Maharashtra Breaking News LIVE Updates : वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, धनंजय मंडे यांचं मंत्रिपद सोडल्यानंतर पहिलं ट्विट

Santosh Deshmukh Photos in CID Charge Sheet LIVE Updates: क्रूर, निर्घृण, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्याचा पुरावाच आता जणू समोर आला आहे.

प्रिया मोहिते Last Updated: 04 Mar 2025 02:56 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Photo) सीआयडी तपास करत होती. आता सीआयडीनं (CID) दाखल केलेल्या आरोपपत्रातून (Santosh Deshmukh Photos...More

वाल्मिक कराड सारख्याला प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातल्या गेलंय; बच्चू कडू यांची टीका

धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही.. या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं.. कशाप्रकारे या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चालल्या आहे.. पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून सत्ता एवढेच शिल्लक राहिलेला आहे.


हातात तलवारी घ्या आणि कापा.. बलात्कार करा काही करा पण सत्ता आमच्या हाती द्या.. एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध केला पाहिजे.


मारणारा कोणत्या जातीचा होता.. मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा नाही.. ज्या प्रवृत्तीने आणि ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे..


वाल्मीक कराड सारख्याला प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातल्या गेलं.. महाक्रूर दादा या ठिकाणी निर्माण होतो, गुण निर्माण होते आणि त्याला राजाश्रय मिळते हे फार महत्त्वाचा आहे


धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही.. आजारपणाच कारण देऊन दिला असं सांगितलं ही काय प्रवृत्ती आहे? किती लहान पण लोकांना दाखवत आहे तुम्ही मंत्री आमदार आहात मोठेपण घेता आलं पाहिजे.


सरकार एकीकडे प्रभू रामचंद्रच नाव घ्यायचा आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे...