- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live: सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार : मनोज जरांगे
Maharashtra Live: सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार : मनोज जरांगे
Maharashtra live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींचे प्रत्येक अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय, राजकीय क्षेत्रातील घडामोडी
बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची आज रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
नाशिक : परप्रांतीय व्यक्तीला मारहाणप्रकरणी मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चार मराठी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मराठी कुटुंबावर अरेरावी केल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय व्यक्तीला चोप दिला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात हजर करून मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गंभीर नागरी समस्यांनी पिचलेल्या कल्याणातील एका जागरूक नागरिकाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले असून इथल्या नागरी समस्यांची कॅगद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. निशित शहा असे या नागरिकाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी पोस्टाद्वारे हे पत्र पाठवून केडीएमसीच्या कामकाजाची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कमिटीमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रामध्ये शहरातील दैनंदिन जीवन त्रस्त करणाऱ्या प्रमुख समस्या नमूद करण्यात आल्या आहेत. त्यात शहर नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाढती- अनियंत्रित वाहतूक कोंडी, सार्वजनिक आरोग्य, अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा अशा प्रमुख नागरी समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केल्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी याबाबत दावा केला आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव या एका गावात 200 पेक्षा अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. तालुक्यात तब्बल 17 हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावा प्रताप पाटील यांनी केला असून त्याबाबतचे काही पुरावे देखील पाटील यांनी सादर केले आहेत. एवढेच नव्हे तर या मतदारांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत मतदान केलं असल्याचा आरोप ही पाटील यांनी केलाय. प्रताप पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटले आहे.
धुळे : गरूडझेप मोहिम संस्थेने आग्रा ते राजगड हे 1 हजार 310 किलोमीटर पायी मोहीम शिवज्योत 17 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 27 ऑगस्टला राजगडावर पोहचेल. आज या शिवज्योतचे धुळे शहरात आगमन होताच नागवबारी परिसरात अनेक सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आहे. आग्राहून औरंगजेबाच्या तब्बल 99 दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप ही या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील तत्कालीन राज्यकत्यांनी घेतली होती. इतिहासाला कलाटणी देणारी, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेली घटना आहे. 17 ऑगस्ट 1666 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवण्यासाठी ही मोहीम पाच वर्षांपासून सुरु आहे. या मोहिमेत दोन हजार मावळे सहभागी झाले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख मारुती गोळे यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या वतीने विक्री करण्यात येणाऱ्या लाडूच्या दरात 50 टक्के वाढ करण्यात आली आहे.. बुंदी लाडू प्रसादाचा भाव 50 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार आहेत.. या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.. साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थानने ही दरवाढ केल्याच बोललं जातंय.. मात्र भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा 'व्यावसायिक' दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का? प्रश्न भाविक करत आहेत..
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून यावेळचा गणपती आम्ही अरबी समुद्रात विसर्जित करू मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन सकल मराठा मोर्चा चे समन्वयक धनाजी साखळकर यांनी केले आहे. मुंबईत दीड दिवसाचा गणपती असतो मात्र महाराष्ट्रात दहा ते तेरा दिवसापर्यंत गणपती बसत असतो. यावर्षी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार असून यंदाचा आमचा गणपती अरबी समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईकर आमच्या या निर्णयाच्या पाठीशी राहून आम्हालाही अरबी समुद्रात गणपती विसर्जन करू देतील अशी अपेक्षा धनाजी साखळकर यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत पंचवीस हजार गाड्यांची नोंदणी झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा 50 हजारापर्यंत पोहोचेल असा विश्वास साखळकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा घरी गौरी गणपती असूनही मोठ्या संख्येने मराठा महिला या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावाही साखरकर यांनी केला आहे. आज सोलापूर जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी ही सामील झाल्या होत्या.
माणगाव : गणेशभक्तांच्या सेवेसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झालाय. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर होणारी सततची वाहतूक कोंडी रोखण्याकरीता महामार्गावर नागोठणे, कोलाड, इंदापूर माणगाव, लोणेरे, लाखपाले परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक कंट्रोल अधिकारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये याकरिता पोलिस हातात कंट्रोल फोन घेऊन फेरफटका मारत आहेत. त्यामुळे माणगाव मधील वाहतूक कोंडी आता सुरळीत सुरू आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपाची तातडीची बैठक
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बोलावली बैठक
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रविण दरेकर उपस्थित राहणार
त्याचसोबत मुंबईचे सहा जिल्हाध्यक्ष आणि महामंत्री राहणार उपस्थित
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार महत्वाची चर्चा
सकाळी 9 वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक
Akola News: अकोला शहरालगतच्या गुडधी गावात दारूविरोधात मातृशक्तीचा एल्गार. गावातील अवैध दारूविक्री विरोधात महिला आक्रमक. महिलांनी एकत्र येत दारू विक्री होणाऱ्या घरांवर मारला स्वतः छापा. महिलांनी आक्रमक होत दारू विक्री करणाऱ्यांच्या घरातील दारू साठा केला उध्वस्त. महिलांच्या आक्रमकतेमुळे दारू विक्रेत्यांची पाचावर धारण बसली. महिलांनी गावात दारू विक्री होत असलेले तीन शेड आणि हातगाड्यानची केली तोडफोड. गावातील दारूच्या गुत्त्यांवर महिलांनी केला प्रचंड राडा.
गुडधी गावातील अवैध दारूविक्री विरोधात गावातील महिलांकडून अनेकदा पोलीस तक्रारी. मात्र, सिव्हिल लाईन पोलिसांचे दारू विक्रीच्या प्रकाराकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष. पोलिसांच्या आशीर्वादाने गुडधीमध्ये बिनबोभाटपणे दारू विक्री सुरू असल्याचा महिलांचा गंभीर आरोप. महिला आक्रमक झाल्यानंतर गावात पोलीस दाखल. पोलिसांचा आक्रमक महिलांना समजावण्याचा प्रयत्न. मात्र, आक्रमक झालेल्या महिला दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाईच्या मागणीसाठी आग्रही. गुडधी गावात सध्या तणावपूर्ण वातावरण.
रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती काळवीटला भरधाव जाणाऱ्या वाहनानं जबर धडक दिली. या भीषण अपघातात काळवीटच्या शरीराचे छिन्हविच्छिन्न अवशेष बाहेर पडलेत. अपघातात काळवीटचं पोट आणि गर्भपिशवी फाटल्यानं तिच्या पोटातील पाडस जिवंत बाहेर पडलं. पाडस जिवंत आणि सुखरूप असल्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर तातडीनं भंडारा इथं प्राथमिक उपचार केलेत. या पाडसला आता पुढील उपचाराकरिता नागपूर इथं पाठविण्यात आलं आहे. ही घटना भंडारा वन विभागाच्या शहापूर इथं घडली.
Nashik News : नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच कळवणच्या पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर धरणातील पाणी पातळीत वाढ होऊन धरण जवळपास 82 टक्के भरले आहे.. धरणात येणा-या पाण्याचा साठा पाहता धरणाचे तीन दरवाजांमधून २२३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे..प्रशासनाने नदी काठच्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे..पाणी पातळी वाढल्यास टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात कोंढरी गावाच्या हद्दीत रस्त्यावर मातीसह दरड कोसळल्याची घटना
घाट माथ्यावर गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यान, माती दगडासह झाडे झुडपांचा राडारोडा रस्त्यावर आला वाहून
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा राडारोडा वाहून आल्यान, हा मार्ग काहीकाळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता..त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या..
भोर प्रशासन आणि ठेकेदाराकडून jcb च्या साह्याने राडारोडा बाजूला केल्यानंतर, काही तासातच या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली..
तर काहींनी या मातीच्या राडारोड्यातून वाहने काढण्याचा प्रयत्न केल्यानं, ही वाहनं मातीत रुतून बसल्याचे पहायला मिळालं.. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत ही रूतलेली वाहनं मातीतून बाहेर काढण्यास वाहन चालकांना मदत केली..
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असल्यामुळे डोंगरदऱ्यातून पाण्याचे पाझर फुटलेत, त्यामुळं अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय..त्यामुळं प्रवास करताना रस्त्यात घाट माथ्यावर प्रवाशांनी थांबू नये, तसेच काळजी घेऊन या मार्गावरून प्रवास करावा असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलयं.
बोईसर मध्ये बोईसर सिडको बायपास रोडवर तासाभरात सहा बाईकचे अपघात .
नवीन तयार केलेल्या काँक्रीटवर चिखलामुळे बाईक स्लीप होण्याचे प्रकार वाढले .
