकानावर ही घटना घडलीये. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास या प्रकरणातील मयत प्रवीण कांबळे हा वडापावच्या दुकानावर वडा खाण्यासाठी गेला होता. पण दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयांना असल्याचे सांगितल्यानंतर पाच रुपये कमी करा असं प्रविणने म्हटले. या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली आणि या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान वडापाव दुकानदाराच्या मदतीला आसपासचे काही लोक आले. त्यांनी प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली.त्यानंतर प्रवीणला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी प्रवीण कांबळेचा मृत्यू झाला. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पेट्रोलचे दर कमी करण्यासदर्भांत उद्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता

Maharashtra News :  पेट्रोलचे दर कमी करता येईल का यासदर्भांत उद्याच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर 1 रुपयांनी कमी करता येतील का हे ही तपासलं जाईल.  नरेंद्र मोदींनी राज्यावर टीका केल्यांनातर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत सरकार दार कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Kolhapur : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शिवशाही बसचा ब्रेक फेल होऊन अपघात

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शिवशाही बसचा ब्रेक फेल होऊन अपघात


अपघातात चार गाड्यांचा चक्काचूर झाल्याची प्राथमिक माहित


 ब्रेकफेल झाल्यानंतर बस रिव्हर्स मध्ये भरधाव वेगाने आली मागे


नागरिकांची मोठी झाली पळापळ


अचानक ब्रेक फेल झाल्याने सीबीएस परिसरात वाहतुकीची कोंडी

Jalgaon yaval News : यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ ट्रक आणि बस यांची समोरासमोर झालेल्या धडकेत आठ जण गंभीर

Jalgaon : यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ ट्रक आणि बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान रावेर बस आगाराची बस क्रमांक (एचएच 40 एन 9063) ही प्रवासी घेऊन जळगावाकडून रावेरला जात होती. दरम्यान, फैजपूरकडून भुसावळकडे जाणार ट्रक (युपी 80 सीटी 7536) जात असताना भोरटेक गावाजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai : दादर शिवाजी पार्कमध्ये 3 मे रोजी रमजान ईदला नमाज पठण करण्याच्या विनंतीला मुंबई महापालिकेचा नकार...

दादर शिवाजी पार्कमध्ये ३ मे रोजी रमजान ईदला नमाज पठण करण्याच्या विनंतीला मुंबई महापालिकेचा नकार...


३ मे रोजी रमजान ईद निमीक्त शिवाजी पार्कवर नमाज पठण करुन द्यावे अशी मागणी नय्यीब शहाबुद्दीन शेख यांनी महापालिकेकडे केली होती

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीच्या अर्जाची केंद्रीय पथक मार्फत पडताळणी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीच्या अर्जाची केंद्रीय पथक मार्फत पडताळणी


ऑनलाईन प्रक्रियेत नामंजूर झालेले आणि ऑफलाईन दाखल झालेल्या अर्जंची केंद्रीय पथक मार्फत पडताळणी


सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 हजार 904 अर्ज प्राप्त झाले, यातील 2 हजार 395 अर्ज विविध कारणामुळे नामंजूर करण्यात आले होते


नामंजूर अर्जाना चौकशी समितीकडे अपील करण्याचा होता अधिकार, चौकशी समितीने 1 हजार 970 अर्जाना त्रुटी दूर करत दिली मंजुरी


पुन्हा मंजुरी देण्यात आलेले, नामंजूर तथा ऑफलाईन दाखल झालेल्या अर्जंची केंद्रीय पथक करत आहे पडताळणी


दिल्लीतील एनसीडीएस विभागातील उप संचालक दर्जाच्या अधिकारी तसेच मुंबईतील एक अधिकारी यांचा केंद्रीय पथकात समावेश


काल पासून केंद्रीय पथक सोलपुरात करत आहे अर्जाची पडताळणी

LIVE : झेड सेक्युरिटी नसती तर किरीट सोमय्यांची हत्या झाली असती, प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

