- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog: जितेंद्र आव्हाड यांनी MCA अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भरला अर्ज
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. यानंतर राज्याचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंद केले. भारतीय वाघिणींनी उत्कंठावर्धक सामन्यात केली...More
घरांची पडझड नुकसान होवून मदत मिळाली नसल्याने आंदोलक आक्रमक
अँकर
सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील अनेक वस्त्यांमधील घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली होती तसेच घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान ही झाले होते आता दोन महिने उलटून गेले तरीही शासनाकडून मदत न मिळाल्यामुळे परभणी शहरातील भीम नगर, क्रांतीनगर बाबर कॉलनी, जमजम कॉलनी येथील संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे या मोर्चामध्ये नुकसानग्रस्त महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाने तत्काळ अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या घराचे नुकसान भरपाई व एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य ही द्यावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी दिल्यात ‘शेतकरी विरोधी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा
Anchor : भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या निर्देशानुसार प्रत्येक आठवड्याच्या सोमवारला तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविता याव्या यासाठी जनता दरबार भरविण्याची निर्देश देण्यात आले आहेत. सर्व तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाचे अधिकारी या जनता दरबारात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडविण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, मोहाडी तहसील कार्यालयात असलेल्या जनता दरबारात तहसीलदार आणि अन्य कुठलेही जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून तहसील कार्यालय दणाणून सोडलं. नागरिकांचा रोष बघता प्रशासकीय अधिकाऱ्याची चांगलीच धावपळ उडाल्याचं चित्र आज मोहाडी तहसील कार्यालयात बघायला मिळालं.
Byte : अंकुश वंजारी
रायगड : रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवून दिलेय.मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा मुक्काम रायगड मध्ये अजूनही असल्याने शेतकरी राजा मात्र चांगलाच संकटात सापडलाय. हातातोंडाशी आलेली भातशेती कापणी साठी आल्याने या पावसात ही पिके वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी राजा हतबल झालाय. दक्षिण रायगडात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आता शेतातील पाणी बाजूला काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय त्यामुळे एकीकडे चिखल तर दुसरीकडे शेतात साचलेले पाणी यामुळे भातशेती कुजण्याची शक्यता आहे.
बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे वन विभागाचे आदेश
शिरूर जिल्ह्यात दोन बालकांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभाकडून अखेर देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर जिल्ह्यातील पिंपरखेळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षांच्या शिवन्या बोंबेचा मृत्यू झाला होता. तर, 22 ऑक्टोबर 2025 रोजी मौजे जांबूत, ता. शिरुर, जि. पुणे येथे श्रीमती भागाबाई रंगनाथ जाधव, वय ७० वर्षे या महिलेचा वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर काल रोहन विलास बोंबे, वय १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. सातत्याने नागरिकांवर होणाऱ्या बिबट्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जीव घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, त्याला यश येत नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत जाळपोळदेखील केली होती. अखेर तिघांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत एक अनोखी युती आज बाजार समितीच्या निवडणुकीवेळी पाहायला मिळाली.बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) वसंत पवार यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे ( ठाकरे गट ) रतन बोरणारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली..या निवडीसाठी बाजार समितीची विशेष सभा पार पडली.या सभेत सभापतिपदासाठी वसंत पवार व उपसभापतिपदासाठी बोरणारे यांचेच अर्ज विहित मुदतीत दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली..येवला बाजार समितीवर मंत्री छगन भुजबळ, सहकार नेते अंबादास बनकर, माजी आमदार मारोतराव पवार, युवा नेते संभाजीराजे पवार यांच्या गटाची सत्ता आहे..या निवडीपूर्वी मंत्री छगन भुजबळ संपर्क कार्यालयात बैठक होऊन या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते..या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला..
उद्धव ठाकरे आज ‘पप्पू के पापा’ असल्याचं स्वतः मान्य केलं – नवनाथ बन
मतदार याद्यांवरील तक्रार भाजपनं सर्वात आधी केली, पण उद्धव ठाकरे गजनी झालेत
मुस्लिम मतदारांच्या दुबार नोंदणीचा मुद्दा उचलायची हिंमत उद्धव ठाकरे यांच्यात आहे का?
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे फलटणमध्ये दाखल..
श्रीमंत मालोजी राव नाईक निंबाळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चाला फलटण पोलीस स्टेशन कडे जाण्यास सुरुवात
मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाकारली.
शिवसैनिक आणि फलटणकर मोठ्या संख्येत मालवजी राव निंबाळकर पुतळ्यासमोर उपस्थित..
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची संभाजीनगर जिल्ह्याची बैठक संपन्न
महायुती म्हणून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाऊया अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी
अजित पवारांकडून मात्र स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असं कार्यकर्त्यांना आश्वासन
संभाजीनगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ नगरसेवक होते त्यापैकी १ नगरसेवक सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत
मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालय (किल्ला कोर्ट) मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू
वकील मालती रमेश पवार असे त्यांचे नाव असून गुरुवारी ही घटना घडली
वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने आणि कोर्टात मूलभूत वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे.
