मुंबई :  राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुकुमार श्रीवास्तव हे 1986 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. माजी मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती आज निवृत्त झाले. राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आज निवृत्त झाले.


मनुकुमार श्रीवास्तव सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. श्रीवास्तव यांना गायनाचा छंद आहे. दररोजच्या बिझी शेड्यूलमधूनही ते आपल्या छंदासाठी वेळ काढतात. सुमधूर आवाजामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं युट्यूब चॅनेलही आहे. त्या माध्यमातून ते आपली विविध गाणी प्रेक्षकांना ऐकवत असतात.


मनुकुमार श्रीवास्तव यांनी 22 व्या वर्षी भारतीय पोलिस सेवेत निवड झाली. राज्य सरकारने चक्रवर्ती यांची 30 नोव्हेंबर 2021 ला मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव  देबाशिष चक्रवर्ती यांना सहा महिन्याची  मुदतवाढ देणार होती, परंतु केंद्र सरकारने  परवानगी नाकारली.  त्यावेळी मुख्य सचिवपदासाठी श्रीवास्तव यांच्या नावाची चर्चा होती. 


राज्याचे नवे सचिव मनुकुमार श्रीवास्तव  हे त्यांच्या गायनासाठी ओळखले जातात. श्रीवास्तव यांचा गाण्याचा एक अल्बम देखील प्रसिद्ध झाला आहे.  या पदासाठी मनुकुमार श्रीवास्तव (गृह), सुजाता सौनिक (सेवा), मनोज सौनिक (अर्थ) आणि नितीन करीर (महसूल) हे चार जण शर्यतीत होते. अखेर मनुकुमार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 


संजय पांडे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त


संजय पांडे यांच्या आधी सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे राज्याचे पोलिस महासंचालक होते. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार व्हावं लागल्यानंतर त्यांच्या जागी नगराळेंनी मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पांडे यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी वर्णी लागली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



Maharashtra New DGP : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती