Maharashtra Breaking News LIVE Updates : अमित ठाकरे आणि मनसे पदाधिकारी त्र्यंबकेश्वर चरणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Apr 2022 08:54 PM
Maharashtra News : अमित ठाकरे आणि मनसे पदाधिकारी त्र्यंबकेश्वर चरणी

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मनसे पदाधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झाले आहेत.  त्र्यंबकेश्वरची महाआरती आणि अभिषेक करणार आहे.  हनुमान चालीसा आणि भोंगे वरून वाद सुरू असतानाच अमित ठाकरे त्र्यंबकेश्वर चरणी गेले आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये नियोजित सभा  आहे. सरकारला दिलेला आल्टीमेटम  या पार्श्वभूमीवर अमित यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला महत्त्व आहे.

बदलापुरात 28 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

बदलापूर शहरात एका 28 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. प्रसाद झुंझुरके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.


प्रसाद हा याच भागातील खरवई परिसरातील पोद्दार सोसायटीमध्ये राहणारा आहे. या भागात एका तरूणाची हत्या झाल्याची माहिती बदलापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

Buldhana News Update : कारवाईसाठी आलेल्या पथकाला घाबरून चार जणांच्या नदीत उड्या, एकाचा मृत्यू 

Buldhana News Update : अवैध रेती उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला घाबरून चार जणांनी नदीत उड्या टाकल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. पूर्णा नदीतून यांत्रिकी बोटींच्या साहाय्याने अवैधरित्या रेती उपसा सुरू असताना पथकाने तेथे धाड टाकली. बुलढाण्यातील मलकापूर तालुक्यातील टाकळी शिवरात ही घटना घडली आहे. 

Raigad News Update : राडगडमधील उरणनजीक दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

Raigad News Update : राडगडमधील उरणनजीक दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला आहे. ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. नंदकुमार पाटील (वय, 35) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. पेण तालुक्यातील रावे येथील हा तरूण आहे. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्तारोको केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या एनसीएमसी कार्डचं उद्धघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या एनसीएमसी कार्डचं उद्धघाटन करण्यात आलं. 

माधव गोडबोले यांच्या निधनावर अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला

माधवराव गोडबोले यांच्या निधनावर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एक अभ्यासू , प्रामाणिक , निष्पक्ष अशी त्यांची ओळख आहे. शंकराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री असताना ते गृह विभागाचे सचिव होते. माधवराव गोडबोले यांच्यामुळे शंकराव चव्हाणांना धाडसी निर्णय घेण्याची सुलभता मिळाली. त्यांची कार्यपद्धती नेहमी शंकराव चव्हाणांना पटलेली होती. राज्यातील सचिव पदापासून ते केंद्रातील गृहसचिव पर्यंत हा मोठा पल्ला त्यांनी गाठला. निवृत्त झाल्यानंतरही आपल्या लेखातून त्यांनी राज्याला मार्गदर्शन केलं. 


 

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर

Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या दरम्यान, महत्त्वाच्या काही राजकीय भेटी-गाठी होण्याची शक्यता आहे. 

अवैधरित्या पिस्तूलची विक्री करणाऱ्या सराईतला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे पोलिसांनी अवैधरित्या पिस्टलची विक्री करणाऱ्या सराईताला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 3 लाखापेक्षा जास्त किमतीच्या एकूण 11 पिस्तूल जप्त केल्या आहेत. या सराईतला त्याच्या घरातून पोलिसांनी पकडले असता त्यावेळी त्याच्याकडून 3 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे सापडले. या संदर्भात खरेदी विक्री करणाऱ्या इतर 3 जणांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांचे मध्य प्रदेश कनेक्शन आहे. या सर्व प्रकरणातील मध्य प्रदेशात असणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव कळले असून त्याचा शोध सुरू आहे.