५९ वर्षीय मालती पवार या फॅमिली कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि इतर स्थानिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ वकील आणि मध्यस्थ म्हणून कार्यरत होत्या
मालती यांन त्रास होऊ लगल्यानंतर उपस्थितांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आल नाही
एका केसची प्रत मिळवण्यासाठी त्या न्यायालयात आल्या असताना. त्याना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या बाररुममध्ये गेल्य होत्या.
बार रुममध्येच तिला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेहण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे
या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टर संघटना आक्रमक होऊन त्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारला आहे
नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी या काम बंद आंदोलनात सहभाग घेतला असून या सगळ्या प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी व्हावी आणि डॉक्टर सुरक्षेचा प्रश्न हा सरकारने गांभीर्याने घ्यावा आणि त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या यासाठी आंदोलन केलं जात आहे
अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवा न्याय रुग्णालयात बंद ठेवण्याचा निर्णय मार्ड आणि इतर डॉक्टर संघटनेने घेतला आहे
या आंदोलनाचा आढावा घेतलाय
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय ते बीटीबी मार्केट पर्यंतच्या मार्गाचं 150 मीटरच्या कामासाठी भंडारा पालिका प्रशासनानं 60 लाखांचा खर्च केला. या रस्त्याची गुणवत्ता दर्जेदार असून दोन वर्षापर्यंत हा रस्ता सुस्थितीत राहील असं, ना हरकत प्रमाणपत्र पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागानं दिलं. मात्र, सहा महिन्यातच हा रस्ता पूर्णतः उघडला असून ठीकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांवरील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली असून त्यातून निघणाऱ्या धुळीच्या कणांमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय ते बीटीबी मार्केट पर्यंतच्या मार्गाचं 150 मीटरच्या कामासाठी भंडारा पालिका प्रशासनानं 60 लाखांचा खर्च केला. या रस्त्याची गुणवत्ता दर्जेदार असून दोन वर्षापर्यंत हा रस्ता सुस्थितीत राहील असं, ना हरकत प्रमाणपत्र पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागानं दिलं. मात्र, सहा महिन्यातच हा रस्ता पूर्णतः उघडला असून ठीकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांवरील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली असून त्यातून निघणाऱ्या धुळीच्या कणांमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू करण्यासाठी मुनी निलेशचंद्र यांचं आमरण उपोषण सुरू
आझाद मैदानात मुनी निलेशचंद्र आमरण उपोषणाला बसले
मुंबईतील कबूतराखाने खासकरून दादरचा कबुतरखाना सुरू करण्यासाठी मुनि निलेशचंद्र आग्रही
पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणी अपडेट
अपघातात तिसऱ्या तरुणाचा सुद्धा मृत्यू
रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कुशवंत टेकवाणी चा मृत्यू
पहाटे ४.५५ वाजता भरधाव वेगात असलेल्या वाहनाचा मेट्रो पिलर ला धडकून झाला होता अपघात
अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने केमिकल आणि तांत्रिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले
तिघांनी मद्द प्राशन केले होते का नाही प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर होणार स्पष्ट
निलेशचंद्र मुनि आझाद मैदानाच्या दिशेने रवाना
मुंबईतील कबुतरखाने सुरू करण्यासाठी मुनी निलेशचंद्र स्वामी पुन्हा आंदोलनाचा पावित्र्यत
आज पासून आझाद मैदानात करणार आंदोलन
रत्नागिरी - रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस
काही भागांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी
कोकणात आणखीन दोन दिवस पावसाचा इशारा
भात पिकासह कोकणातला हापूस आंब्या पिकाला मोठा फटका बसणार
रत्नागिरी - रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस
काही भागांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी
कोकणात आणखीन दोन दिवस पावसाचा इशारा
भात पिकासह कोकणातला हापूस आंब्या पिकाला मोठा फटका बसणार
मधील सहा दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका भातपीक शेतीला बसला आहे. भातपीक शेतीसह भंडाऱ्यात बागायत शेती करणाऱ्या फळबागायतदार आणि फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा चांगलाचं फटका बसला. या परतीच्या पावसामुळं झाडाला लागलेले पेरू आणि फुल काळवंटली असून ते खराब झाल्यानं बाजारात विक्री होणार नसल्यानं याचा आर्थिक फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. तातडीनं पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी आता बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे.
शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी व ठाकरे गटाला मोठा झटका; जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती संजय निमसे यांचा शेकडो शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शहापूर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी सभापती संजय निमसे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
संजय निमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षाला मोठे बळ दिले आहे. या प्रवेशामुळे शहापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी मुरबाड नगरपंचायतीतील भाजपच्या सर्व सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश करून चर्चा रंगवली होती. आता शहापूर नंतर परिसरातील इतर भागातदेखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या प्रवेशामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाला मोठा आत्मविश्वास मिळाला असून, तालुक्यातील सत्ता समीकरणांवर त्याचा थेट परिणाम असल्याच बोलले जात आहे.
शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी व ठाकरे गटाला मोठा झटका; जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती संजय निमसे यांचा शेकडो शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शहापूर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी सभापती संजय निमसे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
संजय निमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षाला मोठे बळ दिले आहे. या प्रवेशामुळे शहापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी मुरबाड नगरपंचायतीतील भाजपच्या सर्व सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश करून चर्चा रंगवली होती. आता शहापूर नंतर परिसरातील इतर भागातदेखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या प्रवेशामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाला मोठा आत्मविश्वास मिळाला असून, तालुक्यातील सत्ता समीकरणांवर त्याचा थेट परिणाम असल्याच बोलले जात आहे.
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आज सुषमा अंधारे फलटण येथे पोलीस ठाण्यामध्ये येणार आहेत. पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान सुषमा अंधारे पोलीस ठाण्यात पोहोचतील. फलटण पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी जमण्याचा आवाहन सुषमा अंधारे यांनी नागरिकांना केलेला आहे
सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत मुख्यमंत्री चिडचिड करत होते, या बैठकीत मोठी खडाजंगी झाली.
सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या व 30 जूनच्या निर्णयावर मी समाधानी नाही.
या आंदोलनात सर्व शेतकरी नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्राम वर एक जुटता दिसली व आगामी काळात ती टिकून राहील.
आगामी काळात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण राज्यात एक मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहोत ज्यामुळे सरकारच्या बुडाला आग लागेल.
मंत्र्यांना कापा या माझ्या वक्तव्याचा सह्याद्री अतिथी ग्रहावरील बैठकीत विषय निघाला त्यावेळेस सरकारमधील लोक मला म्हणायचे तुम्ही जर मंत्री झाले तर तुम्ही कुणाला कापाल...?
आमदार मंत्र्यांना कापा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही मी अजूनही या वक्तव्यावर ठाम आहे जर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही तर नक्कीच आगामी काळात तसं घडू शकतं.
मत चोरीचा मुद्दा खरा आहे मीही लोकसभा निवडणुकीत थोड्याच फरकाने पडलो मात्र त्यावेळेसच मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की सायंकाळी इतकं मतदान कसं वाढल...?
मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
9 जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पाच महिन्यांत गुन्हा दाखल
दुर्घटनेत पाच प्रवाशांच्या झाला होता दुर्दैवी मृत्यू
तर अन्य आठ प्रवासी झाले होते जखमी
प्रवाशांचा बॅग एकमेकांना घासून अपघात झाल्याचा होता मध्य रेल्वचा आतापर्यंत दावा
फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सखोल आणि योग्य दिशेने चौकशीच्या मागणीसाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपायोजना कराव्यात या मागणीसाठी आज राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांचे काम बंद आंदोलन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप राज्यातील विविध डॉक्टर संघटनांनी केला आहे... शिवाय डॉक्टरांच्या सुरक्षितता प्रश्न पुन्हा समोर अल्याच या संघटनांचे म्हणणं आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड त्यासोबतच IMA, अस्मि माझ्या सर्व डॉक्टरांच्या संघटना एकत्र येऊन या आंदोलनात आज सहभागी होणार आहेत. आजच्या काम बंद आंदोलनात अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवा बंद करून काम बंद आंदोलन डॉक्टरांकडून केले जाणार आहेत त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम जाणवू शकतो.
माथेरानची राणीचा प्रवास पुन्हा लांबणीवर... तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळावरील रखडलेले काम यामुळे माथेरानच्या राणीचा प्रवास रखडला.. येत्या 8 नोव्हेंबर पासून हिवाळी पर्यटनाला माथेरान नेरळ मिनीट्रेन सेवा सुरू होण्याचा तयारीत... 8 नोव्हेंबर पूर्वी मालगाडी रेल्वेने होणार ट्रायल चाचणी... सर्वांना माथेरान नेरळ मिनी ट्रेन सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा
पाच ब्ल्यू फ्लॅग समुद्र किनाऱ्यांसाठी 20 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता.
प्रत्येकी 4 कोटी अश्या स्वरूपात निधी मंजूर.
आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यांवर मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारचे एक पाऊल पुढे.
उडपी येथील पादुब्रिदी किनाऱ्यावरील उपलब्ध सोयीसुविधांच्या धर्तीवर कोकणातील समुद्र किनाऱ्यांचा विकास करण्यासाठी संबंधित भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी देणार उडपी येथील पादुब्रिदी किनारपट्टीला भेट.
