Maharashtra Live Update: बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर होणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2024 02:19 PM
Rain : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका, पपईची बाग उद्धव्स्त

Rain : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


पैठण तालुक्यातील सोमपुरी गावात शेतकऱ्यांची पपईची बाग अक्षरशः उध्वस्त झाली आहे.


वादळी वाऱ्यामुळे पपईचे झाड तुटून पडली आहे. त्यामुळे


 झाडा लागलेल्या पपईचा शेतात सडा पाहायला मिळत आहे.

Akola : अकोल्याचील अकोट येथे कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकरी महिलांमध्ये हाणामारी

Akola : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी.


महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती.


नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरील प्रकार.


कापसाचे अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकर्यांच्या मोठ्या रांगा.


ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे हाल.

Jalna : जालन्यात गॅस कटर च्या साहाय्याने ATM फोडलं, भर चौकात पहाटेची घटना

Jalna : जालन्यात गॅस कटर च्या साहाय्याने ATM फोडलं


भर चौकात पहाटेची घटना.


जालना शहरातील महावीर चौकामध्ये आज पहाटे चोरट्यांनी एसबीआय बँकेच ATM फोडून रोकड पळवल्याची घटना घडलीय.


आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला,


गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरांनी ही ATM मशीन फोडून यातील रक्कम पळवल्याची माहिती आहे ,


ही घटना सकाळी 3 ते 4 च्या सुमारास घडल्याची माहिती असून पोलिसांकडुन या घटनेचा पंचनामा सुरू आहे,


दरम्यान नेमकी किती रक्कम चोरीला गेली हे बॅंक अधिकाऱ्यांच्या फिर्यादी नंतर समजणार आहे,


या प्रकरणी पोलिसांनी तीन पथके देखील आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत

Jalgaon : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, जळगावमधील सुवर्ण नगरीत दर विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले

Jalgaon : जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम


सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ


जळगावमधील सुवर्ण नगरीत जी एस टी सह सोन्याचे दर 76500 तर चांदी 96000 हजार रुपये विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले 

सोने व्यावसायिकांनी दिलेल्या माहिती नुसार जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून चीन या देशाने आपली गुंतवणूक सोने आणि चांदीच्या मध्ये करण्यास सुरुवात केल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर वाढले आहेत


अजूनही मागणी मोठी असल्याने पुढील काळात ही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता देखील सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे

Pune Accident : आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार. - पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार


Pune Accident : आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. - पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार-
* मुलाचे वडील आणि त्याला दारु देणार्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
* कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टसोबत काम करण्यात येईल. 
* कोणालाही वाचवण्यात येणार नाही. 
* विना नंबर प्लेट गाडी देणार्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल.  
* या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आलाय. 
* या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल.  कोणी राजकीय दबाव आणला का हे यातुन समजेल. 
* या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल.  
* हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येतोय. 
* हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.

Bhaskar Jadhav :  महाराष्ट्रात पंतप्रधान यांना जास्तीत सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून 5 टप्प्यात मतदान घेण्यात आलं - आमदार भास्कर जाधव

 


Ratnagiri : माझ्या राजकिय आयुष्याच्या अभ्यासात कधीही महाराष्ट्रात कधीही 5 टप्प्यात मतदान झालेलं नाही - आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते


 महाराष्ट्रात पंतप्रधान यांना जास्तीत सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून 5 टप्प्यात मतदान घेण्यात आलं 


जेवढं मतदान लांबलं तेवढं ते भाजपच्या विरोधात गेलेलं आहे


भाजपच्या नेत्यांची भाषणाची पातळी दिवसागणिक खालावली गेली


महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल


 नरेंद्र मोदी 150 पार करतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे


इंडिया आघाडी 350 पार करेल असं चित्र आहे

Jalgaon : जळगावातील सराफ बाजारात सौरभ ज्वेलर्स वर पहाटेच्या सुमारास दरोडा

Jalgaon : जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स वर पहाटे च्या सुमारास दरोडा घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना 
या घटनेत दरोडा घालणारे सहा दरोडे खोर हे सराफ बाजारातील एका सी सी कॅमेरात कैद झाले झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे
शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्स मधे सकाळी तीन वाजताच्या सुमारास सहा दरोडे खोरानी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश करत दुकानातील शो रूम  मधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे

HSC Result : बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता

HSC Result : बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर होणार


महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.


मंगळवारी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल,


अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.


त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

Pune : पुणे अपघात प्रकरणी महिला लोकप्रतिनिधी पोलीस आयुक्तांना भेटणार

Pune : पुण्यातील कल्याणी नगरमधे झालेल्या अपघाताच्या प्रकरणात दुपारी साडे बारा वाजता पुण्यातील महिला लोकप्रतिनिधी पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत.  तर एक वाजता भाजपचे शिष्टमंडळ चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहे.