नागपूर पोलिसांना मोठं यश, पकडली गांजाची मोठी खेप

हैदराबाद वरून ग्वाल्हेरच्या दिशेने जाणाऱ्या गांजाची मोठी खेप नागपूर पोलिसांनी पकडली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर नागपुरातील कळमना परिसरात आऊटर रिंग रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. एका स्कार्पिओ गाडी मधून हैदराबाद वरून ग्वाल्हेरच्या दिशेने गांजा तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अशोक सिंह आणि मनिष ओमप्रकाश या दोन आरोपींसह 196 किलो गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे शोरूम मधून खरेदी केलेल्या नव्याकोऱ्या स्कॉर्पिओमधून ही गांजा तस्करी केली जात होती. दरम्यान हैदराबाद वरून हा गांजा कोणी पाठवला आणि तो ग्वाल्हेरला कोणाकडे पाठवला जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

सोमय्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर  विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

माजी महापौर  विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आला आहे. 

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी विंचूदंश प्रतिलसीचे संशोधन केल्याचा दावा चुकीचा : डॉ. विवेक नातू, डॉ. संतोष कामेरकर

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी विंचूदंश प्रतिलसीचे संशोधन केल्याचा दावा चुकीचा असल्याचा दावा डॉ. विवेक नातू आणि डॉ. संतोष कामेरकर यांनी केला आहे. यासंदर्भातले संशोधन हाफकिन इन्स्टिट्यूट आणि तेथील संशोधकांनी केला असून त्याचा वापर कसा करायचा याचे संशोधन आम्ही केल्याचा दावा पुरावे सादर करुन केला आहे. 2006 साली यासंदर्भात सरकारी बैठकीत आम्ही संशोधनाचा काही भाग सरकारला सादर केला होता. त्यानंतर 2010 साली आम्ही ट्रायल्ससोबत संशोधन पेपर सादर केल्याचा दावा देखील डाॅ नातू यांनी केला आहे. दुसरीकडे, 2011 साली बावस्कर यांनी पेपर सादर केला आणि याचे क्रेडिट घेतले हे चुकीचं असल्याचं डाॅ संतोष कामेरकर आणि डाॅ. नातू म्हणाले. कोकणात विंचूदंशामुळे अनेक मृत्यू होत होते, अशात हाफकिनने केलेलं औषधाचं संशोधन आणि त्या औषधाचा वापर कसा करावा हे महत्त्वपूर्ण ठरतं. 

PM Modi : मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होणार, उद्यापासून एक महिनाभर देशभरात हनुमान चालिसा पठण, पूजा सुरू

येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने देशभरात भव्य धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरूवात 26 एप्रिलपासून होणार असून मंदिरांमध्ये यज्ञ, पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण होणार आहे. 

PM Modi : मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होणार, उद्यापासून एक महिनाभर देशभरात हनुमान चालिसा पठण, पूजा सुरू

येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने देशभरात भव्य धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येणार आहे. याची सुरूवात 26 एप्रिलपासून होणार असून मंदिरांमध्ये यज्ञ, पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण होणार आहे. 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या पीएवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक 

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या पीएवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नितीन विलास शिरसाठ असे अटक  करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावून पोलिसांनी शिरसाठ याला ताब्यात  घेतले आहे. 

Hingoli News Update : ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या घरावर गावगुंडांचा हल्ला

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या कळमनुरी येथील घरावर काल रात्री दहा ते बारा जणांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी हातात असलेल्या शास्त्राच्या साह्याने नंदकिशोर तोष्णीवाल  यांच्या घराजवळील त्यांच्या गाळ्याचे शटर सुद्धा तोडले आहे. गेट तोडण्याचा गुंडांनी प्रयत्न केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. 

दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मशिदींवरील भोंग्यावरुन निर्माण झालेल्या प्रश्नावरून आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्वपक्षीय बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वळसे पाटील यांनी माहती दिली. 

 सख्या भावांचं अपहरण, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

अंबरनाथ शहरात दोन सख्या भावांचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे भाऊ अल्पवयीन आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून झाला असून पोलिसांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे.

मलंग गड भागातील अघोषित लोडशेडिंग विरोधात भाजपचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

कल्याण पूर्व व  ग्रामीण भागासह मलंग गड भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. या अघोषित लोडशेडिंगबाबत  भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण पूर्व येथील टाटा पावर महावितरण कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.


