Solapur : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनंक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीच वाहून गेल्या आहेत. त्यामुळं आता जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. माढा तालुक्यातील दारफळ या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या गावातील विनोद मच्छिंद्र बारबोले या शेतकऱ्याचे दीड एकर जमिन पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. साधारण 20 फुटाचा खड्डा जमिनीला पडला आहे. ही सर्व परिस्थिती प्रशासनाच्या चुकीमुळं झाल्याचा आरोप बारबोले यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. 

Continues below advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंत बांधून द्यावी

विनोद बारबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वरील शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत प्रशासनाने भिंत बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. पण माझ्या शेतालगत या भिंतीचे काम प्रशासनाने पूर्ण केले नाही. त्यामुळेच माझ्या शेतात पाणी गेलं आणि जमिन वाहून गेल्याची माहिती बारबोले यांनी सांगितली. 2021 मध्ये ही भिंत बांधली आहे. तेव्हापासून जमिनीचं नुकसान होत आहे. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन माझ्या शेतात संरक्षण भितं बांधून द्यावी अशी मागणी बारबोले यांनी केली आहे. 2021 पासून बारबोले हे यासाठी लढा देत आहेत. मात्र, अद्याप त्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याची माहिती बारबोले यांनी दिली आहे. बारबोले यांच्याकडे आठ एकर क्षेतच्र आहे. 170 फूट रुंदी आणि 600 फूट लांबीचे माझे शेत आहे. यामधील दीड एकर क्षेत्र पूर्ण वाहून गेलं आहे. बारबोवे यांच्या दोन मुलांचे शिक्षण सुरु आहे. सरकारनं तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Continues below advertisement

शेतातील 20 ते 22 फूट माती वाहून गेली

शेतातील 20 ते 22 फूट माती वाहून गेली आहे. त्यामुळं ही जमिन व्यवस्थीत होण्याची शक्यता फार कमी आहे. 2021 पासून सातत्याने माझे नुकसान होत असल्याची माहिती विनोद बारबोले यांनी दिली आहे. पाटबांधारे विभागाने पाहणी करावी आणि भिंत बांधून द्यावी. भितं बांधल्यापासूनच माझे शेत वाहून जात असल्याची माहिती बारबोले यांनी दिली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं भरीव स्वरुपाची मदत करावी, अशी मागणी पूरग्रस्त भागाील शेतकरी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

सोलापूरचे जिल्हाधिकारी थेट बांधवार, पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांच्या वेदना घेतल्या जाणून, साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित