Maharashtra Breaking News LIVE Updates : केजमध्ये ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंड्यासह हजारो भक्त पावनधामवर दाखल.

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Mar 2022 03:19 PM
धुळे: मुलीच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू...
धुळे तालुक्यातील दुसाने येथील रहिवासी असणारे सुदनवा भदाणे आणि त्यांच्या धर्मपत्नी रंजना भदाणे हे आपल्या मुलीच्या न्याय हक्कासाठी गेल्या 14 तारखेपासून उपोषणाला बसले होते मात्र त्यांच्या उपोषण आंदोलनाची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही अखेर आज सायंकाळच्या सुमारास या दोन्ही वृद्ध दाम्पत्याची प्रकृती खालावली यात सुधन्वा भदाणे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी रंजना भदाणे त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार

मुंबई- मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार. राज ठाकरेंकडून हॅलीकॉप्टरने पुष्पवृष्ठी, तर अमित ठाकरे शिवजयंतीसाठी शिवनेरीवर

अमरावतीत बायोकोल बनवणाऱ्या फॅक्टरीला आग

अमरावतीच्या दाभा गावातील बायोकोल बनविणाऱ्या फॅक्टरीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचा कच्चा माल जाळून खाक झाला आहे. दाभा येथील संकल्प इंडस्ट्रीजमध्ये इंधनासाठी वापरले जाणारे लाकडी ठोकळे म्हणजेच बायोकोल तयार करण्यात येते. दुपारच्या वेळी फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या शेतात आग लागली त्यानंतर ही आग फॅक्टरीच्या आवारात असलेल्या कच्च्या मालाच्या गोडाऊन पर्यंत पोहचली आणि आगीने रौद्ररूप धारण करत मोठे नुकसान केले. 

माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा माजी गृहराज्य मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री  सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी यवतमाळ येथे दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक पुत्र माणिकराव ठाकरे, तीन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहेत. त्यांचे पार्थिवावर त्यांचे गावी हरू ता.दारव्हा जि. यवतमाळ येथे दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कश्मीर फाईल्स सिनेमाच्या समर्थनार्थ उल्हासनगरात बजरंग दल रस्त्यावर

कश्मीर फाईल्स सिनेमाच्या समर्थनार्थ आज उल्हासनगर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समर्थनार्थ रॅली काढली आहे. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Sudhir Mungantiwar : औरंगाबादचे संभाजी नगर नामकरण करण्याची सिंहगर्जना करणारे कुठे गेले? सुधीर मुगंटीवार

Sudhir Mungantiwar : औरंगाबादचे संभाजी नगर नामकरण करण्याची सिंहगर्जना करणारे कुठे गेले? 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले वचन कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते सुधीर मुगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारचे विकासकामांकडे लक्ष नाही : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 

Chandrashekhar Bawankule : विदेशी गुंतवणुकीमधे महाराष्ट्राची पीछेहाट होण्याच्या पाठीमागचा विचार केला तर या सरकारचे केवळ राजकारण करण्याकडे लक्ष आहे. परंतु, विकासाच्या कामासाकडे यांचं लक्ष नसल्यामुळे महाराष्ट्राची पीछेहाट होताना दिसत आहे, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

उल्हासनगरमधील भाजप नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले, मात्र इथे खालिस्तानी समर्थकांनी आपला पाठिंबा दिला त्यामुळे आपचे सरकार आल्याची  पोस्ट एका व्हाट्सअप ग्रुपवर भाजपा नगरसेवक राजेश वधेरिया यांनी केली होती, या प्रकरणी हरिसिंग लबाना यांच्या तक्रारवरून भाजपा नगरसेवक वधेरिया यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नाराजी कायम

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नाराजी कायम


महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याला राजेश क्षीरसागर यांची दांडी


कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात होतय महा विकास आघाडीचा मेळावा


मेळाव्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने उपस्थित


माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर उत्तर मध्ये मोठी ताकद


यादी दोन वेळा क्षीरसागर यांनी केलय कोल्हापूर उत्तर प्रतिनिधित्व


राजेश क्षीरसागर यांचा अनुपस्थितीची जोरदार चर्चा

Uddhav Thackeray : महाविकास आघाडी खोटं बोलू शकत नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : महाविकास आघाडी खोटं बोलू शकत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले

Shivsena : हिंदुत्व धोक्यात येत असल्याचा भाजपकडून भ्रम पसरवला जात आहे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Shivsena : हिंदुत्व धोक्यात येत असल्याचा भाजपकडून भ्रम पसरवला जात असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते शिवसंपर्क अभियानातंर्गत खासदारांशी संवाद साधत होते. 

जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने शिक्षकाने फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने हुबेहूब  चिमणीचे चित्र रेखाटले
जागतिक चिमणी दिवसानिमित्त कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,  येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने हुबेहूब  चिमणीचे चित्र रेखाटून चिमणी संवर्धनाचा संदेश दिलाय. आता कडक उन्हाळा जाणवू लागल्याने सर्वांनी आपल्या अंगणात चारा-पाणी ठेवून पक्ष्यांप्रती जिव्हाळा दाखवावा या जाणीवेतूनच समाज व विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पेठ येथील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूंच्या सहाय्याने फलकावर जागतिक चिमणी दिवसानिमित्त चिमणीचे हुबेहूब चित्र रेखाटून संदेश दिला आहे. मानवाच्या चुकीच्या राहणीमान पद्धतीमुळे, जीवनशैलीमुळे तसेच आधुनिक यांत्रिकीकरणामुळे शहरी आणि ग्रामीण भागातून हद्दपार होऊ लागली आहे. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्यांचे संवर्धन व संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश दिलाय
द सीएसआर जर्नल ॲक्सिलन्स अवाॅर्ड 2021 मध्ये एबीपी माझाला स्पेशल काॅमेंडेशन कॅटॅगिरीमध्ये पुरस्कार; मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी पुरस्कार स्विकारला

द सीएसआर जर्नल ॲक्सिलन्स अवाॅर्ड 2021 मध्ये एबीपी माझाला स्पेशल काॅमेंडेशन कॅटॅगिरीमध्ये पुरस्कार; मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी पुरस्कार स्विकारला

Shiv Jayanti : शिवजयंती 21 मार्च रोजी तिथीनुसार घराघरात साजरी केली पाहिजे, मुंबई काँग्रेसची मागणी... मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

शिवजयंती 21 मार्च रोजी तिथीनुसार घराघरात साजरी केली पाहिजे, मुंबई काँग्रेसची मागणी... मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Hingoli News Updates :   हळदीच्या कुकरचा स्फोट होऊन चार जण जखमी, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील घटना





Hingoli News Updates :   हळदीच्या कुकरचा स्फोट होऊन चार जण जखमी, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील घटना

 

 हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील काहाकर बुद्रुक येथे हळद शिजविण्याचे काम सुरू असताना काम करणाऱ्या मजूर सोबत धक्कादायक घटना घडली आहे. कुकरचा स्फोट होवून चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. एकावर नांदेड, दोघांवर अकोला, तर एकावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगावर गरम पाणी पडल्याने  चौघे जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. काम करत असताना जेवणाचा ब्रेक घेतल्यानंतर जेवण सुरू असतानाच हा सर्व प्रकार घडला. सदरील कुकरचे शिटी लॉक झाल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.  


 

 



 


parbhani News : परभणी महानगरपालिकेत नोकरी लावतो म्हणून मनपा कर्मचारी आणि कामगार नेत्यानेच अनेकांना फसवल्याचे उघड

parbhani News : जुने कागदपत्रं दाखवत परभणी महानगरपालिकेत नोकरी लावतो म्हणून मनपा कर्मचारी आणि कामगार नेत्यानेच अनेकांना फसवल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीनंतर या दोन्ही महाठगांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परभणी महानगरपालिकेत शिपाई या पदावर असलेल्या दिगंबर कुलकर्णी आणि कामगार संघटनेचे सरचिटणीस असलेल्या काशिनाथ जाधव या दोन जणांनी परभणी आणि बाहेर जिल्ह्यातील स्वतःच्या परिचयातील अनेक जणांकडे जाऊन महानगरपालिकेतील जुन्या कंत्राटी पदाच्या जाहिराती आणि जीआर दाखवत तुम्हाला नोकरी लावतो म्हणून विश्वास संपादन केला.कुणाकडून अडीच लाख,कुणाकडून लाख रुपये,कुणाकडून ५० हजार असे लाखो रुपये गोळा केले आणि पोबारा केला. याबाबत संताबाई भुजबळ या महिलेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यांनतर पोलिसांत तक्रार दिली. नंतर या दोघांवर ही गुन्हा दाखल झाला आणि दिगंबर कुलकर्णी त्यांचा साथीदार काशिनाथ जाधव या दोन्ही महाठकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Nagpur News :नागपुरात "जल रेसिपी" नावाची आगळीवेगळी स्पर्धा

Nagpur News : पाण्याची मुबलकता असलेल्या भागात खाद्य संस्कृतीतही पाण्याचा पुरेपूर वापर होतो... तर पाण्याचा दुर्भिक्ष असलेल्या भागात कमीत कमी पाणी वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात... वर्तमान काळात मात्र, प्रत्येक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने दैनंदिन वापरात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच स्वयंपाक घरातही पाण्याचा कमीत कमी वापर करणं आवश्यक झालंय... स्वयंपाक घर सांभाळणार्‍या महिलांचा या बाबतीतला कौशल्य तपासण्यासाठी नागपुरात "जल रेसिपी" अशी आगळीवेगळी स्पर्धा पार पडली...

