Maharashtra Live Update: मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मुंबईत सांगता सभांचा धुरळा उडणार आहे.. मुंबईत उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे,.., त्यामुळे शेवटच्.य उद्धव ठाकरे उद्या मुंबईतील ४ उमेदवारांसाठी सांगता सभा घेणार आहेत... ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये या सभा पार पडणार आहेत..
Maha Vikas Aghadi: आज मुंबईत इंडिया आघाडीची सभा होणार आहे.. त्या सभेपूर्वी अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. संध्याकाळी ६ वाजता अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत..
Thane Lok Sabha: ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे
Sindhudurg News: जिल्ह्यात कणकवलीतील हरकुळ बुद्रूकमध्ये काल चक्रीवादळ होऊन अनेक घरांची छपरे उडाली तर महावितरणचे 80 पोल मोडून पडले. हरकुळ बुद्रुक गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. झाडे मोडून घरांवर पडली, पालापाचोळ्यासारखी अनेक घरांची छप्परे उडाली, महावितरणचे सुमारे 80 पोल मोडून पडले, वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. चक्रीवादळामुळे लाखोंची हानी झाली असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Maha Vikas Aghadi Teaser :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे.. दरम्यान महाविकास आघाडीच्या आजच्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
Hingoli : हिंगोली जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालीये. त्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे.. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर टँकरच्या रांगेमध्ये थांबावे लागत आहे टँकरमधूनही पुरेसं पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. आम्हाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केलीय..
Raigad : अवकाळी पावसाचा रायगडला मोठा फटका बसलाय. श्रीवर्धनच्या बोर्ली पंचतन परिसराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. वादळामुळे रस्त्यात मोठं झाड पडलं त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान रायगडच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यामुळे काहीं काळ जनजीवन विस्कळीत झालं..
Bhiwandi Lok Sabha : भिवंडी ग्रामीणमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. दाभाड , लामज , कातकरी वाडीत वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडालेत...
Beed News: बीडमध्ये एक कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची एसीबीच्या पथकानं झाडाझडती घेतली. त्यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांच्या रोकड, 970 ग्रॅम सोनं आणि पाच किलो चांदी पोलिसांनी जप्त केलीय. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर फरार झालेत..
Water Crisis : एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 33 लाख 30 हजार मेट्रिक टन हिरवा चारा शिल्लक आहे. तर 10 लाख 32 हजार मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक आहे. हा चारा केवळ दीड महिना पुरेल एवढाच आहे. वाचा सविस्तर बातमी
Dry Day: उद्यापासून पुढचे तीन दिवस मुंबईत मद्य विक्री बंद राहणार आहे.. वीकेंडला तीन दिवस ड्राय डे असणार आहे.. निवडणूक आयोगानं निर्देशानुसार ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि त्या मतदारसंघाच्या नजीकच्या मतदारसंघात 'ड्राय डे' पाळणे आवश्यक असते. त्यानुसार मुंबईसह राज्यात येत्या १८ ते २० मे दरम्यान दारूची दुकाने बंद राहणार आहेत.
PM Modi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आहे. आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे.. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकाच चावर येणार आहेत. त्यामुळे मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. यावेळी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे... या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत...
Wadala : मुंबईत सोमवारी झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यातील बरकत अली रोडवडील झोपु योजनेतील वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी टॉवर कोसळला होता. या घटनेची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना नेमकी कशी घडली, त्याची कारणे काय आणि पार्किंग टॉवरच्या रचनेत काही संरचात्मक त्रुटी होत्या का याचा तपास करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : २० मे या दिवशी मुंबईत मतदान होतंय आणि मुंबईचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होतेय. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -