- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Updates: सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडले भुयार
Maharashtra Live Updates: सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडले भुयार
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएस हेडक्वार्टर उध्वस्त करा, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. सगळे खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले लोक दीक्षाभूमीवर ओळीने उभे करा आणि मग त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकायला लोक तयार होतील असे अंधारे म्हणाल्या. खबरदार, तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापराल तर याद राखा असा इशारा देखील अंधारे यांनी दिला.
आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरुन नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याबद्दल आम्हाला नोटीस काढावी लागेल, असं मी काल सांगितलं होतं. त्या पद्धतीने नोटीस काढली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागला तर कोणताही पक्ष सहन करणार नाही असे अजित पवार म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे,अवैध रेती वाहतुकीस विरोध करणाऱ्या तलाठ्यास ट्रॅक्टर वरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महसूल कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध रेती उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात महसूल विभागाचे पथक गेले असता,काही ट्रॅक्टर त्या ठिकाणी अवैध रेती उपसा करत असल्याचे दिसून आले होते,यातील एक ट्रॅक्टर जप्त करून तहसीलदार कार्यालयात नेण्यात येत असताना, ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी जडे यांना,चालक आणि मालकाने ट्रॅक्टर वरून खाली फेकून देत,ट्रॅक्टर पळून नेले. या घटनेमध्ये तलाठी जडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले आहे. त्याचबरोबर चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणांमध्ये लोंढे टोळीचा म्होरक्या माजी नगरसेवक प्रकाश लोंढे , दिपक लोंढे याच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले असताना प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाची झडती घेताना एक भुयार सापडले आहे. या संदर्भात नाशिक पोलीस अधिक तपास करत असून लोंढे टोळीवर असलेल्या इतर गुन्ह्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार राडा झालाय. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधील दोन गटात झालेला हा हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमकी ही हाणामारी कुठल्या कारणामुळे झाली हे समजू शकलेले नसलं तरी सुद्धा भारती विद्यापीठ पोलिसांनी या व्हिडिओचा आधार घेत शोध सुरू केला आहे. दोन गटात झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली असून यासंदर्भात भाजपचे नेते तथा राज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता, "खूप वेळा भेटी होतात मात्र यांचे सुत काही जुळत नाही आणि कितीही भेटीगाठी झाल्या तरी महायुतीला याचा फरक पडणार नाही... जनतेचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आहे असे वक्तव्य त्यांनी या भेटीवर केले.
गोसीखुर्द धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागावे यासाठी, मागील आठ दिवसांपासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपार निवासी आंदोलन सुरू केलं आहे. पालकमंत्री पंकज भोयर आज हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ते येण्याच्यापूर्वीच गोसेखुर्द प्रकल्प बाधितांनी मुंबई - कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असून काही आंदोलनकर्त्या महिला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी ही प्रकल्प बाधित तीन महिला झाडावर चढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन थांबविल होत. आज पुन्हा एकदा प्रकल्पबाधितांनी आंदोलन केल्याने प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुणे : शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रोड परिसरातील ओम मार्केटमध्ये भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र लाखोंचा माल जळून खाक झाला असल्याचे प्राथमिक अंदाज आहे
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे. घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरात घडली आहे. या प्राण घातक हल्ल्यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या असून एकीची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री साडेअकरा वाजता 10 ते 15 जणांच्या टोळक्याने पारधी वस्तीवर हल्ला चढवला. हातात दांडगे कोयते आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ झालेल्या गंभीर पीडित महिलांनी शिरूर पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी प्रथम उपचार करण्यासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान शिरूर पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिडीतेचा जवाब नोंदवण्याचे कार्य सुरू आहे. अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता म्हणून टोळक्यांनी जबर मारहाण केली. पीडित महिला बचावासाठी आरडाओरडा करत होत्या. किंकाळत होत्या तरी देखील टोळक्यांना महिलांची दया आली नाही.
राज ठाकरे मातोश्री या निवासस्थानी
उद्धव ठाकरे यांच्या भेटीला राज ठाकरे मातोश्री या निवासस्थानी दाखल
स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आल्याची माहिती
मातोश्री येथे दाखल
कौटुंबिक भेट असल्याचं राज ठाकरे यांनी दिली माहिती
कौटुंबिक भेट आहे आई सोबत आहे
कसल्या महापालिका
पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला
शहराच्या दोन मुख्य भागांना जोडणारा पूल म्हणजेच बाबा भिडे वाहतुकीसाठी कालपासून पुन्हा सुरू करण्यात येणार
गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे बंद असल्याने नागरिकांना होत होती गैरसोय
आज पासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत वाहनांसाठी बाबा भिडे सुरू करण्यात येणार
दिवाळीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे
मेट्रोच्या पदाचारी मार्गाच्या कामासाठी भिडे पूल एप्रिल महिन्यापासून वाहतुकीसाठी होता बंद
१८ एप्रिल पासून भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्यात आडवा पडला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा ट्रक हटवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे . वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत
जोगेश्वरीत श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या इमारतीच्या 22व्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडून मृत्युमुखी पडलेल्या 22 वर्षीय संस्कृतीला न्याय मिळवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. या मार्चमध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी बिल्डरविरोधात घोषणाबाजी केली. "नो बेल, ओन्ली जेल" असा नारा देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. अमित साटम यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांसोबत चौकशी व सुरक्षा ऑडिटबाबत चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं.