कल्याण ग्रामीण परिसरातील मलंगगड भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे . त्यामुळे येथील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप व स्थानिक नागरिकांनी कल्याण पूर्व टाटा पावर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी लोडशेडिंग बाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यवतमाळ -नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवले

यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवले. दोघांचाही जागीच मृत्यू...  संतप्त गावकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन, टायरची जाळपोळ करत रोखला रस्ता 
गेल्या तासभरापासून वाहतूक ठप्प 


 

Wardha News Update : घरगुती सिलेंडरच्या स्फोटात चिमुकली गंभीर जखमी, वर्ध्यातील घटना 

Wardha News Update : वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोद्दार लेआऊट वॉर्ड नंबर पाच सिंदी मेघे परिसरातील घरात सिलेंडरचा भडका उडाला आहे. या स्फोटात अकरा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. अचानक सिलेंडरचा रेग्युलेटर लीक झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परशुराम घाट उद्यापासून चौपदरीकरणाच्या कामासाठी एक महिना बंद

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट उद्यापासून चौपदरीकरणाच्या कामासाठी एक महिना बंद..


 


२५ एप्रिल ते २५ मे पर्यंत दुपारी १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद..


 


लोटे - कळबस्ते मार्गाने वळवण्यात आली आहे..


 


पर्यायी मार्गावरून दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद..

यवतमाळ- अवकाळी पावसामुळे महागाव, उमरखेड तालुक्यातील पिकांचे नुकसान

यवतमाळ : काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे महागाव, उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या उन्हाळी ज्वारी, भुईमूग आणि हळद, तीळ, टरबूज पिकांचे जवळपास दोन हजार एकरारील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील अल्पभूधारक शेतकरी अमोल बगाटे या शेतकऱ्याच्या शेतातील दोन एकर ज्वारीचे पीक हे  वादळी मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त होऊन भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडले आहे. शासनाने तातडीने पीक नुकसानीचे  पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी केली आहे.

कोकणातील अवकाळी पावसाच्या प्रश्नावर अजित पवारांनी बाळगलं मौन.....

मागील दोन दिवस कोकणात अवकाळी पावसाने  धुमाकूळ घातला आहे.यात आंबा,काजू, कोकम यासह अनेक प्रकारच्या बागायतींचं मोठं नुकसान झालंय.... प्रामुख्याने आंबा हंगाम सुरू असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आलाय, आधीच कमी उत्पादन त्यात अवकाळी पावसात झालेलं नुकसा यात कोकणातील बागायतदार चिंतेत आहे.त्यांच्या नुकसानी बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी मौन बाळगल्यामुळे शेतकरी नाराज झालेत.एरवी कोकणी सरकारकडे काहीच मागत नाही मात्र जेव्हा आम्ही खरंच संकटात असतो त्यावेळी तरी सरकारने आमचं म्हणणं ऐकनू घ्यायला हवं होतं अश्या भावनाही व्यक्त केल्यात.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सावर्डे येथे स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी आले होते

रिफायनरी होणार हे स्पष्ट - आमदार राजन साळवी

रिफायनरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले याचा अर्थ रिफायनरी होणार हे स्पष्ट झाले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राजापूर - लांजा मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. तसेच बारसू आणि सोलगाव या पंचक्रोशीत माझी जागा असेल तर मी राजकीय संन्यास घेईन असे आव्हान देखील राजन साळवी यांनी दिले आहे. सध्या राजापूर भागात साहेबाच्या जागा आहेत अशी चर्चा ऐकू येते? त्यावर काय प्रतिक्रिया असेल या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले आहे.


 
राज ठाकरे यांचा चोंगा फाटलाय - विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची घसरली जीभ, राज ठाकरे यांच्या भोंगा उतार-झेंडा बदलू भूमिकेवर सडकून टीका, राज ठाकरे यांचा चोंगा फाटलाय अशी केली भाषा, राणा दाम्पत्याने राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, राणा दाम्पत्यासाठी चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर, राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे महत्व आम्हाला सांगू नये अशी केली टीका

राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल--जयंत पाटील

विरोधकांचे आता सगळे उपाय थकले त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावायची असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण सरकार करील की नाही माहित नाही पण त्यांनी करू नये नाहीतर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय, ज्यांच्या पुढाकाराने हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटलंय..

राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल--जयंत पाटील

विरोधकांचे आता सगळे उपाय थकले त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावायची असा त्यांचा प्रयत्न दिसतोय पण सरकार करील की नाही माहित नाही पण त्यांनी करू नये नाहीतर महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल असे राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय, ज्यांच्या पुढाकाराने हे चालू आहे त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटलंय..

मधमाशांचा भाविकांवर हल्ला, 13 वर्षाचा मुलगा दरीत कोसळला

सातारा : डोंगरावरील यात्रेदरम्यान मधमाशांचा भाविकांवर हल्ला केला. या धावपळीत डोंगरावरून 13 वर्षाचा मुलगा दरीत कोसळला. साताऱ्यातील शेरेवाडी येथे ही घटना घडली आहे. मधमाशांच्या हल्यात सुमारे 27 भाविक जखमी झाले असून 12 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 





अमरावतीत रवी राणा यांच्या निवासस्थानी युवा स्वाभीमानच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होमहवन..

काल आमदार रवी राणा यांच्या अमरावतीमधील गंगा सावित्री निवासस्थानी शिवसैनिकांनी जिथे आंदोलन केले होते. त्या जागेचे शुध्दीकरण आज युवा स्वाभीमानच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला हिंदुत्वाची जाणीव करुन देण्याकरीता मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करण्याचे ठरवले होते. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुडबुध्दीने कारवाई करुन राणा दाम्पत्याला मातोश्रीवर जाण्यापासून रोखले. यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला तीव्र वेदना झाल्या असाव्यात, याच भावनेने आम्ही आज होमहवन करत असल्याचे  युवा स्वाभीमानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अमोल मिटकरी यांच्या महिलांविषयी अपमानजनक वक्तव्यांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार

सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद समोर आला असताना आता याच सभेतील कन्यादानाबाबत अपमानजनक वक्तव्य करून समस्त महिला वर्गाची बदनामी केली असल्याचा आरोप करत त्या विरोधात भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर कार्यकारणी सदस्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्गाची नितीन गडकरींकडून घोषणा, 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती महामार्गाची नितीन गडकरींकडून घोषणा, 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

उच्च तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत बांद्रा इथे बांधणार

उच्च तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत बांद्रा इथे बांधणार


महाज्योति, सारथीची मुलं सर्वच एकत्र राहतील
- यातही कोणी काहीतरी टिमकी काढतील
- आपण भारतीय आहोत हे मुलांनी लक्षात बघ्या
- आपल्याला सर्वांना वेगवेगळे अधिकार आहेत, 
एकमेकांना बद्दल चुकीची भावना मनात येऊ देऊ नका
- भावना भडकविण्याचे काम कोणी करू नये

औरंगाबाद--केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऐकून 5570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा.. 

औरंगाबाद--केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऐकून 5570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा.. 


औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्स येथे व्यासपीठावर नितीन गडकरी पोहचले.


नितीन गडकरी यांच्या सोबत अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती..


आज गडकरी यांच्या हस्ते



लोकार्पण
1)
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण..


2)एक वेळ दुरुस्ती अंतर्गत नगर नाका ते केंब्रिज स्कूल या 73 कोटीच्या 14 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण.


3) राष्ट्रीय महामार्ग 752 लेन  पेव्हड शोल्डर बीटी रोड,181 कोटीच्या 29 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण.


भूमिपूजन


औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमीपूजन.
तसेच राष्ट्रीय महामार्ग 752 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

औरंगाबाद--केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऐकून 5570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा.. 

औरंगाबाद--केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऐकून 5570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा.. 


औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्स येथे व्यासपीठावर नितीन गडकरी पोहचले.


नितीन गडकरी यांच्या सोबत अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती..


आज गडकरी यांच्या हस्ते



लोकार्पण
1)
औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण..


2)एक वेळ दुरुस्ती अंतर्गत नगर नाका ते केंब्रिज स्कूल या 73 कोटीच्या 14 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण.


