Maharashtra Breaking News 04 June 2022 : कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Jun 2022 10:39 PM
मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रीचेबल, राज्यसभेच्या निवडणुकीत मनसेचे कुणाच्या पारड्यात मत टाकणार  

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे.यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्याही मत मोलाचे ठरनार आहे.मनसे आपला कौल शिवसेनेच्या पारड्यात टाकणार की भाजपला साथ देणार हे पाहण देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे .मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप - मनसे नेत्यांच्या जवळीक वाढलेली पाहायला मिळाली  .काही दिवसांपूर्वी मनसे आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला होता .मात्र संभाजी राजेंनी माघार घेतली . त्यानंतर अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नाही. दरम्यान आज याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होवू शकला नाही .मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रीचेबल झाल्याने मनसेच मत नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहण देखील महत्वाचं ठरणार आहे .

कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी आज येथे दिली. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात तक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या वकिलांचं राज्यपालांना साकडं

Ketaki Chitale : केतकी चितळेविरोधातील तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केतकीच्या वकिलांनी राज्यपालांकडे केली आहे. केतकीविरोधात राज्य सरकार जाणूनबूजून कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे

Accident : पुणे –बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव येथे भीषण अपघात

पुणे –बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव येथे भीषण अपघात झाला आहे येवलेवाडी फाट्यावर कार - कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.



Sharad Pawar काश्मीर फाईल्समध्ये खोटी परिस्थिती दाखवण्यात आली : शरद पवार 

जाणीवपूर्वक नव्या पिढीत धर्मवादाचा प्रसार करण्यात येत आहे. काश्मीर फाईल्समध्ये खोटी परिस्थिती दाखवण्यात आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.  

Sanjay Raut on CM : मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपली..आता कसं वाटतंय?

प्रश्न : तुम्ही भाजपसोबत गेला असता तर मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली असती. आत्ता तुमची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपली..आता कसं वाटतंय...?


उत्तर - आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलो नाही.  भाजपच्या वृत्तीचा मी अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीचा हा प्रयोग देशात यशस्वी होईल

Sanjay Raut : भाजपने दिलेला शब्द पाळला नाही : शिवसेना नेते संजय राऊत

Sanjay Raut : भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच महाविकास आघाडीचं काम उत्तम. आणि महाराष्ट्रातला प्रयोग देशभर राबवा असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. 

Mumbai - Goa Highway Accident : मुंबई - गोवा हायवेवर महाडनजीक भीषण अपघात

Mumbai - Goa Highway Accident :  मुंबई - गोवा हायवेवर महाडनजीक भीषण अपघात झाला आहे.  केंबुर्लीनजीक एसटी बस आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.





अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन, भाजपकडून शुद्धीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जागेचं भाजपने आज शुद्धीकरण केलं. पुण्यातील तळेगाव नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन पार पडलं होत. तिथं आज भाजपने गोमूत्र शिंपडलं. शेतकऱ्यांवर झालेलं बेच्छूट गोळीबार अद्याप ही मावळवासीय विसरले नाहीत, तो गोळीबार कोणाच्या आदेशाने झाला. हे सर्वश्रुत आहे, असं असताना हा तळेगाव नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला. म्हणून याचा आम्ही निषेध करतो. असं म्हणत भाजपने भूमिपूजनाच्या जागेचं शुद्धीकरण केलं. 

दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांना टोळक्याकडून मारहाण 

दोन गटात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आलीय. पुण्यातील काशेवाडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  एका महीलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून काशेवाडीत दोन गटात भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस शिपायांना मनीषा खंडाळे, एकांबरी खंडाळे आणि ज्योती पवार  यांच्यासह इतर महिलांनी मारहाण केली.  या प्रकरणी दोन्ही गटावर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Pune News Update : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर धरपकड, दोन पोलीस जखमी 

पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर धरपकड झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पिस्तूल रोखून दरोडेखोरांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. परंतु, पोलिसांवर चाकूने हल्ला करून अज्ञात दोघे डोंगराच्या दिशेने पसार झाले आहे. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-मुंबई जुना महामार्गावर ही थरारक घटना घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी प्रदीप गुट्टे आणि निशांत काळे हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. 

Mumbai Congress : मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेल्या वॉर्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार

Mumbai Congress : मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेल्या वॉर्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार आहे. मुंबई कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. वॉर्ड आरक्षणांची सोडत पुन्हा एकदा काढली जावी अशी मुंबई काँग्रेसची मागणी आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्याच दबावाखाली आयुक्तांच्या केबिनमध्ये वॉर्ड आरक्षण ठरले असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसमधील अल्पसंख्यांक उमेदवारांचे वॉर्ड जाणिवपूर्वक आरक्षित केल्याचाही आरोप आहे. 


 


 

विधानपरिषदेकरता काॅग्रेसला महाविकास आघाडीतून २ जागा मिळणार

विधानपरिषदेकरता काॅग्रेसला महाविकास आघाडीतून २ जागा मिळणार आहेत... या दोन जागांकरता एकून ४ नावे चर्चेत आहेत...माजी मंत्री नसिम खान, मोहन जोशी, सचिन सावंत आणि राजु वाघमारे यांची नावे विधानपरिषदेकरता चर्चेत आहेत...


मुंबई काॅग्रेसच्या चिंतन बैठकीनंतर यांपैकी २ नावांवर शिक्कामोर्तब होईल. येत्या ७ तारखेपर्यंत काॅग्रेसमधील विधानपरिषद उमेदवारांची नावे निश्चित केली जातील...

Nanded Maharashtra News :ट्रक कारचा समोरासमोर अपघात ; तीन जण जागीच ठार





Nanded Maharashtra :नांदेड देगलूर येथे महामार्गावर शंकरनगर पासून जवळच असलेल्या कुंचोली फाट्याजवळ काल मध्यरात्री ट्रक व कारचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झालेत,तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  नरसी कडून शंकरनगरकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला शंकरनगर पासून जवळच असलेल्या कुंचेली फाट्याजवळ शंकर नगरकडून नरसी कडे येणाऱ्या भरधाव वेगातील  एपी 03 टी .ए.3186 या ट्रकने  एम.एच.25 टी 1075  स्विफ्ट डिझायर कारला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार मधील शंकरराव गंगाराम जाधव वय ५५ वर्षं , महानंदा शंकरराव जाधव ५२ वर्षं रा. टाकळी तमा तालुका नायगाव आणि मुलगी कल्पना शिंदे रा. केरूर तालुका बिलोली यांचा जागीच मृत्यू झालाय. तर धनंजय जाधव, स्वाती शिंदे रा. टाकळी हे दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. रम्यान घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस  कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलेय.तर हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशा चुराडा झालाय.


 

 



 


Puntamba Farmer Protest : कृषीमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर पुणतांबामधील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित 

Puntamba Farmer Protest : कृषीमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर पुणतांबामधील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित 

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौरा रद्द

देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौरा रद्द, प्रकृतीच्या कारणामुळे सोलापूर येथील नियोजित कार्यक्रमास फडणवीस जाणार नाहीत, औसा येथून हैदराबादकडे निघाले 

Breaking News: आषाढी एकादशीआधी रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन केले जाणार

Aurangabad: पंढरपुराच्या मंदिरातील रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन केले जाणार. मूर्तीच्या पायाची झीज झाल्यानं वज्रलेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी एकादशीआधी रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेपन केले जाणार. यासाठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचं पथक पंढरपुरात जाणार आहे.

Nashik Fire : नाशिकच्या कॉलेजरोडवर आग, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल 

Nashik Fire : नाशिकच्या कॉलेजरोडवर आग लागली असून मोकळ्या मैदानातील गवताने पेट घेतल्याची समजते आहे. विजेची ठिणगी पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घंटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नसल्याची माहिती आहे. 

Virar : ही तीन मते कुणाला हे अजून, हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलेले नाही

Virar :  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागेच्या निवडणूक आता होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आता भाजपा आणि सेना यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सध्या पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. पालघर जिल्हयातील बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आता दोन्ही पक्ष झटत असताना, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. त्यामुळे ही तीन निर्णायक मते कुणाला मिळणार याबाबत आता तर्कविर्तक लावली जात आहेत. 


ही तीन मते कुणाला हे अजून, हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलेले नाही.


वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत. बविआने महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी सुरुवातीला पाठींबा दिला होता. वसई विरार क्षेञात बविआच राज्य आहे. आणि या भागात सेनेची ताकद आहे. त्यामुळे आतापर्यंत बविआला सेना ठक्कर देत आली आहे. क्षितिज ठाकूरांच्या विरोधात ही सेनेने प्रदीप शर्माना तिकिट दिलं होतं. त्यावेळी ही बविआ आणि सेना यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. माञ बविआ ही नेहमी सत्ताधा-यांच्या बाजूने राहिली आहे. आता माञ परिस्थिती वेगळी आहे. हितेंद्र ठाकूरांचे चुलत बंधू दीपक ठाकूर यांचे मोठे पुञ मेहुल ठाकूर उर्फ मॉंटी यांच्यावर सध्या इडीचा सासेमिरा सुरु आहे. ते 2 मार्चला वैद्यकिय जामिनावर सुटून आले आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर भाजपाशी वैर घेणार नाहीत. अशी अटकले लावली जात आहेत. आणि त्याचमुळे हितेंद्र ठाकूर भाजपाला मतदान करणार असल्याची माहिती सध्या तरी पुढे येत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाच उमेदवार देणार, भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाच उमेदवार देणार


भाजपकडून प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित


उर्वरित तीन जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, कृपाशंकर सिंह यांची नाव आघाडीवर


पाचव्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो


महाराष्ट्र भाजपच्या वतीने या नावांची यादी दिल्लीत पाठवली आहे


येत्या तीन दिवसात विधानपरिषदेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाच उमेदवार देणार, भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप पाच उमेदवार देणार


भाजपकडून प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित


उर्वरित तीन जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, कृपाशंकर सिंह यांची नाव आघाडीवर


पाचव्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो


महाराष्ट्र भाजपच्या वतीने या नावांची यादी दिल्लीत पाठवली आहे


येत्या तीन दिवसात विधानपरिषदेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती

Ahmednagar News : अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिसांकडून सुमारे सात टन रक्तचंदन जप्त
Ahmednagar News :  अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिसांनी सुमारे सात टन रक्तचंदन जप्त केलंय... त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी ८३ लाख रूपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.... एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोदामामध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवले असल्याची माहिती सहायक निरीक्षक आठरे यांना मिळाली होती... या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून खात्री केली असता, गोदामामध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सुमारे सात टन रक्तचंदन मिळून आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी ८३ लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.जप्त केलेलं चंदन हे इतर राज्यातून आलेलं असल्याने या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये...याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती समोर येईल असं पोलीस उपअधीक्षकांनी सांगितलंय.

 
Ahmednagar News : तोफखाना पोलिसांनी चोरीच्या 23 दुचाकी केल्या हस्तगत

Ahmednagar News : अहमदनगर शहर आणि उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणार्‍या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केलीये... कृष्णा सापते असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे... त्याच्याकडून सुमारे 16 लाख रूपये किंमतीच्या 23 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात... आरोपी कृष्णा सापते याचा वाहन-खरेदी विक्रीचा व्यवसाय होता... त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती... या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने 70 ते 80 हजार रूपये किंमतीला जवळचे नातेवाईक, मित्र-परिवार यांना विक्री केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये...नगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील  सरोदे यांची बुलेट दुचाकी आरोपीने चोरली होती...चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती... याप्रकरणी तोफखाना पोलीस तपास करत असताना आरोपीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय.

Mumbai News : वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणावर सोडतीवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची  बैठक 

वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणावर सोडतीवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची  बैठक 


वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीमुळं मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी


२९ पैकी २१ काँग्रेस नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने हरकती व सूचना दाखल करण्याबाबत होणार बैठकीत चर्चा


कायदेशीर लढाई लढण्याबाबतही होणार चर्चा


आझाद मैदानातील मुंबई काँग्रेस कार्यालयात दुपारी अडीच वाजता होणार बैठक

Ahmednagar : अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिसांनी सुमारे सात टन रक्तचंदन केलं जप्त

Ahmednagar : अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिसांनी सुमारे सात टन रक्तचंदन जप्त केलंय... त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी ८३ लाख रूपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.... एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोदामामध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवले असल्याची माहिती सहायक निरीक्षक आठरे यांना मिळाली होती... या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून खात्री केली असता, गोदामामध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सुमारे सात टन रक्तचंदन मिळून आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३ कोटी ८३ लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.जप्त केलेलं चंदन हे इतर राज्यातून आलेलं असल्याने या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये...याबाबत पोलीस तपासात अधिक माहिती समोर येईल असं पोलीस उपअधीक्षकांनी सांगितलंय.

बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य, राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने मास्क संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बंदिस्त ठिकाणी आता मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. रेल्वे, बस, शाळा, थिएटर, ऑफिससह बंदिस्त ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


 





Aurangabad News:औरंगाबादेत दोन गटात तुफान राडा; पोलिसांकडून दंगलीचा गुन्हा दाखल

Aurangabad: शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी झालेल्या राड्यात दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. रिक्षात मद्यपान करणाऱ्यांना हटकल्यावरून सुरू झालेला वादातून हा राडा झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर याप्रकरणी सिटी चौक पोलिसात 20 ते 25 लोकांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Puntamba Farmer Protest Updates : तासाभरापासून बंद दारा आड चर्चा सुरू, चर्चेतून मार्ग निघणार का याकडे सर्वांचं लक्ष, कोअर कमिटी आणि कृषी मंत्री यांच्यात चर्चा सुरु

Puntamba Farmer Protest Updates : तासाभरापासून बंद दारा आड चर्चा सुरू, चर्चेतून मार्ग निघणार का याकडे सर्वांचं लक्ष, कोअर कमिटी आणि कृषी मंत्री यांच्यात चर्चा सुरु

Sakhar Parishad LIVE : 'आधारस्तंभ: शरद पवारांचे साखर उद्योगातील योगदान' या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

Sakhar Parishad LIVE : 'आधारस्तंभ: शरद पवारांचे साखर उद्योगातील योगदान' या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन होतंय.  या परिषदेसाठी शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, शंभुराजे देसाई, विश्वजित कदम, सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित आहेत.

Maharashtra Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील 'किडनीग्रस्त' गाव; जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद

Maharashtra Yavatmal News : तुम्हाला किडनीग्रस्त आजारी (Kidney Affected Village) गाव माहीतीये का? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. महाराष्ट्रातील (Maharashtra) एक गाव चक्क किडनीग्रस्त गाव म्हणून ओळखलं जातं. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वडद (Wadad) हे किडनीग्रस्त आजारी रुग्णांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाचं दुर्दैवं इतकं की, संपूर्ण गावाच्या लोकसंख्येपैकी तब्बल 70 टक्के रुग्ण किडनीच्या आजारांनी त्रस्त आहेत. याचं कारण आहे, फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पिण्याचं पाणी. 


फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील 'वडद' हे गाव किडनीग्रस्त गाव म्हणून ओळखलं जातं. माजीमंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून या गावात जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. पण गेली सहा वर्ष ही यंत्रणा बंद आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Hyderabad Rape Case : हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर मर्सिडिजमध्ये सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचा समावेश

Hydrabad Gang Rape Case : हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडीलांच्या पिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Monsoon Updates : मान्सून लांबणीवर, तीन दिवसांपासून कर्नाटकातच

Maharashtra Monsoon Updates : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे तब्बल तीन दिवसांपासून मान्सून (Monsoon) कर्नाटकमधील (Karnataka) कारवारमध्येच रेंगाळला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत तापमान सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Solapur Maharashtra News : सोलापुरातील निराळे वस्ती रोडवरील वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट 

Solapur Maharashtra News : सोलापुरातील निराळे वस्ती रोडवरील वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट 


ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की शेजारील दुकान देखील जळून खाक, तर एका इमारतीच्या काचा देखील फुटल्या 


मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली घटना


 सुदैवाने अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली 


स्थानिक नगरसेवक देवेंद्र कोठेंनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलासह प्रशासकीय यंत्रणा हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला 


आग आणखी पसरली असती तर शेजारील दुकानात ऑईल-डिझेलच्या डब्यांनी पेट घेतला असता 


या स्फोटात ऑक्सिजन सिलेंडरच्या टाकीचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाल्याचे पहायला मिळाले 


सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही

शरद पवार आणि संजय राऊत यांची मुलाखत

पुण्यात कनेक्ट महाराष्ट्र कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव  मुलाखत घेणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमातील वेगवगेळ्या सत्रांमधे जितेंद्र आव्हाड, कन्हैया कुमार, प्रवीण गायकवाड आणि सचिन सावंत बोलणार आहेत. रोहित पवार यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी विचारधारेबाबत विरोधकांकडून माध्यमं आणि समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 

Puntamba : पुणतांब्यात कृषी मंत्री आज आंदोलकांच्या भेटीला

आज पुणतांब्यातील आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आज आजी-माजी कृषीमंत्री आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत. कृषीमंत्री दादा भुसे पुणतांब्यात सकाळी 10 वाजता आंदोलकांची भेट घेणार आहेत. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आंदोलकांची भेट घेणार सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत.

Sugar Council at Pune : पुण्यात साखर परिषद, मुख्यमंत्री तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित राहणार

Sugar Council at Pune : पुण्यात आज साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे 4 आणि 5 जूनला साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. साखर उद्योगासमोरील समस्या आणि भविष्यातील बदल या अनुषंगाने या साखर परिषदेत वेगवगेळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर शरद पवार यांचे ‘साखर उद्योगासाठी योगदान’ या पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

Kanpur Violence : कानपूर हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, संपत्ती उद्ध्वस्त करणार

Kanpur Violence : कानपूरमधील हिंसा करणाऱ्यांवर योगी सरकारनं कडक पाऊल उचललं आहे. आरोपींवर गँगस्टर अॅक्ट लागणार आहे. तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त करण्यात येणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. काल कानपूरमध्ये जुम्म्याच्या नमाजानंतर दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींना अटक केली आहे. भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन हा वाद सुरु झाला. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे की या आरोपींवर गँगस्टरचा अँक्ट लागेल, तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त केली जाईल. महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनास्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर कार्यक्रमासाठी आले असताना हा हिंसाचार घडला आहे.  

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


कानपूर हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, संपत्ती उद्ध्वस्त करणार
कानपूरमधील हिंसा करणाऱ्यांवर योगी सरकारनं कडक पाऊल उचललं आहे. आरोपींवर गँगस्टर अॅक्ट लागणार आहे. तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त करण्यात येणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. काल कानपूरमध्ये जुम्म्याच्या नमाजानंतर दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींना अटक केली आहे. भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन हा वाद सुरु झाला. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे की या आरोपींवर गँगस्टरचा अँक्ट लागेल, तसेच त्यांची संपत्ती जप्त किंवा उध्वस्त केली जाईल. महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनास्थळापासून 70 किलोमीटर अंतरावर कार्यक्रमासाठी आले असताना हा हिंसाचार घडला आहे.  


पुण्यात साखर परिषद, मुख्यमंत्री तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित राहणार
पुण्यात आज साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे 4 आणि 5 जूनला साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. साखर उद्योगासमोरील समस्या आणि भविष्यातील बदल या अनुषंगाने या साखर परिषदेत वेगवगेळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर शरद पवार यांचे ‘साखर उद्योगासाठी योगदान’ या पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.


पुणतांब्यात कृषी मंत्री आज आंदोलकांच्या भेटीला
आज पुणतांब्यातील आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आज आजी-माजी कृषीमंत्री आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत. कृषीमंत्री दादा भुसे पुणतांब्यात सकाळी 10 वाजता आंदोलकांची भेट घेणार आहेत. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आंदोलकांची भेट घेणार सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत.
 
शरद पवार आणि संजय राऊत यांची मुलाखत
पुण्यात कनेक्ट महाराष्ट्र कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव  मुलाखत घेणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमातील वेगवगेळ्या सत्रांमधे जितेंद्र आव्हाड, कन्हैया कुमार, प्रवीण गायकवाड आणि सचिन सावंत बोलणार आहेत. रोहित पवार यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी विचारधारेबाबत विरोधकांकडून माध्यमं आणि समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचा प्रतिवाद कसा करायचा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 
 
आयफा अवॉर्डचा ग्रॅंड फिनाले
आयफा अवॉर्ड 2022 चा ग्रँड फिनाले आज अबुधाबी या ठिकाणी होणार आहे. यावेळी सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल सूत्रसंचालन करणार आहेत. बॉलिवूडचे अनेक सितारे यावेळी उपस्थित राहतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.