मुंबई : देशातल्या अनेक सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला झाला. ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह सत्तर वेबसाईट हॅक करण्यात आल्या. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रसह सर्व भारतातील अनेक वेबसाईट आज सकाळी हॅकर्स कडून हॅक करण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या या सायबर हल्ल्यानंतर पोलिसांची सायबर गुन्हे शाखा पुरती गोंधळून गेली होती. कुणी केला होता हा सायबर अटॅक आणि त्यामागचे कारण काय हे जाणून हे जाणून घेऊया.
नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश या वेबसाईटवरून देण्यात आला. पहाटे 4 पासून हॅक करण्यात आलेली ठाणे पोलिसांची वेबसाईट दुपारी बाराच्या सुमारास पूर्ववत करण्यात यश आलं. हॅकर्सकडून डेटा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
सकाळीच ठाणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईट हॅक झाल्यान खळबळ उडाली. कोणालाच कळेना की नेमके काय झाले आहे.
ठाणे शहर पोलिसांची वेब साईट ओपन केल्यावर हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश येत होत. त्याखाली, भारत सरकारला उद्देशून असे सांगण्यात आले होते की, तुम्ही वारंवार इस्लाम धर्मासमोर अडचणी निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही, लवकरात लवकर सर्व मुस्लिम बांधवांची माफी मागा नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. फक्त ठाणे पोलीसच नाही तर हळूहळू महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील इतर देखील अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांच्या वेबसाईट कोणीतरी हॅक केल्याचे निष्पन्न झाले आणि महाराष्ट्र सरकारला देखील याची दखल घ्यावी लागली.
एकीकडे गृहमंत्री प्राथमिक माहिती सांगत होते तर दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांची सायबर क्राईम टीम या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि सायबर क्राईम टीमच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. या सर्व वेबसाईटच्या हॅकिंग मागे जागतिक हॅकर्स असल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले. एकाच वेळी अनेक वेबसाइट हॅक केल्यामुळे हा एक सायबर हल्ला असल्याचे तज्ज्ञ बोलू लागले. मात्र त्यांनी अचानक भारतावर हा सायबर हल्ला का केला असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तर याचे उत्तर होते नुपुर शर्मा प्रकरण.
नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील मुस्लिम देश आणि संघटना भारतावर नाराज आहेत. त्यातच मलेशिया येथील हॅक्टीविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्स यांनी भारताविरुद्ध सायबर वॉर सुरू केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून त्यांनी जगभरातल्या हॅकर्स लोकांना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आव्हान केले आहे. यासोबतच इंडोनेशिया आणि इतर देशातील हॅकर्सनी भारताविरोधात ops patuk सुरू केले आहे याचा अर्थ होतो स्ट्राइक बँक. सरकारी वेबसाईट हॅक होण्याची ही पहिलीच घटना असून याआधी देखील अनेक महत्वाच्या सरकारी वेबसाईट हॅक झालेल्या आहेत. यासाठी आपल्या इथे असलेली कमकुवतच सायबर सुरक्षा कारणीभूत आहे असे तज्ञांचे मत आहे.
नुपुर शर्मा प्रकरणामुळे संपूर्ण जगभरात मुस्लिम संघटना मुस्लिम देश आणि मुस्लिम अतिरेकी गट यांनी भारताविरुद्ध नाराजी व्यक्त करून आपापल्या परीने भारताचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. अल कायदासारख्या अतिरेकी गटाने देखील भारताला इशारा दिला आहे. त्यातच भारतावर आता हॅकर्स करून देखील सायबर हल्ला केले जात आहेत. यामुळे भारतातील सरकारी अधिकृत वेबसाइटवर असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा लिंक होण्याची शक्यता जास्त आहे. आणि असे झाले तर याची खूप मोठी किंमत भारत सरकारला मोजावी लागेल.
संबंधित बातम्या :