Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद आज बैठकीत उमटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे....More
पांडुरंग बरोरा हे शहापूर चे माजी आमदार असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून 2014 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्याने शिवसेनेत प्रवेश केला व शिवसेनेतून 2019 ला त्यांचा पराभव झाला, तर 2024 च्या विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षा कडून लढवली होती यावेळेस त्यांचा अवघ्या 1300 मताने निसटचा पराभव झाला, त्यांचे वडील महादू बरोरा हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कडून 4 टर्म शहापूर विधानसभेचे आमदार होते.
पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपा ची ताकत शहापूर विधानसभेत वाढणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड- चिपळूण हायवेवर घाटमाथा गावच्या हद्दीत तमाशा कलावंतांच्या वाहनाला अपघात..
अपघातात 25 कलावंत जखमी झाले असुन त्यापैकी 5 कलावंत गंभीर जखमी झाले आहेत...
चिपळूणहुन कराडच्या दिशेने येताना टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती..
सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून जखमीना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे पहायला मिळाले..
अखेर खाजगी वाहनाने अपघातातील जखमींना हेळवाक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे...
घटनास्थळी घाटमाथा गावचे पोलीस पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक यांनी अपघात ग्रहस्थाना मदत केली आहे..
जालन्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीत चितेवर झोपून आंदोलन सुरू केलंय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत कारभारी म्हसलेकर या शेतकऱ्याने हे आंदोलन सुरू केलंय,दरम्यान आंदोलकांने यमाचा(मृत्यू देवतेचा) फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखं अनोख आंदोलन सुरू केलंय .
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गोपनीय साक्षीदाराचा जबाब माझा च्या हाती
गोपनीय जबाबा नुसार सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे जिवलग मित्र
प्रतीक घुले हा रिक्षा चालवत असे तर सुधीर सांगळे याचे हॉटेल गंगा माऊली साखर कारखाना या ठिकाणी होते
तर टोळी प्रमुख सुदर्शन घुले हा साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करत होता
प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे सुदर्शन घुले यास भाऊ मानत होते. ते त्याला भावा म्हणूनच बोलवायचे..
या तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत होती
तिघेही वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचे काम करत होते. असा जबाब गोपनीय साक्षीदाराने तपास यंत्रणे कडे दिला आहे.
राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार - मंत्री लोढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तीन करार होणार
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती
प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीने आयटीआयमध्ये मिळणार प्रशिक्षण आणि रोजगार
द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरु करणार
स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी दे आसरा संस्थेसोबत तिसरा करार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास विभाग तीन करार करणार
इनोव्हा कार मधील डिक्कीत बॅाडी असल्याचा व्हिडिओ व्हायरल
डिक्कीतून बाहेर हात निघाला असल्याचे दाखवून ही बॅाडी आहे का असा प्रश्न विचारत व्हिडिओ व्हायरल
रिल साठी काही तरूणांकडून हे कृत्य
सानपाडा भागातील रस्त्यावर हा व्हीडीओ घेतला असल्याने सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज दिला जाणार
एसटी कर्मचाऱ्यांचा सात एप्रिल रोजी फक्त 56% पगार आल्याने एसटी कर्मचाऱ्यांची मोठी नाराजी झाली होती
त्यानंतर परिवहन मंत्री आणि परिवहन विभागाकडून तातडीने बैठका घेत एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार देण्यासंदर्भात निर्णय झाला
यामध्ये आज मंगळवारी उर्वरित 44 टक्के पगार एसटी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे...
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तातडीने मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी स्वतः मागील आठवड्यात वित्त सचिवांची भेट घेतली होती त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वित्त विभाग सचिवांशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली होती
शिवरायांची समाधी कोणी शोधली यावर रोहित टिळकांची प्रतिक्रिया
- इतिहासाच्या संदर्भातून आपण निष्कर्ष काढत असतो.
- त्या काळात रायगड हा ब्रिटिश मिलिटरीच्या ताब्यात होता. तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नव्हती.