LIVE : झेड सेक्युरिटी नसती तर किरीट सोमय्यांची हत्या झाली असती, प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 



Kolhapur News :  कळंबा कारागृह अधिक्षकांवर कैद्याचा हल्ला, पत्र्याने केला हल्ला, चंद्रमनी इंदूरकर जखमी

Kolhapur News :  कळंबा कारागृह अधिक्षकांवर कैद्याचा हल्ला, अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांच्यावर पत्र्याने हल्ला केला, रत्नागिरीहून आणलेल्या संशयित कैद्याने केला हल्ला 


अधीक्षक इंदूरकर किरकोळ जखमी, जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार

एलआयसीचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात दाखल होणार, गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी

थोड्याच वेळात एलआयसीची पत्रकार परिषद 


एलआयसीचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात दाखल होणार, गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी


एलआयसीच्या प्रति समभागाची किंमत रुपये ९०२ ते रुपये ९४९ असणार असल्याची माहिती 


२१ हजार कोटी रुपये सरकार एलआयसीच्या आयपीओतून उभे करणार, एलआयसीची ३.५ टक्के समभाग खुल्या बाजारात आणणार 


पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर ६० रुपये किंवा ६ टक्क्यांची सूट मिळणार तर कर्मचारी, रिटेलला जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सूट मिळणार 


४ मे रोजी गुंतवणुकीसाठी खुली होणारी भागविक्री ९ मे पर्यंत सुरु राहणार

Kolhapur : कळंबा कारागृह परिसरात अधीक्षकांवर संशयित कैद्याने केला हल्ला

Kolhapur : कळंबा कारागृह अधिक्षकांवर कैद्याने हल्ला केला आहे. अधीक्षक चंद्रमनी इंदूरकर यांच्यावर पत्र्याने हा हल्ला करण्यात आला आहे. रत्नागिरीहून आणलेल्या संशयित कैद्याने हा हल्ला केला. या हल्ल्यामुळे अधीक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. या संदर्भात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार

तुळजाभवानी मंदिरासमोर पूजाऱ्यांचे लाक्षणिक आंदोलन

Osmanabad News : आज तुळजापूरमध्ये भवानी मंदिरासमोर पूजाऱ्यांनी लाक्षणिक आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पास यंत्रणा बंद करावी, तुळजाभवानी मातेचे विधिवत अभिषेक पूजेसह सर्व धार्मिक विधी सुरु करावेत या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या विरोधात पुजारी मंडळाच्या पूजाऱ्यांनी मंदिर कार्यलयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. दर्शन मंडप, अभिषेक मंडप यासह तुळजाभवानी मंदिरातील विविध विकास कामे तात्काळ सुरु करावीत या मागणीसाठी पूजाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. दुसरीकडे मंदिर संस्थानच्या नव्या सुविधांमुळे भाविकांना दर्शन वेळेवर मिळत असल्याची भावना आहे.

Aurangabad News : राज ठाकरे यांच्या सभेच्या घोषणेनंतर औरंगाबाद सायबर क्राईमची कारवाई

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या सभेच्या घोषणेनंतर औरंगाबाद सायबर क्राईमची कारवाई, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या 25 पोस्ट डिलीट केल्या.


1 फेसबुक प्रोफाइल डिलीट केलेत .


 149 ची 3 जणांना नोटीस .


1 युट्यूब चॅनलवर गुन्हा दाखल केला ..

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे थोड्याच वेळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे थोड्याच वेळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला


राज्य सरकारवर होणाऱ्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व


किरीट सोमय्या राज्यपाल भेट, नवनीत राणा आरोप याबाबत बैठकीची शक्यता


किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती


किरीट सोमय्या, राणा यांचे आरोप खोडणारे विडिओ पोलिसांकडे उपलब्ध असल्याची सूत्रांची माहिती

'आमचे खांदे भक्कम आहेत' - हायकोर्ट

'आमचे खांदे भक्कम आहे' - हायकोर्ट


न्यायव्यवस्थेवर ज्याला टिका करायचीय करू द्या, जोपर्यंत आमचा हेतू स्वच्छ आहे आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही - मुख्य न्यायमूर्ती