वसई : ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री १० वाजल्यापासून सुरु झाले आहे. त्यामुळे आज ठाणे तसे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातिवली पर्यंत प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. हे दुरुस्तीचं काम मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक विभागाने पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत.
आज या महामार्गावर निघालेल्या वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा फटका बसला आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम ऑगस्टमध्ये घेण्यात आले होते. मात्र ते काम निम्मेच झाले असल्यामुळे तसेच नवरात्रीत वाहनचालकांना त्रास होवू नये म्हणून उर्वरित दुरुस्तीचे काम आता घेतले आहे. यात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या काळावधीत जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पालघर कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना पालघरच्या मनोर, विरारच्या शिरसाट फाटा तर वसईच्या कामण भिवंडी रोड येथून पर्यायी मार्ग सुचवले आहेत. अति आवश्यकता असेल तरच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा अन्यथा लोकल ट्रेनचा वापर करण्याचे आवहान राष्ट्रीय महामर्गाचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी केलं आहे.
धुळे: शिरपूर तालुक्यातील सुळे फाटा (NH-52) येथे दरोड्याच्या उद्देशाने जमलेल्या पाच पैकी चार अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, एक जण फरार आहे. गस्तीवरील पोलिसांनी कारवाई करत दोन गावठी कट्टे आणि 11 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी पुणे जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुणे : "मनाचे श्लोक" चित्रपटाचा शो बंद पाडणे उज्वला गौड यांना महागात पडले. शुक्रवारी सिटीप्राइड थिएटरमध्ये उज्वला गौड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा शो बंद पाडला. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा हा सरकारी कामात अडथळा आणणे आणि थिएटरमध्ये गोंधळ घालणे या कारणांवरून दाखल झाला आहे. "मनाचे श्लोक" या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांचा विरोध असून, समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धाराशिव : महापुरानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. चारा टंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना दावणीची जनावरे विकावी लागत आहेत. सोयाबीन काढणीसाठी पैसा नाही, त्यामुळे जनावरे विकून खर्च भागवण्याचा पर्याय निवडला आहे. दोन बाजारात जनावरे घेऊन फिरतोय, पण गिऱ्हाईक नाही आणि बाजारात भावही मिळत नाही, अशी खंत शेतकऱ्याने व्यक्त केली. सध्या गुरे जगवणेही कठीण झाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून तत्काळ मदतीची गरज आहे.
- नाशिक शहर पोलिसांनंतर ग्रामीण पोलीसही ॲक्शन मोडमध्ये
- सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या गुंडांचा पोलिसांनी उतरवला माज...
- हातात हत्यार घेऊन आक्षेपार्ह मजकूर टाकत सोशल मीडियावर रील व्हायरल करत केला होता दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न...
- नाशिक ग्रामीण पोलिसांच्या लासलगाव पोलिसांनी केली कारवाई...
निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस
इंटरपोल ने जारी केली घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर" नोटीस
पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी
फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते
घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत
दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते
पुण्यातील "टॅयरुम पब" मध्ये शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत रात्री १:३० नंतरही मद्य विक्री केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्री दीडनंतर पहाटे ३ वाजेपर्यंत मद्य विक्री होत असल्याचे निदर्शनास आणत पब बंद पाडला. मनसेने स्पष्ट केलं की, बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्टच्या कलम 11(3) आणि शासन धोरणानुसार रात्री १:३० नंतर मद्यविक्रीस मनाई आहे. याप्रकरणी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केलेत. पेट्रस गायकवाड रुजू झाल्यापासून त्यांनी कारागृहातील भजन, आरती आणि नमाज पठण बंद केले. तसेच कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी गायकवाड दबाव टाकतात. तर ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी पैशांचे आमिष देखील दाखवितात असा आरोप खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या कल्याण भावले या कैद्याने केलाय.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधकांमधील बड्या नेत्यांना दारं खुली करणार
भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, त्यांना पक्षात घ्या
मात्र, भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्या
कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश
मिनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी भाजपची रणनीती ठरली
नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील लासुरगावात खदानीतील पाण्याचा अंदाज आला नसल्याने पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयूर किशोर मोईन (१५) आणि साहिल संतोष झाल्टे (१५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृत दोघेही महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होते.
