Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

मुकेश चव्हाणLast Updated: 21 Apr 2025 06:19 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली....More

गेवराई तालुक्यातील वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला

बीड ब्रेक: गेवराई तालुक्यातील वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू


Anc: बीडमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. माजलगाव शहरात खुणाचे दोन प्रकरण ताजे असताना आता गेवराई तालुक्यातील वाहेगाव येथे आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला झाला आहे. याप्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. 


घटना 16 एप्रिल रोजी घडली असून या जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घराच्या गेटला वारंवार टँकर का धडकवतो? अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून गेवराई तालुक्यातील वाहेगावात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. यातील एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले असून डोकं पूर्णपणे रक्तानं माखल आहे. तर इतर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.