Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 19 Nov 2025 06:36 AM
Gadchiroli Politics: गडचिरोलीच्या प्रभाग 11 मधून काँग्रेसचे दोन उमेदवार बाद

गडचिरोली नगर परिषदेत भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात झालेला हायव्होल्टेज ड्रामा चर्चेचा विषय ठरला असतानाच, प्रभाग 11 अ आणि ब मधील काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आज छाननी दरम्यान रद्द झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 11 अ मधून काँग्रेसच्या सुश्मिता उसेंडी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज सोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा पोच पावती न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला आहे. तर प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये किशोर आरेकर यांनी उमेदवारी अर्जावर 5 सूचकाच्या स्वाक्षरी आवश्यक असतानाही त्यांनी कमी सुचकाच्या स्वाक्षरी केल्याने त्यांचा अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. या प्रभागातून दोन काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता थेट लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Live blog updates: बीड नगरपालिके बाहेर भाजपा आणि एमआयएममध्ये मंगळवारी रात्री हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आज उमेदवारी अर्जाची छाननी होती आणि याच दरम्यान रात्री उशिरा भाजपा नेते योगेश क्षीरसागर नगरपालिके बाहेर आले असता त्यांच्यासमोरच एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. एमआयएम आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं यादरम्यान पाहायला मिळालं. आणि दोन्ही समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काही धार्मिक घोषणाबाजी केली. आणि वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. आणि याला जशाच तसे उत्तर भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्याचं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.