- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- निवडणूक
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा. लेटेस्ट अपडेटस् मिळवा एका क्लिकवर.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
माणगाव इंदापूर परिसरात वाहतूक कोंडी
3 दिवसांच्या सुट्टीवर आलेला पर्यटक परतीच्या दिशेला निघाल्यामुळे झाली आहे वाहतूक कोंडी
माणगाव रेल्वे स्थानक परीसर ते मुगवली या 4 किमी पर्यंत वाहतूक कोंडी
वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Beed News : महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास बारकाईने एसआयटी मार्फत केला जात आहे.पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात स्थापन झालेले पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून आहे.पथकाकडून या प्रकरणाचा तपास बारकाईने केला जात आहे.
या तपासावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.पंकज कुमावत हे योग्य पद्धतीने तपास करून ते गुन्हेगारापर्यंत पोहचून त्यांना गजाआड करतील असा विश्वास ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केलाय.याचबरोबर मुंडे यांनी आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी देखील केली आहे.
Nashik News : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिकरोड येथील नामांकित 80 वर्षीय डॉक्टर आणि एका महिलेची मिळून तब्बल १ कोटी ४६ लाखांची लूट केलीये. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल बंद होणार असल्याची धमकी देत आणि व्हिडिओ कॉलवर अटक वॉरंट दाखवत, बँक खात्यातील सर्व रक्कम उकळून घेतलीये. गंभीर बाब म्हणजे आठवडाभरातच नाशकात ५ घटना घडल्यात
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एक नामांकित ८० वर्षीय डॉक्टरला अज्ञात महिलेचा कॉल आला… मोबाईल बंद होणार असल्याची धमकी दिली… नंतर मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असा दावा केला. त्यानंतर कथित क्राइम ब्रांच ऑफिसर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं… ती व्यक्ती पोलिस गणवेशात बसलेली होती… नरेश गोयल मनी लॉंड्रिंग प्रकरणात तुमचा मोबाईल व आधार क्रमांक सापडला आहे असं सांगत अटक वॉरंट दाखविलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका अशी सक्त ताकीदही दिली. आणि बोलता बोलता विविध खात्यांमधून कोट्यवधी रुपयांना गंडा घातलाय.
फसवणूक करणारे स्वतःला क्राइम ब्रांच किंवा पोलीस अधिकारी म्हणून दाखवतात. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बळी पडणाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करवून घेतात. नागरिकांनी अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहनही सायबर पोलिसांनी केलंय.
तुमसर येथील शिवाजी नगरातील शिव मंदिर परिसरात असलेल्या तलावात शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृत मासोळ्यांचा खच तलावात पडला असल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. तलावात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जातोय, आणि मागील अनेक वर्षांपासून तलावाची स्वच्छता केलेली नाही, यामुळं तलावात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यातून रासायनिक द्रावण तलावात मिसळल्यानं मासोळ्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मृत मासोळ्यांमुळं परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. तलाव परिसरात राहणारे छोटे बालक आणि वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम जाणवू लागल्यानं नगरपालिका प्रशासनानं मृत मासोळ्यांचा तातडीनं बंदोबस्त करून तलावाची स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेल विधानसभेत तब्बल 85 हजार दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. याबाबत हायकोर्टात जुलै 2024 ला रिटपिटीशन दाखल केले होते. हायकोर्टाने सुनावणी घेत दुबार मतदारांची नावे वगळण्याचे आदेश दिला होते. मात्र यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करीत नावे वगळली नाहीत. पनवेल विधानसभा मतदार संघांतील मतदारांची नावे ऐरोली , बेलापूर , उरण या बाजूला असलेल्या विधानसभा मतदार संघात आढळली आहेत. दरम्यान पनवेल विधानसभेत ११ हजार ५०० लोकांनी एकाच मतदार संघात दोनदा मतदान केल्याची नोंद आढळली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने समोर आणले आहे.
धुळे शहराला हवामान विभागाचा रेड अलर्ट देण्यात आला होता.... काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशा धुळे शहराला झोडपून काढलं. धुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सासल्याचे चित्र पाहायला मिळालं तर शहरातील धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चहूबाजूंनी पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे... पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी साचल आहे.महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे शहर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, आणि अनेक शाळांना बसला असल्याच देखील चित्र पाहायला मिळाले.