तासाभरात झालेले वेगवेगळे सहा अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद .
बाईक घसरून अनेक जण पडले .
12 ते 13 बाईकस्वारांना किरकोळ दुखापत सुदैवाने मोठी दुर्घटना नाही .
रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचा स्थानिकांचा आरोप .
इंदोर - पुणे महामार्गावर येवला तालुक्यातील अंकाई जवळ शनिवारी सायंकाळी कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती..येवला व मनमाड या दोन्ही बाजूंना १० ते १५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या..कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी अजूनही ती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही..चुकीच्या लेनमध्ये वाहन लावल्याने अधिकची कोंडी वाढली असून मनमाडकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे..सातत्याने होत असलेल्या कोंडीमुळे अवजड वाहनांसाठी बायपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे..
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी उद्या धावणार विशेष एक्सप्रेस.
उद्या दुपारी दादर वरून १:३० वाजता कोकणात जाण्यासाठी सुटणार शिवसेना एक्सप्रेस
शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणार शिवसेना एक्सप्रेस
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी उद्या धावणार विशेष एक्सप्रेस.
उद्या दुपारी दादर वरून १:३० वाजता कोकणात जाण्यासाठी सुटणार शिवसेना एक्सप्रेस
शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणार शिवसेना एक्सप्रेस
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित
सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी
गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघाला
रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव शहरात वाहतूक कोंडी
मुंबई गोवा महामार्गात वाहतूक पोलिस तैनात.
रविवार असल्याने मुंबई गाव महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा
हजारो वाहने कोकणाच्या दिशेने निघाली
कोकण रेल्वे मार्गावर रो रो सेवा कोकणवासीयांसाठी सुरू करण्यात आली आहे. खड्ड्यातून सुटका व्हावी यासाठी कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन ही रो रो सेवा सुरू केली आहे. २३ ऑगस्ट पासून ही सेवा सुरू झाली आहे. कोलाड ते वेर्ण अशी ही रो रो सेवा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकावर ही सेवा देण्यात आली आहे. रात्री उशिरा नांदगाव रेल्वे स्थानकात कार घेऊन ही रो रो सेवा पोहोचली यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीने या रोरोने आलेल्या प्रवाशांचे स्वागत केले. सध्या पहिल्याच या रो रो मधून पाच कार बुकिंग झाले होते. त्यातील चार कार नांदगाव रेल्वे स्थानकात उतरल्या तर एक कार निर्णय गोवा वेर्ण साठी पुढे रवाना झाली.
गणरायाचे आगमन बुधवारी 27 तारखेला होणार असल्याने कोकणवासीय मोठ्या संख्येने गावाकडे निघणार आहेत. हजारोंच्या संख्येने निघणार्या कोकणवासीयांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी महामंडळाने राज्यातील विविध जिल्ह्यातून मुंबईत बस मागवल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून २०० बस आल्या असून यांना नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रस्त्यावर उभा करण्यात आल्या आहेत. या गाड्यांवर असलेल्या चालक , कंडक्टर यांची राहायची सोय पनवेल एसटी डेपो व्यवस्थापनाने केली आहे. या गाड्या मुंबईतील विविध भागात जाणार असून येथील कोकणवासीय रहिवाशांना घेवून गावाकडे रवाना होणार आहेत.
गणरायाचे आगमन बुधवारी 27 तारखेला होणार असल्याने कोकणवासीय मोठ्या संख्येने गावाकडे निघणार आहेत. हजारोंच्या संख्येने निघणार्या कोकणवासीयांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी महामंडळाने राज्यातील विविध जिल्ह्यातून मुंबईत बस मागवल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून २०० बस आल्या असून यांना नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रस्त्यावर उभा करण्यात आल्या आहेत. या गाड्यांवर असलेल्या चालक , कंडक्टर यांची राहायची सोय पनवेल एसटी डेपो व्यवस्थापनाने केली आहे. या गाड्या मुंबईतील विविध भागात जाणार असून येथील कोकणवासीय रहिवाशांना घेवून गावाकडे रवाना होणार आहेत.
मुंबई विमानतळा बाहेर मोठा अनर्थ टळला आहे
पेट्रोल पंप वर बाईक मध्ये लागली मोठी आग
पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचे सतर्कतेमुळे वाचला पेट्रोल पंप
फ्लॅश:- मुंबई विमानतळ बाहेर असलेल्या पेट्रोल पंप वर एका बाईक मध्ये मोठी आग लागली
मध्यरात्री एकच्या सुमारास पेट्रोल पंप वर बाईक मध्ये पेट्रोल भरण्यासाठी आली होती
पेट्रोल भरत असताना अचानक बाईक मध्ये मोठी आग लागली
आगीचं माहिती मिळताच पेट्रोल पंप कर्मचारी लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले
अग्निशमन दलाचे दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत अर्धा तासांमध्ये आग विझवली आहेत.
सुदैवाने या आगीमध्ये कोणतेही जीवित हानी झाली नसून मात्र बाईक जळून खाक झाला आहे
आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास सहार पोलीस करत आहेत...
मागील दहा दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने बावीस लाख एकरावर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे म्हटल आहे. इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी भरणे यांनी एका गोष्टीचा विशेष उल्लेख केला की प्रत्येक वर्षी मी तुमच्या या दहीहंडी सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतो मात्र यावर्षी मला माफ करा सांभाळून घ्या कारण राज्यातील शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आला असल्याने मी तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकत नसलो तरी मी तुमच्या सुखदुखात कायम असल्याचा आश्वासनही भरणे यांनी यावेळी दिल आहे.
सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर बघायला मिळत आहेत दोन दिवसांपूर्वी नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी काल खामगाव व शेगाव येथे छापा टाकून अनुक्रमे नऊ व सात तलवारी जप्त केल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी अमली पदार्थ व शस्त्र याविरुद्ध मोहीम उघडली आहे.
सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर बघायला मिळत आहेत दोन दिवसांपूर्वी नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी काल खामगाव व शेगाव येथे छापा टाकून अनुक्रमे नऊ व सात तलवारी जप्त केल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी अमली पदार्थ व शस्त्र याविरुद्ध मोहीम उघडली आहे.
सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर बघायला मिळत आहेत दोन दिवसांपूर्वी नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी काल खामगाव व शेगाव येथे छापा टाकून अनुक्रमे नऊ व सात तलवारी जप्त केल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी अमली पदार्थ व शस्त्र याविरुद्ध मोहीम उघडली आहे.
सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ॲक्शन मोडवर बघायला मिळत आहेत दोन दिवसांपूर्वी नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी जप्त केल्यानंतर पोलिसांनी काल खामगाव व शेगाव येथे छापा टाकून अनुक्रमे नऊ व सात तलवारी जप्त केल्या आहेत. सण आणि उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी अमली पदार्थ व शस्त्र याविरुद्ध मोहीम उघडली आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासी यांचे हाल मोठ्या प्रमाणात मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी रांग....
जनरल बोगीतून करावा लागत आहे प्रवास..
ठाणे रेल्वे स्थानक वर फलाट क्रमांक सात वर मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी रांग....
२४ तास अगोदरच येऊन लावावी लागत आहे रांग..
रत्नागिरी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज उदय सामंत
राजापूरच्या सूर्य मंदिर विषयासंदर्भात मला ब्रीफिंग केलं गेलं ते मी बोललो आणि त्यावर मी आजही ठाम आहे
या विषयासंदर्भात एक समिती नेमण्यात आली आहे आणि 10 ऑक्टोबर पर्यंत या समितीचा अहवाल हा आला पाहिजे
काल संघटनेने मागणी केली असेल आणि त्यात तथ्य असेल तिथे जर सूर्य मंदिरात असेल तर ते नाकारण्याचे काही कारण नाही
हिंदुत्व काय असतं हे माझ्या कामाने आणि विचारांना मी दाखवून दिला आहे
त्यामुळे मला कोणाचाही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही
नगरपालिकेच्या कोणत्याही दस्ताऐवजामध्ये त्या ठिकाणी सूर्य मंदिर आहे अशी नोंद नाही
पालकमंत्री म्हणून कोणीही सभागृहामध्ये उत्तर देत नाही तो मंत्री म्हणून उत्तर देतो
पालकमंत्र्यांचा निषेध करून काही उपयोग नाही तो शासनाचा निषेध केला पाहिजे
मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे देखील कालच्या कार्यक्रमाला येणार होते त्यांचा देखील निश्चित केला पाहिजे नाव न घेता उदय सामंत यांचा टोला
मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या आहेत त्यादेखील टाकून करतो काही लोक फॅशन म्हणून फिरतात
चाकरमानी हा काय शब्द आमच्या पिढीने पाडलेला नाही पूर्वापार चालत आलेला सन्मानाचा शब्द होता
जेव्हा मुंबईकर यायचे तेव्हा आई-वडील सांगायचे की पहा माझा चाकरमानी पोरगा आला
मुंबईमध्ये नोकरीसाठी गेलेला त्याला चाकरमानी म्हणायचे
आपणच सुरुवात केली पाहिजे कोकणवासीय म्हणायला
गणेश उत्सवानिमित्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी शिवसेना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीकरांसाठी मोफत बस सेवा
कल्याण लोकसभेसाठी तब्बल 650 सावळाराम क्रीडासंकुलात दाखल
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी अखेर ओव्हरफ्लो झाला आहे.पाण्याची आवक वाढल्याने एकूण 4 दारातुन 1264 क्युसेकने सिना नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील खासापुरी,चांदणी व साकत मध्यम प्रकल्प देखील तुटूंब भरल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.सीना कोळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे परंडा तालुक्यातील 8 हजार 700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.त्याच बरोबर परंडा शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना सुरू आहे.त्यामुळे परंडा येथील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ग्राम पंचायतीच्या ग्रा सभेत प्रचंड गोंधळ होवून हाणामारी झाल्याचा प्रकार घडला असुन याचा व्हिडीओ सर्वत्र वायरल होतोय. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावातील मारोती वाघमारे हे ग्राम पंचायत थकीत भाडे भरत नसल्याने त्यांनी ग्राम सेवकासोबत वाद घातला होता. ग्राम सभेत महिला सरपंचाबरोबर अरेरावी केली ज्यामुळे ग्रामसभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सरपंच पती यांनी व त्यांच्या भावाने वाघमारे यांना जाब विचारला त्यावरून पुन्हा वाद पेटला आणि मारहाण ही झाली. या प्रकरणात दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी देण्यात आल्या आहेत. ज्या नुसार मारोती वाघमारे यांनी सरपंच पती माऊली जाधव व त्यांच्या भावाविरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केलाय, तर सरपंच बबिता माऊली जाधव यांनी वाघमारे शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे संगीत "संन्यस्त खडग्" नाटकाला बहुजन वंचित आघाडी कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात "संन्यस्त खडग्" नाटकाच्या प्रयोग होण्या अगोदर आंबेडकर जनतेनी अत्रेरंग मंदिराबाहेर केला निषेध.
नाटकाचा बोर्ड काढून फेकला. अत्रे रंगमंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त.
वाशिमच्या कारंजा दारव्हा मार्गावर एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाल्याची घटना घडलीय.. कारंजा शहरा जवळ अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर DNR नावाची ही ट्रॅव्हल्स दारव्हा मार्गे कारंजा मार्गे पुणे जात असताना समोरचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जखमींना उपचारासाठी हलविन्याय आले..दरम्यान या घटनेत अद्याप जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सह मराठा समाज बांधव 29 तारखेला मुंबईकडे कूच करणार आहेत. तत्पूर्वी आज बीड मध्ये अंतिम निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील मांजुरसुंबा येथे ही सभा होणार आहे. आजच्या सभेतून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देणार? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या दरम्यान मराठा आरक्षणाच्या पुढील दिशेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील पुयणी आडगाव येथील लेंडी नदीवर पुलाचे काम सुरू आहे मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत हा पूल वाहून गेलाय.पुल वाहून गेल्यानंतर पर्यायी रस्ता तयार करून देणे बंधनकारक असताना कंत्राटदारा कडून पूर्णतः दुर्लक्ष करण्यात असल्याने परिसरातील ७-८ गावच्या गावकऱ्यांना १० ते १२ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे महिला विद्यार्थी वृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे तत्काळ पुलाचे काम सुरू करून पर्यायी रस्ता तयार करून देण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केलीय.
ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र, त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह चिल्यापिल्या सह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल २५ तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली.पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे.रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफ कडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra live blog updates: ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र त्याच गाड्यांना प्रचंड गर्दी ही बघायला मिळत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह चिल्यापिल्या सह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल २५ तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली.पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे.रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफ कडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.