Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: राज ठाकरे - उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर एकत्र...More
वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने आईच्या उपचारासाठी म्हणून अंबाजोगाई येथील व्यापाऱ्याकडून 6 लाख रुपये 2024 मध्ये घेतले होते ते परत न केल्याने आता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुधीर चौधरी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला
40 अंश डिग्री सेल्सिअस च्या वर जिल्ह्याचे तापमान
वाढत्या उष्णतेत रायगड कर हैराण
उष्णतेत दिलासा मिळण्यासाठी नागरिकांची थंड पेयांना पसंती
- सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी
- डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने हिला 23 एप्रिल पर्यंत कोठडी
सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी सुनावली पोलीस कोठडी
आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती.
तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती
आरोपी महिलेने मृत डॉक्टरांना नेमका त्रास कसा दिला, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहेत का?
याचा तपास करण्याचा असल्याने पोलीस कोठडी सुनावण्याची सरकारी पक्षाचा युक्तिवाद
- दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली
नाशिकच्या येवल्यात जनावरांचे मास वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पाहणी करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात गोरक्षक जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली येथे रस्ता करण्यात आलाय. यावेळी रस्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली.
सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येप्रकरणी आरोपी महिलेला काही वेळात कोर्टात केले जाणार हजर
आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअपधून कोर्टाकडे घेऊन निघाले
दुपारी दीड च्या सुमारास सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी केले जाणार हजर
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत संबंधित महिलेचा केला होता उल्लेख
त्याच चिट्ठीवरून डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन याने पोलिसात दिली आहे फिर्याद
रात्री 11 वाजता सदर बाजार पोलीसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात अली असून काही वेळात कोर्टात केले जाणार हजर
बीड : शहरातील अंकुशनगर भागात पाण्याच्या मोटारीची चोरी करणाऱ्या एका महिलेला स्थानिकांनी रंगेहाथ पकडले. सदरील महिला अहिल्यानगर जिल्ह्याल्या करंजी या ठिकाणाहून आज पहाटे बीडमध्ये दाखल झाली होती. अंकुशनगर भागात दिवसाढवळ्या चोरी करताना महिलेला स्थानिकांनी पकडले. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिल्यानंतर महिलेला स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलीस करतायत.
नांदेड : मांडव टाकताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना हदगांव तालुक्यातील बोरगांव हस्तरा गावात घडली. मंडप डेकोरेशन करणाऱ्या पांडुरंग आणि साईनाथ भट्टेवाडचा या मृत्यू झालाय. तर याच घटनेत शिवप्रसाद भट्टेवाड हा तरुण जखमी झालाय. मांडव टाकताना वारे सुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे आज कार्यकर्त्यांशी बोलून पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. परंतु त्याआधीच भोरमधील प्रमुख चौकांमध्ये संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांकडून भोर शहरात विविध ठिकाणी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. दादा म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, आम्ही सदैव संग्राम दादासोबत अशा आशयाचे लावण्यात आले बॅनर भोर शहरात झळकले आहेत.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारनं केलेल्या हिंदी सक्तीवरुन सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. 200 वर्ष मराठ्यांच्या अधिपत्याखाली हिंदुस्थान होता. मात्र, मराठी भाषा इतर राज्यांवर लादली नाही. मराठी माणूस सहिष्णू, त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. तर सरकार हिंदीची सक्ती करत हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.
कोस्टल रोडवरून पडून ट्राफिक वॉर्डनचा मृत्यू
ट्राफिक वॉर्डन रफिक वजीर शेख (38) यांचा मृत्यू
भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना झाली दुर्घटना
टेम्पोचा पाठलाग करत असताना कोस्टल रोडवर रोडवरील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी कोस्टल रोडच्या सुरक्षा कठड्याला धडकली
धडके ट्रॅफिक वॉर्डन रफिक शेख समुद्रात फेकले गेल्याने झाला मृत्यू
कोस्टल रोडच्या भूलाभाई देसाई रोडवरील टाटा गार्डन जवळील घटना
गावदेवी पोलिसांनी केली अपमृत्यूची नोंद
बीड : येथील तलावातून होणाऱ्या अवैध पाणी उपसांवर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बीड तालुक्यात तलावातून अवैधरित्या केला जाणारा पाणी उपसा बंद करून तलावातील मोटारीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय. जिल्ह्यातील 137 पाणी प्रकल्पात केवळ 24 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशातच बहुतांश ठिकाणी तलावातून पाणी उपसा सुरू आहे. याला रोख लावण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेतला असून बीड तालुक्यातील भंडारवाडी आणि वडगाव तलावातून होणाऱ्या मोटारीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यापुढे देखील अवैध पाणी उपसा निदर्शनास असल्यास विद्युत मोटारी जप्त करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.
रायगड : पोलीस अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांनी बजावलेले कर्तव्य पोलीस ठाण्यात ठेवलेला नीटनेटकेपणा, स्वच्छता, अध्ययावत अभिलेख ही कामगिरी पाहून वडखळ पोलीस ठाणे यंदा जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून ISO नामांकन मिळवणारे स्मार्ट पोलीस स्टेशनं ठरले आहे. रायगड जिल्ह्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडून वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना हे iso नामांकन सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
मुंबईतील आयपीएल सामन्या दरम्यान मुख्य न्यायाधीश दंडाधिकाऱ्यांचा फोन चोरीला
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्या दरम्यान मुख्य सरन्यायाधीशांचा आयफोन १४ चोरीला गेला.
वानखेडे स्टेडियमवर IPLचा सामना पाहणयासाठी मुख्य न्यायाधिश कुटुंबियांसोबत गेले असताना
गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी त्यांच्या खिशातून त्याचा फोन चोरल्याची माहिती समोर आली आहे
या चोरीनंतर अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली, त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे
मुंबई पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंबईतील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) म्हणून कार्यरत आहेत.
पुण्यात संग्राम थोपटे पाठोपाठ काँग्रसला पुन्हा धक्का
युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांचा राजीनामा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्त
पक्ष संघटनेतील अनेक बाबी पटत नसल्याचा आरोप करत दिला राजीनामा
जोतिबा डोंगर परिसरात आढळला हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह
जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिर ते गिरोली घाट दरम्यान मुख्य रस्त्यालगट लगत महिलेला दिसला मृतदेह
गळ्यावर व्रण आणि तोंडाला टॉवेल बांधलेला अवस्थेत मृतदेह असल्याने गळा दाबून खून केल्याचा संशय
कोडोली पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू
ज्योतिबा यात्रेनंतर अवघ्या काही दिवसातच प्रकार उघडकीला आल्याने खळबळ
यात्रेच्या गर्दीचा फायदा घेत कृत्य केलं असल्याचाही संशय
राजकीय घडामोडीतून वेळ काढून उद्योगमंत्री उदय सामंत क्रिकेटच्या मैदानावर
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेला अचानक ‘सरप्राईज’ व्हिजिट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे वाचायला सांगितले अन् प्रश्नही विचारले.शिक्षकांची शिकवण्याची पद्धत शाळेच्या अडचणी यावेळी समजून घेतल्या.शाळेला काही आवश्यकता असल्यास पत्र व्यवहार करण्याच्या सूचनाही केल्या. रंगरंगोटी स्वच्छतेची पाहणी करीत पोषण आहाराबाबत देखील मंत्री दादा भुसे यांनी विचारणा केली.
नाशिकच्या मनमाडमध्ये भरवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुद्वाराच्या शेतातून रात्री यशस्वीरित्या जेरबंद केले. मनमाड शहरातील नागरिक वस्तीत बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्याने शहरभर चिंतेचं वातावरण पसरलं होतं..बिबट्या शहराच्या मध्यवर्ती भागात कसा पोहोचला, यावर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती..
- मोठा स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले..
- आवाज येताच परिसरातील अनेक लोकं घाबरून घराबाहेर निघाले....
- या घटनेत अमेय बसेशंकर यांचा घरावर धातूचा तुकड पडल्यानं छतावरील भिंतीचा काही भागही तुटला.
- नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली..
- सदर धातूचा तुकडा कशाचा आहे हे कळू न शकल्याने पुढील तपास सुरू केला आहे..
- हा तुकडा पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे.
- हा तुकडा 50 किलो वजनाचा असून, अंदाजे 10 ये 12 mm जाडीचा आणि 4 फूट लांब आहे.
धाराशिवच्या भूम येथील युवा शेतकरी उदय साबळे पाटील यांनी उन्हाचा पारा चाळीशी पार जात असल्याने आणी वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी दोन एक्कर डाळिंबाच्या बागेला क्रॉप कव्हरचे अच्छादन केले आहे. क्रॉप कव्हर चे अच्छादन केल्यामुळे, फळांना उन्हापासून होणारे सनबर्निंग होत नाही, त्याशिवाय फवारण्याचा खर्चही कमी होतो, फळांची गुणवत्ता सुधारते,तर शेतकरी शेतीसाठी आता आधुनिक पर्याय वापरताना पाहायला मिळत आहेत.
मागील काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यात आमली पदार्थांबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे पोलिसांना त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे... अनेक महाविद्यालयांच्या बाजूला असलेल्या कॅफेमध्ये अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यावर कारवाई करावी सोबतच गुटखा निर्मिती ज्या ठिकाणी होते तेथे देखील कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना देण्यात आले आहे हे कोणच जिल्हा ड्रग्स फ्री झाला पाहिजे अशी भूमिका आमची असल्याचं विखे म्हणालेत... तसेच जिल्ह्यात शंभर टक्के गोमांस बंदी झाली पाहिजे असे देखील ते म्हणाले.
सोलापूर शहरात विविध भागात मागील 2-3 तासापासून बत्ती गुल
शहरातील लोकमान्य नगर, नई जिंदगी, स्वागत नगर, विजापूर रोड, सात रस्ता, मजरेवाडी सह अनेक भागात वीज गायब
वसंत विहार, शेळगी, जमखंडी पूल या भागातील महावितरणच्या डीपीला आग लागल्याने शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती
रात्री 12 ते 3 दरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागात महावितरणच्या डीपीला आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार तीन ठिकाणी आग लागली असून तिन्ही ठिकाणची आग अग्निशमन दलाने विझवली
मात्र मागील रात्री 2 पासून शहरात वीज गायब असल्याने नागरिक मात्र त्रस्त
आधीच शहरात दिवसभरात तापमान जास्त असल्याने रात्री देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतोय त्यामुळे नागरिक हैराण झालेत
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल...घैसास दोषी असल्याचा ससून हॉस्पिटलचा अहवाल...वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका...
मनसेच्या संदीप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.
अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड...नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ...पाणी चोरीला जावू नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, पाहा एका क्लिकवर