तातडीनं सुनावणीस नकार, पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता


कोर्टाचा अवमान केल्याबद्दल संजय राऊतांविरोधात इंडियन बार असोसिएशनची याचिका


याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरेही प्रतिवादी

Washim : पेडगाव येथे भर वस्तीतील एका घराला अचानक लागली आग; चार जण जखमी

Washim : वाशिम च्या मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथे भर वस्तीतील  एका घराला अचानक आग लागून  घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी घडली या वेळी गावातील तरुण आणि साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाची तत्परता वेळी च आग आणली आटोक्यात आणली या घटनेत चार जण जखमी झाले आहे तर घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

Nagpur Crime News : नागपुरात पुन्हा दुचाकी पेटवल्याची घटना

नागपूरात पुन्हा दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे.. त्यामुळे नागपुरात गुंडगिरी वर कोणाचे वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे...


जरीपटका पोलिस स्टेशनच्या हद्दीत राजकुमार केवलरामानी शाळेजवळच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या दोन दुचाकी एका अज्ञात आरोपीने ज्वलनशील द्रव्य टाकून पेटवल्याचे cctv समोर आले आहे...


सोमवारी पहाटे एक तरुण राजकुमार केवलरामानी शाळेजवळील पार्किंग परिसरात पोचतो आणि ज्वलनशील द्रव्य पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकींनावर टाकतो आणि नंतर त्या दुचाकींना आग लावून तो पळून जाताना सीसीटीव्ही दिसत आहे..


जळालेल्या दोन्ही दुचाकी एका व्यापाऱ्याच्या असून जरीपटका पोलिस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत...


विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात नागपुरात अनेक वेळेला दुचाकी पेटवल्याच्या किंवा घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी फोडण्याच्या घटना घडल्या आहेत...

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेसवर सफाई कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्या
Sangli News : सांगली शहर पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेसवर विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अतुल विकास गर्जे-पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुवर्णा माणिक पाटील असं या महिला सावकाराचं नाव आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून,ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीच्या तगद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले असून,याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.
Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील गांज्याचे मुंबई कनेक्शन उघडकीस

Dhule : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील गांज्याचे मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे. शिरपूर पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ विरुद्ध मोहीम छेडली असता, या मोहिमेचा एक भाग म्हणून गुप्त माहितीदार मार्फत शिरपूर पोलिसांना माहिती मिळाली की, शिरपूर शहरालगत असलेल्या शिरपूर फाटा जवळ ट्रॅव्हल पॉईंट्स याठिकाणी दोन इसम सोबत गांज्या बाळगून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी येत आहेत, ही माहिती शिरपूर शहर पोलिसांना मिळाल्यानंतर माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी तात्काळ एक पथक संबंधित ठिकाणी रवाना केले, या पथकातील पोलिसांना दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले असता पोलिसांनी तात्काळ दुचाकीवर असलेल्या या संशयितांना थांबवले व त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे पोलिसांना गांज्या आढळून आला आहे.

Amravati News  : अमरावतीत महागाई विरोधात काँग्रेचचं "महागाई जुमला आंदोलन" 

Amravati News  : अमरावतीत महागाई विरोधात काँग्रेचचं "महागाई जुमला आंदोलन" 


अमरावती येथील इर्विन चौकातील अग्रवाल पेट्रोल पंप येथे काँग्रेस कडून देशातील जनतेच्या मेहनतिच्या कमाईवर डाका टाकणार्‍या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात "महागाई जुमला आंदोलन"....


अमरावती शहर कांग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे..


"पेट्रोल के दाम कम हुए क्या नही हुए" अशे नारे भोंग्यामधून काँग्रेसवाले देतायत..