अहिल्यानगर : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा देखील मैदानात उतरला आहे... अहिल्यानगर येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाने आरक्षणासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे... मराठा आरक्षण हा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारच्या आखतारीतील आहे, त्यामुळे राज्यात आरक्षणासाठी आंदोलन करून उपयोग नाही, दिल्ली येथे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे असा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला... यासोबतच शरद पवारांनी 1994 साली मंडल आयोगाला मान्यता देऊन अनेक जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला, मात्र त्यांना त्यावेळी मराठा समाज दिसला नाही... आता देखील शरद पवारांनी मंडल यात्रा काढली आहे, त्यांना मराठ्यांसाठी एकही यात्रा काढावीशी वाटत नाही अशी टीका देखील या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आंदोलकांनी केली आहे.
- नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांद नदीत दुचाकीस्वार गेला वाहून, बाईक मिळाली दुचाकीस्वाराचा शोध सुरू...
- शनिवारी सायंकाळी भिवापूर परिसरात पावसाच्या दमदार पाऊस झाला.. त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना चिखलापार भागात दुचाकीस्वार वाहून गेल्याची दुर्घटना घडली..
- दुचाकीवर जाणारा नेमका कोण होता याची ओळख पटली नाही..मात्र काही अंतरावर असलेली दुचाकी क्रमांक MH 40 U5772 ही विकत घेतलेल्या दुचाकीमे बहिनीकडे जात असताना घटना घडलीय.., बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहेय...
- नांद नदीच्या पुलावरून सायंकाळी 7 वाजताचा सुमारास ही घटना घडलीय... आता थोड्याच वेळात NDRF पथकाकडुन शोध कार्य सुरू होईल..
- पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची रांग होती. मात्र उमरेडकडून आलेल्या दुचाकीस्वाराने धाडस करून पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला.
- मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट पुराच्या पाण्यात वाहून गेला.
- खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष भास्कर येंगळे प्रशासकीय यंत्रणेला माहिती दिली.. मात्र रात्री अधांर असल्यानं बचावकार्य होऊ शकले नाही...
जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी....खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा सूचना.
नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आल्याने नदीकाठी काठी राहणाऱ्या नागरिकांना समान सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना.
जगबुडी नदीची पाण्याची पातळी 7.20 वर.
भंडाऱ्याच्या चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणारं भाविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर जखमी झाल्यात. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा आरव्ही (५०) यांना तातडीनं नागपूरला हलविण्यात आलं असून उर्वरित चार जखमींवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यान घडली.
बीड: बीडमध्ये मागील दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावलीय. या पावसाने बीड तालुक्यातील राजुरी गावातून वाहणारी डोमरी नदी खळखळून वाहत आहे. मात्र या नदीवरील पुलाचे काम रखडले गेल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांना कसरत करून नदी ओलांडावी लागतेय.. हे चित्र समाधानकारक असलं तरी जीव धोक्यात घालून ग्रामस्थ नदी ओलांडताना दिसून येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत,यावेळी ते चिंचोली गाव येथे शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या मेडिकल हबची पाहणी करणार होते. मात्र त्या ठिकाणी नियोजित वेळे नुसार ते जाणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मात्र ऐनवेळी त्यांनी मेडिकल हबची पाहणी करण्याचा निर्णय का बदलला यांबाबत विविध चर्चा होताना दिसत आहेत
जिल्ह्यात बरसत असलेल्या जोरदार पावसाने अडाण नदीला आलेल्या मोठा पुरामुळं अडाण प्रकल्पामध्ये 73.39 टक्के पाणीसाठा झालाय. पाण्याची आवक वाढत असल्याने अडाण प्रकल्पाचे 5 गेट प्रत्येकी 70 सेंमी ने उघडण्यात आल्याने 12 हजार 797 क्यूसेक्स प्रति सेकंद एवढा विसर्ग होतोय. या विसर्गागामुळं अडाण नदीला मोठा पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्याय.
वाशिम जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर झालाय.. नागपूर संभाजीनगर जुन्या महामार्गावर असलेल्या काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे आणि पाणी पुलावर बरोबर आल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून...रात्री पासून वाहतूक थांबवत दुसऱ्या मार्गाने वळवली आहे.. कोणतीही अनुचित घटना होऊ नये या करिता जऊलका पोलीस काटेपूर्णा नदीवर कडक बंदोबस्त पहारा देत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथं युती होईल तिथं युती करायच्या....असं आमचं धोरण आहे. त्यामुळं युतीचं डोक्यातून काढून टाका, अशा थेट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी काल भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्यात. प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असेल दुसऱ्याकडे असेल आणि तिसऱ्याकडेही उमेदवार राहू शकतो अशा स्थितीत आपल्या कार्यकर्त्याला संधी नं देणं त्याचं मन दुखवण, हे योग्य वाटतं नाही. त्यामुळे जिथे सोयीचं वाटत असेल आपण तिथे बघू. सार्वत्रिक निवडणूक आहे मतांचा विचार असतो जिथे आपली ताकद आहे तिथं आपण विचार केलाचं पाहिजे. असं होणार नाही की मागल्या वेळेस तिथं कोणी जर दुसऱ्याचा निवडून आला असेल तर त्यालाचं जागा सोडायची. आपली ताकत असेल तर आपण लढायचं. त्यामुळे आपणच प्रत्येक प्रभागात आपलाच उमेदवार निवडणूक लढेल या विचारांनाच प्रत्येकाने आता कामाला लागलं पाहिजे, आपण गफलतीत राहणार नाही....अशा सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्यात.