- त्यावेळी डगलस नामक ब्रिटिश अधिकारी रायगडावर गेला होता, त्याने सांगितले की शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी बराच कचरा साचला आहे.
- याबाबत बॉम्बे बुक या पुस्तकात त्याने याबाबत लिहिले आहे. त्याने त्याकाळी लोकांना आवाहन केले होते की, तिथे समाधी अशा स्थितीत आहे.
- त्यानंतर त्या समाधी स्थळी साफसफाई सुरू झाली होती.
- लोकमान्य टिळक यांनी परवानगी घेऊन तिथे गेले, महात्मा फुलेदेखील तेथे गेले होते.
- त्यामुळे इतिहासाला धरून यावर बोलले जाते. त्यामुळे यात कोणी केले आणि कोणी नाही हे पाहण्यापेक्षा त्यांचे कार्य मोठे आहे.
- इतिहासात काही संदर्भानुसार आपण बोलतो, काही वर्तमान पत्र, पुस्तकं यावरून बोलतो.
- डगलस हा अधिकारी तेथे गेल्यानंतर राज्यात मोठ्या चळवळी सुरू झाल्या.
- लोकमान्य टिळकांनी त्याबाबत पुण्यात मोठी सभादेखील घेतली होती.
- त्यात त्यांनी सांगितले की शिवरायांची जयंती साजरी व्हायला हवी, सर्वानी तिथे गेले पाहिजे.
- मुळात हे सर्व इतिहासाच्या रेफरन्सवर बोलले जाते त्यामुळे आपण ठोसपणे ते सांगू शकत नाही. म्हणून त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा खामगाव दरम्यान मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस व टिप्पर समोरासमोर धडकून भीषण अपघात.
अपघातात टिप्पर मधील तीन मजुराचा मृत्यू तर मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधील 24 प्रवासी जखमी.
जखमी प्रवाशांमधील सहा जणांची प्रकृती चिंताजनक.
सर्व जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस अकोलाहून इंदोर कडे जात असताना खामगाव नांदुरा दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या धडकून झाला भीषण अपघात.
- उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेनेही लागू केला ग्रामीण भागात 'हीट ॲक्शन प्लान'
- या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत
- ग्रामीण भागात सध्या खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे तसेच मनरेगाअंतर्गत काम करणारे मजूर आणि शेतकरी दिवसभर उन्हात मेहनत करतात
- उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्माघात होण्याचा धोका अधिक असतो
- त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत
- या शीतकक्षांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र दोन खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत, तसेच कुलरची सुविधा, पिण्याचे पाणी आणि आपत्कालीन औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे
चंद्रपूर : चिमुर शहरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार... पीडित मुली 10 आणि 13 वर्षीय असून पीडित मुली ज्या भागातील रहिवासी आहे त्याच भागातील आहे 2 आरोपी, गेल्या 6 महिन्यांपासून पीडित मुलींवर सुरु होते अत्याचार, काल पीडित मुलींनी पालकांकडे सांगितली आपबीती, त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध दाखल केला गुन्हा, मात्र आरोपीनां फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शेकडो लोकांनी चिमुर पोलीस स्टेशन ला केला घेराव, रस्त्यावर टायर पेटवून नागरिकांनी घटनेचा केला निषेध, लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज, लोकांनीही पोलीस स्टेशन वर दगडफेक केल्याचीही प्राथमिक माहिती, दोन्ही आरोपी अंदाजे ५० वर्ष वयाचे असून त्यांना तातडीने करण्यात आली अटक, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिस्थिती तणावपूर्ण
Nagpur : एखाद्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वाक्षरीचा वापर बोगस नियुक्तीसाठी होत असेल तर तुम्ही काय म्हणणार. असाच धक्कादायक प्रकार नागपुरातील 580 बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये झाल्याचा आरोप होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील 580 बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे... सोमेश्वर नैताम नावाचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळांचे शिक्षणाधिकारी हे 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झालाय.. मात्र जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट मंडळींनी हयात नसलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीचा वापर करून 2016 ते 2024 दरम्यान 100 पेक्षा जास्त शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा आरोप आता होत आहे... विशेष म्हणजे सोमेश्वर नैताम हयात नसताना त्यांची बोगस स्वाक्षरी वापरून शिक्षकांची नियुक्ती बॅक डेट मध्ये म्हणजेच 2016 च्या आधीच्या कालावधीत दाखवण्यात आली आहे.. त्यामुळे शिक्षकांची बोगस नियुक्ती हयात नसलेल्या अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करून करण्यात आल्याचे गंभीर प्रकार नागपुरात घडल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे..