Ahmednagar News : अहमदनगर: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याच्या धमकीविरोधात आज नेवासा बंदची हाक, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Ahmednagar News : अहमदनगर: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याच्या धमकीविरोधात आज नेवासा बंदची हाक, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Bhandara News : भंडारा : रेती तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला, भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड जखमी

Bhandara News : भंडारा :- रेती तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला, भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड जखमी, पवनी तालुक्याच्या बेटाळा येथे पहाटे साडे तीन वाजताची घटना, 15 ते 20 तस्कारांनी हल्ला केल्याची पवनी ठाण्यात तक्रार  

औरंगाबादेत हवाला रॅकेटवर छापा, एक कोटी 8 लाख 50 हजार बेहिशोबी रक्कम जप्त

औरंगाबादेत हवाला रॅकेटवर छापा
एक कोटी 8 लाख 50 हजार बेहिशोबी रक्कम जप्त
सुरेश राईस किराणा दुकानातून चालायचा हवाला.
काल रात्रीची कारवाई .
 शहागंज भागातील चेलिपुरा येथील सुरेश राईस किराणा दुकानातून हा संपूर्ण हवालाचाकारभार चालत होता़ या प्रकरणी आरोपी आशीष सावजी याता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ इनकम टॅक्स विभागाच्या अधिका-याच्या उपस्थितीत या बेहिशोबी रक्कम मोजण्यात आली   सिटीचौक पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..

राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता, गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र

राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता, गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र


- राज्यातील चेकपोस्टचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक
- पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना


केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पत्राचा आधार घेत गृहविभागाचे पत्र


- चेकपोस्ट बंद होताना काय परिणाम होतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास होणार


- सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्धती काय।असावी


- चेकपोस्ट बंद केल्यानं राज्य सरकारवर काय आर्थिक बोजा पडेल याचा अभ्यास होणार


- परिवहन आयुक्तच्या अध्यक्षतेखाली  5 सदस्यीय अभ्यास गटाची निर्मिती


- परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारचे मोठे पाऊल

Nagpur News :  17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल,नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद

Nagpur News :  17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल,नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा, पीडित तरुणीच्या कथित प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दिली..


त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत कथित प्रियकराला अटक केली असून इतर दोघांचा शोध घेतला जात आहे...

Aurangabad News : राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते बाळ नांदगावकर आज औरंगाबाद दौऱ्यावर 

राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते बाळ नांदगावकर आज औरंगाबाद दौऱ्यावर, पोलिसांच्या परवानगी आणि होणाऱ्या विरोधाबाबत महत्वाच्या पदाधिकऱ्यांशी करणार चर्चा, बाळा नांदगावकर यांच्या दौऱ्यानंतर पोलिसांच्या परवानगीबाबत मनसे निर्णय घेणार.

Aurangabad News : औरंगाबादेत 1601 धार्मिक स्थळे, एकाकडेही भोंगा लावण्याची अधिकृत परवानगी नाही 

औरंगाबादेत 1601 धार्मिक स्थळे, एकाकडेही भोंगा लावण्याची अधिकृत परवानगी नाही 
मंदिर 1020
मशीद  417
चर्च 40 
गुरुद्वारा 04 
बुद्धविहार 120
वरील धार्मिक स्थळांची पोलिसांकडे नोंद आहे .

Aurangabad News : मित्राच्या लग्नात हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या

Aurangabad News :  औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात मित्राच्या लग्नात हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूर्यकांत गीताराम शिंगाडे असे या तरुणाचं  नाव आहे, शहरातील प्रतापनगरच्या मैदानात सूर्यकांतच्या मित्राचे लग्न होते.यावेळी सूर्यकांतने मित्राच्या खांद्यावर बसून ताल धरला आणि थेट तलवार बाहेर काढून नाचू लागला. तसेच या सर्व घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला,त्यानंतर व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे, तर याप्रकरणी शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पार्श्वभूमी

