Maharashtra Mumbai News : गेल्या काही दिवसांत मुंबईत शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपनं पोलखोल यात्रा आयोजित केली. त्याचा रथ चेंबूरमध्ये फोडण्यात आला. मुंबईत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड (Mumbai BJP Pol Khol) केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. चेंबूर पोलीस ठाण्याची दोन पथकं आरोपींचा माग काढत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असलं तरी अजूनही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भाजपच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पोलखोल रथाची तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर पोलखोल रथाची तोडफोड शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलानं केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, आरोपींवर कारवाई करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून चेंबूर पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
..तर भाजपा आणखी तीव्र आंदोलन करणार - प्रवीण दरेकर
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, पोलिसांनी आम्हाला 24 तासात आरोप करू असं सांगितलं आहे, जर येत्या 24 तासात आरोपी पकडले नाही तर भाजपा आणखी तीव्र आंदोलन करणार, मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात देखील आम्ही आंदोलन करू, गरज पडली तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर देखील मोर्चा काढू, आम्ही अपर पोलीस आयुक्त दराडे यांची भेट घेतली, दगडाला दगडाने उत्तर दिलं जाईल, 2 आरोपींना पकडलंय, 3 संशयित युवा सेनेचा पदाधिकारी यात आहे, राहिलेल्या आरोपींना येत्या 24 तासात पकडू असं पोलिसांनी आश्वासन दिलंय.खऱ्या आरोपींना पकडा मुंबईतून हद्दपार करा नाहीतर आम्ही आक्रमक होऊ असं आम्ही पोलिसांना थेट सांगितलं. जर न्याय मिळाला नाही तर आंदोलन टोकाचं तीव्र करू
कारवाई करावी लागेल - मंगल प्रभात लोढा
भाजप आमदार मंगल प्रभात लोढा म्हणाले, एक आरोपी काल त्याची बर्थडे पार्टी करत होता, यावरून समजते की पोलीस आपल्या कर्तव्यनिष्ठ मध्ये किती सजग आहे, कारवाई करावी लागेल.
भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बागोल - आशिष शेलार
भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बागोल आहे. भारतीय जनता पक्ष जनतेच्या न्यायालयात जाऊन पोलखोलच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षात विशेषतः गेल्या पाच वर्षात पैशाचा अपव्यय झाला आहे, अपहार भ्रष्टाचार हा मुंबईकरांच्या खिशात मिळालेल्या पैशांचा केला आहे, याचा हिशोब नाही, दगडफेक हा मूर्खपणा करण्यात आला, तारीख तुम्हारी दिन तुम्हारा है बोलो सुबह शाम बोलो शाम..हिम्मत असेल तर समोर या नामर्दासारखं वागू नका, चेंबुरमध्ये लपुन छपुन केली दगडफेक, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी दोन आरोपी पकडले तीन आरोपी अजून पकडण्यासाठी पोलिसांनी सांगितले, मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला बघायचं पकडायला किती वेळ लागतोय? यामागे कोणी मास्टरमाइंड आहे का? बोलवता धनी कोण आहे, त्याची स्पष्टता आम्हाला झाली पाहिजे पोलिसांनी सहकार्य करून आम्हाला सांगितला आहे असे शेलार म्हणाले.
पोलीस बढत्या रद्दवरून..
अगोदर केलेल्या बढत्या आणि नियुक्त्या काही तासातच परत कराव्या लागल्या याचं कारण जनतेसमोर सांगा बोलून कारण जर अस्पष्ट असेल. घोषित केलेला निर्णय काही तासातच का फिरवला जातो पोलीस अधिकार्यांचा देखील खच्चीकरण आहे असे सांगत शेलारांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय.
पोलिसांना अल्टिमेटम
महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपनं पोलखोल अभियानाला सुरुवात केली. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड शिवसेनेनं केल्याचा संशय भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी भाजपनं चेंबूर पोलिसांना 19 तारखेच्या संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र दोन दिवस उलटूनही कुणालाच अटक न झाल्यानं भाजप नेत्यांनी आज मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता.