Maharashtra Live Updates: गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट; पासपोर्ट अखेर रद्द 

Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 23 Oct 2025 03:39 PM
सुलतानपूरमध्ये अजूनही नुकसानीची मदतच नाही; लोकांनी दिलेल्या मदतीवरच दिवाळी साजरी

सीना नदीला आलेल्या महापुरात राहुलनगर (सुलतानपूर) हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. गावाशी संपर्क तुटल्याने अनेक दिवस कोणीही मदतीसाठी पोहोचू शकले नाही. पूर ओसरल्यानंतरही घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावातील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांचे घर आणि दीड एकर ऊसाचे नुकसान झाले असूनही शासनाकडून फक्त पिक नुकसानीचे अकरा हजार रुपये मिळाले आहेत. घराच्या नुकसानीसाठी मात्र एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. अशीच अवस्था इतर शेतकऱ्यांची असून, गावकरी सांगतात की यंदाची दिवाळी लोकांच्या मदतीवरच साजरी करावी लागली. पूरानंतर शासनाने दिलेल्या मदतीचे आश्वासन हवेतच राहिल्याने सुलतानपूरचे नागरिक अजूनही तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये जगत आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Live Updates: महाविकास आघाडीत नव्या भिडूवरुन रणकंदन सुरु असतानाच आता भाई जगतापांच्या बॉम्बमुळे आता नवा ट्विस्ट आलाय. मुंबईत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाई जगतापांनी केलंय. मुंबईत मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाई जगतापांच्या या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.