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील भाजपात प्रवेश करणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश
पंडित पाटील शेकापचे नेते जयंत पाटील यांचे बंधू
शेकापसाठी आणि जयंत पाटील कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे
सांगलीच्या कुपवाड भागात मोक्यातील आरोपीचा मध्यरात्री खून करण्यात आलाय.समीर रमजान नदाफ (वय ३५, संजयनगर) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी कुपवाड पोलिसांकडून या खून प्रकरणातील संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू झाला आहे.कुपवाड भागातील मेनन पिस्टन चौक परिसरात ही घटना घडली.
- नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल
- प्रशासनाला कारवाईचे आदेश
- ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार असल्याची शक्यता
- बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना
- नागपूर विभागात झालेल्या ५८० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु
- प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख रुपये घेतल्याची सुत्रांच्या माहिती
- बोगस शिक्षकांच्या बॅंक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदी पोलीस तपासणार
पुण्यात पुन्हा ऊन वाढणार
पुणे शहरात पुढील ६ दिवस तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस डिग्री पर्यंत जाणार
पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज
सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान १ ते २ अंश सेल्सिअस डिग्रीने वाढणार
पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उकाडा सहन करावा लागणार
सोमवारी राहिलेलं शहरातील विविध ठिकाणचे तापमान
शिवाजीनगर ३९.२
कोरेगाव पार्क,मगरपट्टा, ३८.९
हडपसर येथे ३८.८
वडगाव शेरी येथे ३८.४
चिंचवड येथे ३८
एनडीए येथे ३७.६
अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत दोन दिवसांत सुनावणी होणार
रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई अटळ; महापालिकेचा इशारा
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला ७ एप्रिलला बजावली होती नोटीस
अजूनही कर भरला नसल्याने कारवाईचा इशारा
करासंदर्भातलं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ज्यावेळी कोर्ट सांगेल त्यावेळी कोर्टाचा आदेश पाळला जाणार असल्याचं दीनानाथ रुगणालयाच्या डॉ केळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल होणार
ड्रग्ज प्रकरणातील 35 पैकी 14 आरोपी कारागृहात, तर 21 आरोपी अजूनही फरार
गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक
14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी टोल नाक्यावर ड्रग्जसह तिघांना घेण्यात आलं होतं ताब्यात
ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याच तपासात उघड
व्हॉट्सअॅप ग्रुपवरील चर्चेतून धमकी अभिनेता सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरात वडोदरा येथील रहिवासी असून मयांक पांड्या(२५) असे त्याचे नाव आहे.
आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे वरळी पोलिसांनी त्याला नोटीस दिली आहे.
आरोपीला स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर सलमान खान व गुंड लॉरेन्स बिष्णोई यांच्या वादाबद्दल माहिती मिळाली होती.
तसेच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यापूर्वीही धमकी आल्याचे समजले होते त्यातून त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले आहे.
तरूणाविरोधात यापूर्वी कोणाताही गुन्हा दाखल नाही. तसेच त्याचे आई-वडील गुजरातमध्ये नोकरी करतात. आरोपी बेरोजगार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नेरूळ, नवी मुंबई येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते.
कागलमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा आज भाजप प्रवेश
मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश
संजयबाबा घाटगे विधानसभा निवडणुकीपासून होते भाजपच्या संपर्कात
एकसंध शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गट आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास
भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमध्ये घेणार मेळावा
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...