3) राष्ट्रीय महामार्ग 752 लेन  पेव्हड शोल्डर बीटी रोड,181 कोटीच्या 29 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण.


भूमिपूजन


औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमीपूजन.
तसेच राष्ट्रीय महामार्ग 752 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साई दरबारी

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साई दरबारी...
सह परिवार साई दर्शनासाठी साई दरबारी...
गोवा राज्याच्या मतमोजणी पुर्वीही लावली होती साई दर्शनासाठी हजेरी....
मुख्यमंत्री पदी पुन्हा संधी मिळाल्याने सावंत यांचे सहपरिवार साईदर्शन....

बारामती ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॉलीला आयशर टेम्पोची धडक, 9 जण जखमी
बारामती मोरगाव रस्त्यावर  ऊस तोडणी साठी निघालेल्या मजुरांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात मजूरांसह आयशयर मधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बारामती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळण जवळ पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा  अपघात झाला.  प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूर आपल्या ट्रॅक्टरट्रॉलीतून ऊस तोडणीसाठी जात होते. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती मोरगाव रस्त्यावरील नेपतवळण येथे पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात एकनाथ चव्हाण, हिराबाई  चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, बाजीराव जाधव, मंजुळा जाधव, अशोक चव्हाण, अंजू चव्हाण, रवींद्र जाधव (4 वर्ष) राधा जाधव (दिड वर्षे) ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॉलीला आयशर टेम्पोची धडक; सात मजूर यांसह नऊ जण गंभीर जखमी इम्तियाज मलिक (चालक), साहिल मलिक हे जखमी झाले आहे. त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बारामती तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.

 
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय : गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय, असं गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी आंदोलनाची माहिती आधी मिळाली होती. मात्र पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यात त्रुटी राहिल्या. या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं असून काहींची बदली करण्यात आली आहे, असं गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.


 





जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल...

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. परवा रात्रीच गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर आता  मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
दरम्यान, तर राहुल राजळे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुण्याला रुबी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे.

Mumbai News : राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News : राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल, अज्ञात लोकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काल खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, आयपीसी 143,145,147,149 आणि 37 (अ) आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात देखील सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तर राणा दाम्पत्यांविरोधात दोन गुन्हे तर अज्ञातलोकांविरोधात 1 गुन्हा खार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. 

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार...


योगेश घारड हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरून घरी जाताना झाला गोळीबार..


गोळी ही त्यांच्या मांडीला लागली असल्याची प्राथमिक माहीती..


गोळीबार करणारा वरुड येथील चाटी उर्फ राहुल तडस असल्याचं बोलल्या जात आहे...


योगेश घारड यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले..

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभाला सुरवात

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभाला सुरवात


उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाला उपस्थित आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित राहणार


संचलन सुरू होत आहे.


प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांची 119 तुकडी पोलीस दलात दाखल


310 पुरूष 12 महिला असे एकूण 320 पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश


21 जून 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते


10 महिन्याच खडतर प्रशिक्षण पूर्ण केले भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा


स्थानिक आणि विशेष कायदे


फैरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे परीक्षण पूर्ण केले आहेत 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


Maharashtra Mumbai Latest News Updates : आज महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचं कारण आहे भाजप आणि शिवसेनेत काल झालेला भीषण राडा. काल झालेल्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याआधी राणांनी पंतप्रधानांचा दौरा असल्यानं आंदोलन वापस घेत असल्याचं सांगितलं. मात्र नंतर त्यांना अटक केल्यानं गोंधळ वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटायला गेले आणि तिथं शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात आज पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं भाजप-शिवसेनेतील गोंधळ आणि पंतप्रधानांचा दौरा याकडे आज दिवसभर लक्ष लागून असणार आहे. 


राणा दाम्पत्याला अटक, आज कोर्टात हजर करणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली.    त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 


'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. 


किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला, आज काय पडसाद उमटणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले असून आज दिवसभर यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आज संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एका मंचावर एकत्र दिसणार आहेत.  स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 80 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.