पोलीस विभागाकडून राबवण्याल्या जातं असलेल्या तक्रार निवारन उपक्रमाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः उपस्थित राहून दोन्ही पक्षकारांच्या बाजू एकूण तक्रारीचे निवारन केले. शिवाय पक्षकारांना मार्गदर्शन देखील केले.भाग्यनगर पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. दर शनिवारी विविध पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली. घरगुती असो किंवा फसवणूक असो या याशिवाय इतर प्रलरणाची तक्रार केल्यानंतर ही महिना महिना तक्रारीचे निवारण होतं नाही. तक्रारदारांना पोलीस ठाण्याचे खेटे मारावे लागत. त्यामुळे तात्काळ आणि जागेवर तक्राराचे निवारण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम रावण्यात येतं असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.
रायगड पोलिसांच्या वतीने महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत शिवपराक्रमगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात #गोष्ट इथं सम्पत नाही" या गाथेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य व राज्यकारभार , रयत हिताची धोरणे, महापराक्रम यांची अप्रतिम मांडणी करण्यात आली.या कार्यक्रमाचे उदघाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व राज्यकारभारातून कर्तव्यनिष्ठ , शौर्य आणि लोकसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रम प्रसंगी रायगड पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व पोलिसांच्या कुटुंबीयांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतला.
दिवाळी आणि नाताळाच्या सुट्ट्या लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पहाटे एक वाजता खुले होणार आहे. मंदिरातील गर्दीचे दिवस मंगळवार शुक्रवार आणि रविवारी पहाटे एक वाजता देवीचे चरण तीर्थ होईल. सकाळी सहा ते दहा दरम्यान अभिषेक होणार आहेत. अभिषेक पूजेदरम्यान दिले जाणारे देणगी दर्शन पास बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थांना दिली आहे. सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कळवणमध्ये बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर पोलिस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीचा प्रतिघात आता दंगेखोरांना बसला आहे.कळवण पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १४ दंगेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या आरोपींना न्यायालयात नेत असताना कळवण शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली, त्यामुळे दंगेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे एकवेळ पुन्हा सिद्ध झाले आहे..या दगडेकीप्रकरणी कळवण, मानूर, पाळे खुर्द, जिरवाडे आदी गावांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.स्थानिक नागरिक पोलिसांना सहकार्य करत असून CCTV फूटेज व मोबाइल लोकेशनच्या आधारे तपास अधिक वेग घेत आहे.
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटे या ठिकाणी वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अकरा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण स्थगित करण्यात आलं आहे... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल आहे... निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी पालकमंत्र्यांचा निरोप आंदोलकांना पोहोचवला असून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतला...या आंदोलनाला समर्थन देण्याचा भाग म्हणून आज राज्यात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, उपोषण स्थगित केल्यामुळे चक्काजाम आंदोलन देखील रद्द करण्यात आल असल्याच आंदोलकांनी म्हटलं आहे.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचा विषय पेटण्याची शक्यता
जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक
कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, अशा आशयाचे पोस्टर्स वायरल
शांतीदूताच्या कबुतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरवात प्रत्येक मराठी लोकांना करावीच लागेल...
या अगोदर देखील आम्ही गिरगांवकर संघटनेने कबुतर खाण्यासंदर्भात भूमिका घेतली होती
काल जैन समाजाच्या सभेनंतर आता आम्ही गिरगांवकर संघटना आक्रमक झाली आहे
गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.... यावर्षी धान पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खास हिरावला गेला आहे. मावा तुडतुळा यासारखे रोग धान पिकावर आले असल्याने आता कापणीला आलेला धान या रोगामुळे नष्ट होत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे... आधी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले असून आता रोग किडींचा प्रादुर्भाव गोंदिया जिल्हा सर्वत्र बघायला मिळत असून शेतकरी यामुळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
दिवाळी आणि नाताळाच्या सुट्ट्या लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पहाटे एक वाजता खुले होणार आहे. मंदिरातील गर्दीचे दिवस मंगळवार शुक्रवार आणि रविवारी पहाटे एक वाजता देवीचे चरण तीर्थ होईल. सकाळी सहा ते दहा दरम्यान अभिषेक होणार आहेत. अभिषेक पूजेदरम्यान दिले जाणारे देणगी दर्शन पास बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर संस्थांना दिली आहे. सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
हाच आपल्याला दगा देईल, असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं... अनंत तरेंचं ऐकलं नाही याचा पश्चाताप.. ठाण्यात बोलताना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण.. शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही हल्लाबोल
निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून राजकारण तापलं...दबाव टाकून चुकीचा अहवाल सादर केला त्यांची पण चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा...
युतीत निवडणुका लढल्यास विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य...तर एखाद्या ठिकाणी युती न झाल्यास कठोर टीका करू नका, कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागाच्या घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा...महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणूकीच्या मैदानात उतरू अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, पंतप्रधान मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन..
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...