Maharashtra Live blog: निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा

Advertisement

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्कर Last Updated: 22 Oct 2025 01:16 PM
किल्ल्यावर छत्रपतींच्या वेशातील युवकास सुरक्षारक्षकांचा विरोध; मराठीबद्दल प्रश्न उपस्थित

वसई : सध्या सोशल मीडियावर वसई किल्ल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून आलेल्या एका युवकास किल्ल्यावरील सुरक्षारक्षकाने फोटो काढण्यास मज्जाव केल्याची घटना समोर आली आहे.


या वेळी सुरक्षा रक्षकाने त्या युवकास हिंदीत प्रश्न विचारल्याने युवक भडकला. “मराठी येत नाही का तुला? मराठी आलीच पाहिजे, मराठी न येत असल्याचा माज दाखवला नाही पाहिजे,” अशा शब्दांत त्या युवकाने आपली भूमिका स्पष्ट करत भाषेच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच “छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड-किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही,” असा सवालही त्याने उपस्थित केला.


ही घटना लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी घडली, ज्या दिवशी वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनाम प्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शेकडो दीप प्रज्वलित करून ज्ञात-अज्ञात वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


कार्यक्रमादरम्यान स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सांस्कृतिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश परिधान करून सहभाग घेतला होता.


या घटनेनंतर सोशल मीडियावर युवकाच्या धाडसी प्रतिक्रियेचे कौतुक होत असून, “महाराष्ट्रात असताना मराठी न समजणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
वसई किल्ल्यावर घडलेला हा प्रसंग सध्या स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.

Continues below advertisement
पद्माविभुषण एकनाथ चिटणीस यांचे पुण्यात निधन 

पद्माविभुषण एकनाथ चिटणीस यांचे पुण्यात निधन 


इस्रोच्या स्थापनेत चिटणीस यांचा मोठा वाटा

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: पुण्यात दिवाळी पाडवा पहाटचा उत्सव. पुण्यातील (Pune News) सारसबागेत दिवाळी पहाट पाडवा. पुण्यातील सारसबाग मध्ये यंदाही पार पडणार दिवाळी पहाटचा (Diwali Pahat 2025) कार्यक्रम. गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत होतो दिवाळी पहाटचा कार्यक्रम. सारसबागेत होणाऱ्या या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता विरोध. धमक्यांना कंटाळून कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी केला होता विचार. पोलिसांकडून (Pune Police) सतर्कता बाळगण्याचे आश्वासन दिल्यानंतर आयोजकांकडून कार्यक्रम घेण्याचा निर्णय. तर सारसबागेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.