Maharashtra Live Blog Updates: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा कढण्यात येणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या 'हंबरडा' मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे. तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणीदेखील उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यामुळे आजच्या मोर्चातून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
Maharashtra Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा आज पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
मुकेश चव्हाण | 11 Oct 2025 06:38 AM (IST)
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
Maharashtra_Live_Blog_Updates