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


रात अभी बाकी है... नवनीत राणांवरील आरोपानंतर संजय राऊतांचे ट्वीट
संजय राऊत यांनी नवनीत राणांवर मोठा आरोप केला असून मनी लॉंड्रिंगचा आरोप असलेल्या युसूफ लकडावालाकडून राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. संजय राऊतांनी नवनीत राणांचं निवडणूक आयोगाला सादर केलेलं अफिडेव्हिट ट्वीट केलं आहे. यामध्ये राणांनी युसूफ लकडावालाकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, संजय राऊतांनी रात अभी बाकी है.. बात अभी बाकी हैं.... जय महाराष्ट्र!!! अशा स्वरुपाचं आणखी एक ट्वीट काल रात्री उशीरा केलंय. त्यामुळे आजही हा मुद्दा गाजणार हे नक्की


किरीट सोमय्या राज्यपालांच्या भेटीला
मुंबई पोलिसांवरील केलेल्या आरोपांनंतर सोमय्या भाजपच्या शिष्टमंडळासह आज राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी, सुनील राणे हे भाजपचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता ते या प्रकरणात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सोमय्यांवर हल्ला झाला तेव्हा CISF जवान काय करत होतं याविषयी चौकशी करण्याविषयी CISFच्या डीजींना पत्र लिहिलं आहे.


नवनीत राणांच्या आरोपांबाबतच्या वस्तुस्थितीचा अहवाल आज पोलीस महासंचालक राज्याच्या मुख्य सचिवांना देण्याची शक्यता
लोकसभेच्या सचिवांकडून राज्याच्या मुख्य सचिवांना 24 तासांत नवनीत राणा प्रकरणी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. काल संजय पांडेंनी राणा दांपत्याचा खार पोलीस स्टेशनमधील चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट करत आरोपांना उत्तर दिलं होतं. तसेच, सांताक्रूझ पोलीस स्थानकातील एक व्हिडीओही पोलीस जाहीर करणार आहेत. आता मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी पोलीस नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
















कोरोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक















देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. देशातील कोरोनाच्या वाढत्या आकड्यांबाबत मोदी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 वाजता ही ऑनलाईन बैठक होणार आहे.  यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यावेळी एक प्रेझेंटेशन देणार आहेत. काल देशात  2,483 नवे रुग्ण आढळले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


आज आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस 
आज आदित्यच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. रायसिना डायलॅाग या चर्चासत्रात राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. रायसिना डायलॅाग या कार्यक्रमात देशभरातले राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, पर्यावरणतज्ञ असे विविध क्षेत्रातले लोक सहभागी होणार आहेत. दुपारी 1.30 वाजता आणि सायंकाळी 5.30 वाजता असं दोन सत्रात आदित्य ठाकरेंचं भाषण होणार आहे. केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, स्मृती इराणी, जयंत सिन्हा हे देखील विविध सत्रांत संबोधित करणार आहेत


म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना भ्रष्टाचारप्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार
म्यानमार कोर्टाकडून मंगळवारी आंग सान स्यू की यांना शिक्षेची सुनावणी होणार होती. मात्र, आज सुनावणी करण्यात येणार आहे. स्यू की यांच्या वकिलांना माध्यमांशी बातचित करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात स्यू की यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होत. त्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणी दोषी आढळल्यानं त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यांना 15 वर्षांची कोठडी आणि दंड अशी शिक्षा होण्याची शक्यता आहे.


आजची लढत गुजरात विरुद्ध हैदराबाद; कधी, कुठे पाहाल सामना?
GT vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. दरम्यान गुजरात विरुद्ध हैदराबाद (Gujrat Titans vs sunrisers hyderabad) हा सामना यंदाच्या हंगामातील 40 वा सामना असून गुजरातचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित असून त्यांनी आजचा विजय मिळवल्यास ते प्लेऑफच्या आणखी एक पाऊल पुढे पोहोचतील. दुसरीकडे सात पैकी पाच सामने जिंकल्याने त्यांचं आव्हान देखील गुजरातला तितकचं कठीण असून त्यांचेही पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस तितकेच आहेत. दरम्यान दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा असल्याने आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.