Nagpur ATM News : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील खापरखेडा गावात एका एटीएम मधून 500 रुपये विड्रॉल टाकल्यावर एटीएम (ATM) मशीन मधून चक्क 2 हजार 500 रुपये विड्रॉल होत असल्यामुळे मंगळवार च्या पहाटे परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ही किमया घडत होती. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या..


...अन् घटनास्थळी पोहचले पोलिस
मिळालेल्या माहितीप्रमाणे अनेक तरुणांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल / withdrawal टाकून एटीएम मशीन मधून अडीच हजार रुपये मिळविले. जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर पोहोचले आणि त्यांनी शटर डाऊन करत एटीएम सेंटर बंद केले.. या एटीएमच्या बाजूला एस.बी.आय. आणि एच.डी.एफ.सी. बॅंकेचेही एटीएम आहे. खापरखेडा येथील काही लोकांनी ॲक्सिस बँकेच्या एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे इतर मशीनमधून पैसे काढून निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार सिल्लेवाडा येथील एक तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात असताना कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला 500 रुपये मागून 1 हजार रुपये देतो असे सांगितले. तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.


किती नागरिकांनी काढले पैसे? तपास सुरू
पोलिसांनी बँकेच्या अधिकार्‍यांना त्याची माहिती दिली, त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी आज तिथे पोहोचून एटीएम मशीनची तपासणी केली. दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. मध्यरात्रीनंतर ही माहिती परिसरात पसरल्याने तीन वाजेपर्यंत नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी या एटीएम सेंटरकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर मोबाईलवर बॅंकेतून कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही. पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: