Maharashtra Breaking News LIVE : पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी

Breaking News LIVE Updates, 13 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 13 Oct 2021 08:49 PM
पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी

पुण्यातील चित्रपटगृहं,  नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे

पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी

पुण्यातील चित्रपटगृहं,  नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे

पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी

पुण्यातील चित्रपटगृहं,  नाट्यगृहं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे

मावळमध्ये झालेला गोळीबार पोलिसांच्या आदेशावरून : देवेंद्र फडणवीस

जालियनवाला बागेत जनरलच्या आदेशावरून पोलिसांचा गोळीबार झाला आहे. मावळमध्ये झालेला गोळीबार पोलिसांच्या आदेशावरून झालेला आहे.

पंकजा मुंडेना सावरगावात भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी

पंकजा मुंडेना सावरगावात भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

पुणे शहरातील वानवडी परिसरात लेफ्टनंट कर्नल लष्कर अधिकारी महिलेची गळफास लावून आत्महत्या

पुणे शहरातील वानवडी परिसरात एका लेफ्टनंट कर्नल लष्कर अधिकारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. रश्मी मिश्रा (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रश्मी या कर्नल असून, त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्स मधे मूळ पोस्टिंगला आहेत. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले आहे. त्यांचे पती देखील कर्नल आहेत. त्यातच त्यांनी आत्महत्या केली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

पंढरपूर आगारातील मेकॅनिकल दशरथ गिड्डे यांची आत्महत्या,  आर्थिक विवंचेला कंटाळून गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या  

पंढरपूर आगारातील मेकॅनिकल दशरथ गिड्डे यांची आत्महत्या,  आर्थिक विवंचेला कंटाळून गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या  

कर्नाटकात जाताना आता कोणतीही अट नाही, RTPCR नसताना सुद्धा कर्नाटकात प्रवेश करता येणार

कर्नाटकात जाताना आता कोणतीही अट नाही,


RTPCR नसताना सुद्धा कर्नाटकात प्रवेश करता येणार,


सीमा भागातील नागरिकांना मोठा दिलासा,


कर्नाटक सरकारने प्रवेशाबाबतचे नियम केले शिथिल,


दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मिळणार दिलासा,


आज मध्यरात्रीपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

 मुक्तिभूमीवर धर्मांतर घोषणेचा 86 वा वर्धपान दिन

 हिंदु म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या येवल्याच्या मुक्तीभूमीवर केली त्याचा आज 86 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.येवला तालूक्यात करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सलग दुस-या वर्षी साधेपणाने हा साजरा करण्यात येत आहे. 13  ऑक्टोबर रोजी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच जागेवर धर्मांतराची घोषणा केली त्यामुळे येवल्याच्या या मुक्तीभूमीला विशेष महत्व असून दरवर्षी 13 ऑक्टोंबरला येथे मोठे कार्यक्रम होत असतात.राज्याच्या अनेक भागातून बाबासाहेबांचे अनुयायी मुक्तीभूमीवर असलेल्या स्तुपाला अभिवादन करण्यासाठी येत असतात.मागिल वर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.यंदाही येवला तालुक्यात करोनाच्या रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने  गर्दी न करता धर्मांतर घोषणेचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याच आवाहन केलेय.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक, रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार

राठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक


रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार


राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर काहीही केलं नाही


सारथी सोडलं तर इतर मुद्द्यावर दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पाळलं नाही


25 ऑक्टोबर पासून हा दौरा काढला जाणार आहे


राज्य राज्याची जबाबदारी पाळत नाही


सरकारला अल्टिमेटम दिलं होतं पण त्यानंतर त्यांनी आश्वासन पाळले नाहीत


आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची


कुणी टीका करत त्याकडे मी लक्ष देत नाही


टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा


सातारा गादी आणि कोल्हापूरची गादीमध्ये कोणताही मतभेद नाही


उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही


मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका उदयनराजे यांनी केली होती

 रत्नागिरीतील नौकेला विजयदुर्गमध्ये जलसमाधी,  धुक्यामुळे खडकावर आदळून नौका फुटली, 24 खलाशी सुखरूप,

 रत्नागिरीतील नौकेला विजयदुर्गमध्ये जलसमाधी,  धुक्यामुळे खडकावर आदळून नौका फुटली, 24 खलाशी सुखरूप, नौकेचे मोठे नुकसान. धुक्यामुळे जलमार्गातील खडकाचा अंदाज न आल्याने त्यावर आदळून रत्नागिरीतील मासेमारी नौकेला विजयदुर्गमध्ये जलसमाधी , खलाशांनी प्रसंगावधान दाखवत छोड्या डिंगीचा (लहान नौका) आसरा घेत सहकाऱ्यांना फोन करून मतदतीसाठी बोलावून घेतलं,  नौकेवरील 24 खलाशी सुखरुप , रत्नागिरी मिरकरवाडा येतील शौकत दर्वे यांच्या मालकीची ही बोट , मासेमारी करून ते आज पहाटे परतत असताना धुक्यामुळे विजयदुर्ग येथील जलमार्गामध्ये असलेल्या खडकावर आदळल्याने पुढील काही भाग फुटला आणि समुद्राचे पाणी नौकेमध्ये शिरून मच्छीमारांच्या डोळ्यासमोर नौका बुडाली

नाट्यगृह आणि थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करावीत, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

22 तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह 50 टक्के क्षमेतनं सुरु होणार आहेत.. मात्र नाट्यगृह आणि थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात यावीत म्हणून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय..

मद्यधुंदाना मस्ती ; वारकरी शिल्पांची केली तोडफोड, आरोपींची पोलीसांनी मस्ती उतरवली

 


दहिसर पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराजवळ विठ्ठल चौकात बांधलेल्या वारकरी समाजाच्या पुतळ्याची दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली होती.यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होत होता. या घटनेतुन अनेकांना प्रश्न पडला होता की का केलं असेल कोणी किंवा तोडफोड करणार्यांनी हे करू काय साध्य केलं.या घटनेबद्दल चिंता व्यक्त होत असताना अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात.

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 13 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Maharashtra Collage Reopen : महाविद्यालयं सुरु होणार? आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
 
Maharashtra Collage Reopen : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर, कालपासून पुण्यात सुरु झालेले कॉलेज पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जोपर्यंत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत कॉलेज सुरु करणार नसल्याचं अनेक शिक्षण संस्थांच्या प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे. राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता व्हीसीद्वारे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सोबत बैठक घेणार आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल? कशा प्रकारच्या गाईडलाईन्स तयार कराव्या लागतील? याशिवाय वस्तीगृह सुरु करणं आणि इतर बाबींवर सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशीसुद्धा चर्चा करतील आणि त्यानंतर महाविद्यालय दिवाळीनंतर नेमकी कधी सुरु करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. 


DC vs KKR Qualifier 2: दिल्लीचे दंबंग की, कोलकाताचे फायटर्स; कोण मारणार बाजी? काय सांगतात आकडे?


Delhi vs Kolkata, Qualifier 2 : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) एकमेकांविरोधात मैदानावर उतरणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खराब कामगिरीनंतर कोलकाताच्या संघानं दुसऱ्या टप्प्यात कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) च्या नेतृत्त्वात उत्तम खेळी करत वापसी केली. आयपीएल 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण कोलकातासमोर दिल्लीचं आव्हान आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या संघानं पॉइंट्स टेबल (Points Table) मध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. अशातच आज दिल्ली किताबावर नाव पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे. 


Gati Shakti Yojana: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'गति शक्ति' योजनेची सुरुवात, काय आहे ही योजना? 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आर्थिक क्षेत्रांसाठी महत्वाच्या असणाऱ्या  प्रधानमंत्री गति शक्ति राष्ट्रीय मास्टर योजनेची (Gati Shakti scheme) सुरुवात करणार आहेत. हा प्लान रेलवे, रस्त्यांसह अन्य 16 मंत्रालयांना जोडणारा एक डिजिटल मंच आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी संबोधित करताना या योजनेबाबत घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं होतं की,  गती शक्ति योजना लवकरच लॉन्च केली जाणार आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी योजना असेल. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. ही योजना देशाचा मास्टर प्लान बनेल जो इंफ्रास्ट्रक्चरचा पाया असेल, असंही मोदी यांनी म्हटलं होतं.  


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.