Dhule Solapur Road news : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडा; 14 जणांनी गाडीवर हल्ला करून दीड लाखाचा ऐवज पळवला

धुळे सोलापूर या नॅशनल हायवेवर दोन दिवसापूर्वी सायंकाळी साडेसात वाजता ईनोवा गाडी वर हल्ला करून लूटमार करण्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी फाटा इथे घडलीय.. या दरोडेखोरांनी गाडीमधील दांपत्याला बेदम मारहाण केलीय.. नॅशनल हायवे वरती जवळपास पंधरा ते वीस मिनिट हा सगळा थरार चालू होता. सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभाग गटअधिकारी म्हणून काम केलेले विशाल बडे व त्यांची पत्नी वर्षा बडे हे सोलापूर हून बीडकडे आपल्या वाहनातून प्रवास करत असताना वाशी फाटा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी त्यांची ईनोवा क्रिस्टा गाडी अडवून दरोडेखोराकडून दरोडा टाकला. यात दीड लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी पळवला आहे. ईनोवा गाडी लोक असल्यामुळे गाडीचे डोर निघत नव्हते म्हणून या दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने काच फोडला त्यानंतर दरवाजा तोडून या गाडीत असलेल्या वर्षा बडे यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत बराच काळ झटापट झाली यावेळी त्यांच्या गळ्यातील सोने दरोडेखोरांनी पळवले..या दरोडा प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे..

Raigad News : मुंबई - गोवा महामार्गावर माणगावनजीक वाहतूक कोंडी

Raigad News : रायगड .. मुंबई - गोवा महामार्गावर माणगावनजीक वाहतूक कोंडी. ..


कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची रांग.. 


कोकणात जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग...


वाहन चालकांचा बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीची समस्या..

Akola News : भाजपा नेते राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांची आज दुपारी 4 वाजता अकोल्यात पत्रकार परिषद

Akola News : अकोला : भाजपा नेते राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांची आज दुपारी 4 वाजता अकोल्यात पत्रकार परिषद.

raigad navi mumbai news: बंदी घालण्यात आलेल्या चिनी ड्रोनचा साठा जप्त,पावणेपाच कोटी रुपयांचा माल हस्तगत

देशात ज्या चिनी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे, त्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जेएनपीटीच्या सीमाशुल्क विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा माल जप्त आणि तब्बल १ हजार २०० ड्रोन जप्त करण्यात आले. तस्करीमार्गे आयात करण्यात आलेल्या चिनी ड्रोनच्या कंटेनरवर कारवाई करत तो जप्त करण्यात आलाय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


1. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं, सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनीच गोळ्या झाडल्याची साक्षीदारांची न्यायालयाला माहिती
 
2. महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर, कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वाधिक समावेश, राज्यभरातील रुग्णसंख्या शंभराच्या आत
 
3. निवडणुकांसाठी शिवसेना अॅक्शन मोडमध्ये, शिवसंपर्क अभियानातंर्गत उद्धव ठाकरे 19 खासदारांशी आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार
 
4. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलानं आणि सहकाऱ्यांनी पावणे सात कोटींची फसवणूक केली, नाशिकमधील व्यापाऱ्याचा आरोप, न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जणांवर गुन्हा
 
5.कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराला तडे, मंदिरातील वीस दगडी खांबाना भेगा, मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याची गावकऱ्यांना भीती


6. नितीन गडकरींचे महाराष्ट्राला गिफ्ट; 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी
 
7. कोकण किनारपट्टीला 'असनी' चक्रीवादळचा धोका नाही;  फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण


Asani Cyclone In Konkan : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच कोकणात असनी चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. यापूर्वी 'निसर्ग' आणि 'तौक्ते' या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे आणि उत्पन्नाचे साधन असलेली आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळेच पुन्हा चक्रीवादळ येणार, या शक्यतेने नागरिक घाबरले होते. मात्र प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर नागरिकांची जीव भांड्यात पडला आहे. एकीकडं राज्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच, दुसरीकं काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, यावरुन महाराष्ट्रातील ऋतुचक्र बदलत असल्याचे दिसत आहे.


8. कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज


9. GST विभागाची मोठी कारवाई, सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक


10. जपान भारतात 4 हजार 200 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार, पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यात चर्चा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.