Maharashtra Live Update: मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला! 25 ते 30 गावं अंधारात

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 May 2024 12:08 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...  पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक...More

खंडाळा घाटात बॅटरी हिलजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

Accident News : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात कार मध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे. लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला. सदर कार ही अलिबाग वरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते.
या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी, आणि भूमिका चौधरी, हे सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.