Kolhapur : कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या मेंदूवरील प्रक्रिया यशस्वी

Kolhapur : कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या मेंदूवरील प्रक्रिया यशस्वी


कालच्या पेक्षा आज आमदार पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा 


मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू आहेत उपचार


आमदार  पी एन पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना करावी


सोशल मीडिया मधून उमटणाऱ्या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये 


जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचं आवाहन

Nana Patole : फतवे काढून काही धर्मातील लोकांना मुद्दाम मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न - नाना पटोले

Nana Patole : फतवे काढून काही धर्मातील लोकांना मुद्दाम मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न - नाना पटोले


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक


मोदी सरकारची जी तानाशाही सुरू झाली आहे - नाना पटोले


त्यापासून देशाला वाचविण्याकरिता आपल्याला मतदान करावे लागणार आहे- नाना पटोले


 

Ambadas Danve : महाविकास आघाडी जोरात आहे. पण रात्रीचा खेळ चाले असे सुरू आहे. - अंबादास दानवे

Ambadas Danve : आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी जोरात आहे. पण रात्रीचा खेळ चाले असे सुरू आहे. - अंबादास दानवे


भाजप आणि आम्हाला सोडून गेलेले लोक पैसे पाऊस पाडत आहे. कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडत आहे. निवडणूक आयोग त्यांना मदत करत आहेत. पण बंडखोरी मुळे जनतेमध्ये रोष आहे. - अंबादास दानवे


30 सभा पंतप्रधान घ्यावे लागतात. आगामी काळात स्थानिक निवडणुकीत मोदी यांच्या सभा लागू नयेत...महाराष्ट्राची जनता यांना पाणी दाखवल्या शिवाय राहणार नाही....- अंबादास दानवे


मराठा आरक्षण बाबत जरांगे याना जनता पाठिंबा देतील. - अंबादास दानवे



आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतुन पळून गेले. आता तुमचा खालून किती नंबर येतो पाहा...- अंबादास दानवे


बीड ,संभाजीनगर मतदान काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांची चौकशी केली पाहिजे....- अंबादास दानवे

Pune : पुण्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Pune : पुण्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती


भारतीय हवामान विभागाकडून पुण्यात 24 मे पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज 


 या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेलस इसा इशारा देखील हवामान विभागानं दिला


पुण्यातील इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये पावसानं काल हजेरी लावली होती. 

Iran : इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

Iran : इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन


इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे.


 या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा युद्धपातळीवर शोध घेतला जात होता. 


आता शोधमोहिमेत हे हेलिकॉप्टर सापडले असून त्याचा चक्काचूर झाला आहे. 


दरम्यान, या अपघातात आता रईसी यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 

Mumbai : मुंबईच्या  जे जे पोलिस ठाणे परिसरात धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल


Mumbai : मुंबईच्या  जे जे पोलिस ठाणे परिसरात धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल


मुंबईच्या धर्मदाय संस्थेवर चालणारे  साबु सिद्धी हाॅस्पिटल मुख्य प्रवेशद्वारावर मतदारांना धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन


जे जे पोलिस ठाण्यात अब्दुल रज्जाक मनियार विरोधात कलम 188, भादवी लोक प्रतिनिधित्व अधिनियम 123(3) महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 3 अंतर्गत गुन्हा दाखल

Nashik : मतदान केल्यानंतर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणात शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Nashik : मतदान केल्या नंतर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणात शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता ...


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली घटनेची माहिती ...


त्रम्बकेश्वर मधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रवर  घडला होता हा प्रकार..


शांती गिरी महाराजांनी  मतदान केल्या नंतर एटीव्हीएम मशीनला घातला होता हार

Ahmednagar : नगर मनपाची गणेश मूर्ती कारखान्यांना नोटीस, शहरातील 130 कारखानदारांना नोटीसा बजावल्या

Ahmednagar : नगर मनपाची गणेश मूर्ती कारखान्यांना नोटीस


अहमदनगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना नोटीस काढली आहे...


प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात


तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी,


तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल


असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे... प


र्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत आणि पीओपीच्या मूर्तीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांनी दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने नगर शहरातील 130 कारखानदारांना नोटीसा बजावल्या आहेत.

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज; देशभरात 49 जागांवर मतदान

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज; देशभरात 49 जागांवर मतदान


देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान पार पडणार


राहुल गांधी, स्मृती इराणी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिष्ठा पणाला


महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबई


मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातील 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार 


डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल, वर्षा गायकवाड अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. 


 

Weather Update : मुंबईकर उकाड्याने हैराण, पुढील काही दिवस गरमीचा त्रास सहन करावा लागणार

Weather Update : मुंबईकर उकाड्याने हैराण, पुढील काही दिवस तरी गरमीचा त्रास सहन करावा लागणार


मुंबईत पुढील 3 दिवस उष्णतेचा त्रास कायम राहणार


हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट


गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील उकाडा प्रचंड वाढला आहे. 


मध्यंतरी या संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाला. 


या पावसानंतर वातावरणातील आर्द्रता वाढत गेल्याने मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. 


सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 


त्यामुळे या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची मुंबईकर वाट पाहत आहेत.


पुढील काही दिवस तरी मुंबईकरांना घामाच्या धारांनी चिंब होत दिवस कंठत राहावे लागणार आहे


 


 


 


 


 


 


 


 


 

Rain : पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे तांडव, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

Rain : पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे तांडव


राज्यातील पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलय. 


पुण्यातील दौंड आणि इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. 


तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलय. 


वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालय. 


कृषी विभागाने नुकसान ग्रस्तांची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी 


अशी मागणी आता नुकसानग्रस्त ग्रामस्थ शेतकरी करीत आहेत.

Kolhapur : आईच्या समोरच अवजड हत्यार आणि दंडक्याने तरुणाची हत्या, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Kolhapur : आईच्या समोरच अवजड हत्यार आणि दंडक्याने तरुणाची हत्या


कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील निटवडे रोडवरची घटना


सैन्य दलातील जवानासह तिघांनी केले आईसमोरच वार


विकास पाटील असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव


तर मारहाण करणारा सैन्य दलातील युवराज गायकवाडसह तिघेजण पसार


पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.