दापोली मधील लाडघर, गुहागर, श्रीवर्धन, नागाव, पर्णका (डहाणू ) या ब्ल्यू फ्लॅग नामांकन मिळालेल्या किनारपट्टीचा समावेश.
पलूसमध्ये राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव भरवण्यात आलाय. या कृषी प्रदर्शनात दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा हे प्रमुख आकर्षण असून हा महाकाय रेडा पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी देखील होतेय. मुरा जातीचा हा रेडा कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावचा असून घरच्या मुरा जातीच्या म्हैशीपासूनची या रेड्याची पैदास आहे. पलूस मधील कृषी प्रदर्शनात लोकांना या महाकाय रेड्याचे फुकट दर्शन होतेय. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आणि महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे पाच दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेय. या प्रदर्शना दरम्यान दरम्यान महाराष्ट्रतील नामांकित कृषी तज्ज्ञांची शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारी सेमिनार्स देखील पार पडत आहेत.
महिला क्रिकेट विश्वात भारतीय महिलांनी इतिहास रचत प्रथमच विश्वचषक भारताचे नाव कोरले. दक्षिण आफ्रिका संघाला नमवून भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाचा सांगलीत रात्री सामना संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. सांगलीत वेगवेगळ्या भागात क्रिकेटप्रेमी तरुणाई सामना संपल्यानंतर रस्त्यावर उतरून त्यांनी फटके फोडत विजयाचा जल्लोष साजरा केला. रात्री उशिरापर्यंत हा क्रिकेट सामना सुरु होता. तरी सामना संपल्यावर महिला भारतीय संघाचा हा विजयोत्सव सांगलीत साजरा करण्यात आला. या जल्लोषादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यांसाठी पोलीस देखील जल्लोष साजरा होणाऱ्या ठिकाणी उपस्थित होते.
उसाच्या दरावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
साखर कारखानदार आणि सर्व शेतकरी संघटनांना बैठकीचे निमंत्रण
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हालचाली गतिमान
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा दिला आहे इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पहिली उचल 3751 रुपये देण्याची केली मागणी
जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून 3400 ते 3525 अशी पहिली उचल जाहीर
साखर कारखानदारांचा दर मान्य नसल्याने शेतकरी संघटना झाल्या आहेत आक्रमक
छत्रपती संभाजीनगर मधून..जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांवर बेदम मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पहा ..यात एक गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. आणि शिपाई त्याला ही मारहाण करत आहेत.हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात आणि संतापही. या बिचाऱ्या मुलाला त्याच्या वेदना ही सांगता येत नाहीत .. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
वसई : भारताने महिला वर्ल्ड कप जिंकल्यावर वसईच्या शंभर फुटी रस्त्यावर नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. भांडुपला जेमीमा रॅाड्रिग्जच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी… बालमित्रांचा हातात तिरंगा घेऊन जल्लोष.
पुणे - जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली.
पिंपरखेड येथे आज रोहन विलास बोंबे या १० वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले. या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली.
पिंपरखेड येथे अवघ्या १० दिवसात २ लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली असे असूनही राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले असून भरदिवसा माता-भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे. त्यामुळेच आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की, यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जिवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
India vs South Africa Final Women World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) जबरदस्त खेळी साकारली. तिने 87 धावांची आकर्षक खेळी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली. आज सर्वत्र तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे, कारण असा ‘कमबॅक’ प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
India Wins Womens World Cup 2025 : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या फायनलमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) विजय मिळवला आहे. भारतानं नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या विजयात तीन खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली. शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा आणि अमनजोत कौरची फील्डिंग महत्वाची ठरली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर (India Wins ICC Womens World Cup 2025) आपलं नाव कोरलं. सविस्तर वाचा
भारतीय वाघिणींनी उत्कंठावर्धक सामन्यात केली दक्षिण आफ्रिकन टीमचा धुव्वा उडवत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर उमटवली मोहोर. उत्तुंग सांघिक कामगिरीने मिळवलं ऐतिहासिक यश. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा'२०२५ च्या अंतिम सामन्यात टाॅस जिंकत दक्षिण आफ्रिकन महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय रणरागिणींनी धावांचे उद्दीष्ट दक्षिण आफ्रिकन संघासमोर ठेवले. त्यात प्रामुख्याने शेफाली वर्मा ८७, दिप्ती शर्मा ५८, स्मृती मनधाना ४५ तसेच रिचा घोष, जेमिमा राॅड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांना दिलेली खंबीर साथ यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन संघासमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले.त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांनी आफ्रिकन फलंदाजीला खिंडार पाडले आणि इतर भारतीय महिला गोलंदाजांनी त्यांना साजेशी साथ दिली. उत्तम सांघिक कामगिरीने भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा '२०२५ पटकावला. समस्त भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog: जितेंद्र आव्हाड यांनी MCA अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भरला अर्ज