धाराशिवमध्ये पावसानं शेती पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात या नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येतील आणि पंचनामाचा अहवाल आल्यानंतर मदत दिवसा आश्वासनही दिलं. कृषिमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी फक्त पंचनामे नको तर ठोस मदत द्या अशी मागणी केली. पावसाने शेतकरी उध्वस्त झाला असून त्याचं नीट पुनर्वसन करा हे मागणं सरकारकडे मागितलं.
रायगड जिल्ह्याला आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे सकाळपासून पावसाची रिमझिम जरी असली तरी येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास या तिन्ही नद्या इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि उपनगर या दोन्ही भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस आजदेखील सुरूच आहे. सततच्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्टवर आहेत. नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत की, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये.
जळगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.रविवारी, १७ ऑगस्ट रोजी अजित पवार जळगाव शहरात थांबणार आहेत. यावेळेत ते काही शासकीय कामांसह महत्त्वाच्या राजकीय बैठका आणि मेळाव्यांना उपस्थित राहणार. पक्षातील फुटीनंतर ते प्रथमच पक्ष संघटनेच्या कामासाठी जिल्ह्यात येत असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्यादरम्यान काही नवीन पक्षप्रवेश देखील होणार त्यामध्ये विशेषता काँग्रेस उपाध्यक्ष आदिवासी नेते प्रतिभा शिंदे ह्या त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते व काही सरपंच हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
वाशिम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे आलेल्या पुराचा अनेक गावांना फटका बसला. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे परिसरातील प्रकल्पाच्या सांडव्याला पाणी आल्यानंतर अचानक आलेल्या पुरसदृश पाण्याच्या लोंढ्यात तब्बल 40 जनावरे वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यातील 10 ते 15 जनावरांचा शोध लागला इतर जनावर अद्याप बेपत्ता आहेत.
जळगावच्या धरणगाव शहरातील धरणी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला प्रचंड पूर आल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला नदीसदृश स्वरूप प्राप्त झाले असून, कठडे नसल्याने पुराचे पाणी मोठ्या वेगाने दुकाने व घरांमध्ये शिरले. परिणामी धरणी परिसर आणि जैन गल्ली पूर्णपणे जलमय झाला आहे. अनेकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कालच्या तुलनेत आज पुराची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल आलेल्या पुरानंतर देखील पालिका प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
इस्लामपूर मध्ये वनश्री युथ फाऊंडेशन कडून महाडिक युवाशक्ती दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ३ लाख ३ हजार ३ रुपयांचे बक्षीस या दहीहंडी मध्ये ठेवण्यात आले होते. ही दहीहंडी तासगाव मधील शिवनेरी मंडळाने फोडली. हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी मध्यरात्री पर्यत हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते. महाडिक युवाशक्तीचे संस्थापक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कपिल ओसवाल यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी उत्सवासाठी खास आकर्षण म्हणून अप्सरा आली फेम श्वेता परदेशी, ढोलकीच्या तालावर फेम शुचिका जोशी हे उपस्थित होते. हा उत्सव राजारामबापू खुले नाट्यगृहामध्ये पार पडला.
तुळशी तलाव शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला. पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये मिळून ९०.१६ टक्के जलसाठा उपलब्ध. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुळशी तलाव आज (दिनांक १६ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. ८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गत वर्षी (२०२४) दिनांक २० जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची मिळून एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये मिळून १,३०,४९८.१ कोटी लीटर (१३,०४,९८१ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ९०.१६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
पार्श्वभूमी
तुळशी तलाव काल सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला. पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये मिळून ९०.१६ टक्के जलसाठा उपलब्ध. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुळशी तलाव आज (दिनांक १६ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. ८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गत वर्षी (२०२४) दिनांक २० जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची मिळून एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये मिळून १,३०,४९८.१ कोटी लीटर (१३,०४,९८१ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ९०.१६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.