- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र Maharashtra Live Blog Updates: मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास; दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध
Maharashtra Live Blog Updates: मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास; दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
- मंत्री जयकुमार रावल यांनी घडविला इतिहास
- दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध
- नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध
- महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले मागे...
- राज्यातील पहिलीच दोंडाईचा नगरपरिषद संपूर्णपणे झाली बिनविरोध
उमेदवारी अर्ज घेण्याच्या कारणावरून हिमायतनगरमध्ये अजितदादा यांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेत राडा झाला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगरमध्ये गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावीद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट झाली. राष्ट्रवादीच्या वार्ड क्रमांक 9 च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने हा वाद झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा राडा झाला.
अवघ्या महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आजपासून चंपाष्टमी म्हणजेच षडरात्र उत्सवाची सुरवात झालीय. करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते सकाळी श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करण्यात आली. चंपाषष्टी निमित्त जेजुरी गडावर सहा रात्री विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. तर या सहा दिवसात भाविक आपल्या देव्हाऱ्यातील देव खंडोबाच्या भेटीला आणत असतात. उत्सव काळात भाविकांना अडचणी येवू नयेत म्हणून देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर सहा दिवस हा उत्सव चालणार असल्याची माहिती देवस्थानाच्या वतीने देण्यात आलीय.
मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
चारकोप परिसरात फ्रेडी डिलीमा या व्यक्तीवर गोळीबार करून तिन्ही आरोपी फरार झाले होते
यानंतर पोलिसांनी 12 टीम बनून या तिन्ही आरोपींना अटक केली आहे
एक आरोपी मुंबई मधून तर दोन आरोपी पुणे शहरातून अटक केली आहे
मुंबई गुन्हे शाखेची टीम दोन दिवसापासून आरोपीचा पाठलाग करत थेट पुणे मधून दोन आरोपींना अटक केली आहे
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र
‘आमदार अस्लम शेख यांनी मला आणि कुटुंबियांना धमकी दिल्याचा आरोप’
अवैद्य बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई होत असताना आमदार शेख अडथळे आणत असल्याचा आरोप
अतिक्रमण असलेल्या ठिकाणी अवैद्यरित्या वास्तव्य रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचे असल्याचा दावा
सामाजिक सलोखा बिघडवण्याचा अस्लम शेख यांचा प्रयत्न, लोढा यांचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा भेगडेंनी फिरवला. त्यामुळं आज पुण्याच्या लोणावळ्यात आणि तळेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एकत्र येण्याची वेळ आली. असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा. असा इशारा दिल्यानंतर शेळके ही संतापले होते. मात्र आज हे सगळं विसरुन भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केलीये. लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ नगरपंचायत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची त्यांनी घोषणा केलीये. पहिले अडीच वर्षे तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष अन लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष, असा मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही. असा आरोप शेळकेंनी केला अन यानिमित्ताने पवार काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शिक्कामोर्तब केला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मालेगाव च्या डोंगराळे गावात पोहचल्या
पिढीत कटुंबियाची भेट घेण्यासाठी रुपाली चाकणकर पोहचल्या
लहान बालिकेवर आत्याचार करुन खून केल्याने उडाली होती खळबळ
दोषी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची होतेय मागणी
गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीला बिबट्यानं हल्ला करून 10 शेळी आणि बकऱ्या ठार केल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी वनविभागा अंतर्गत येणाऱ्या गराडापार गावात घडली. या घटनेमुळे परिसरातील गावातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सुधाकर पंचभाई यांच्या या शेळ्या असून त्यांनी रात्रीला त्यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात त्या बांधलेल्या होत्या. रात्रीच्या सुमारास शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पंचभाई हे गोठ्याकडे जात असताना त्यांना तिथे बिबट दिसला आणि त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं तिथून धूम ठोकली. पंचभाई यांचं यात हजारो रुपयांचे नुकसान झालं असून पवनी वन विभागानं त्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी होत आहे.
पुणे : गंगाधाम-कात्रज रोडवरील स्वामी समर्थ नगर परिसरातील महावीर चौकाजवळील काकडे वस्तीमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या पथकाने परिसरात दाखल होत अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याची प्रक्रिया सुरू केली. कारवाईदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली असून, पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
छत्रपती संभाजीनगर: जन्म नोंदणीचा दाखला मिळवण्यासाठी खोटी शपथपत्रे, बनावट पुरावे आणि चुकीची माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात २९ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ ऑगस्ट २०२३ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत घडला. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी स्वतः याबाबतची तक्रार दाखल केली आहे
मागील 10 वर्षात भंडारा शहराचा विकास पूर्णपणे थांबला असून भूमिगत गटार लाईनच्या नावावर भंडारा शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवलेय. त्यामुळं रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित होत असल्याची संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली. मागील 10 वर्षात नगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. त्यातील चार वर्षात आलेल्या प्रशासक राजमध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भूमिगत गटार लाईन, पाईपलाईनच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला. यातून भंडारा शहराततील प्रत्येक प्रभागात खड्डे खोदले आणि अद्यापही ते खड्डे जैसे थे असल्याने नागरिकांना त्रास सहन होतोय. 10 वर्षात भंडारा शहराचा विकास खुंटल्याची संतप्त भावना व्यक्त करताना भाजप आणि शिवसेनेचे नाव नं घेता प्रफुल पटेल आणि अप्रत्यक्षरीत्या या दोन्ही पक्षांना चांगलेच सुनावले. भंडारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रफुल पटेल यांची सभा झाली, यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. राज्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असली तरी, नगरपालिका निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर निवडणूक लढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याची मागणी करतानाच सत्तेतील सहकारी पक्षांवर प्रफुल पटेलांनी चांगलेच ताशेरे ओढले.
डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणी पीडित कुतबियांची भेट घेण्यासाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे मालेगाव येथे दाखल झाल्या..हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी संतप्त मागणी ज्योती वाघमारे यांनी केली..ज्योती वाघमारे ह्या प्रतिक्रिया देत असतांना वाघमारे या भावना विवश झाल्या..त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले..
सिंहगड कॉलेज हत्या प्रकरण
अटक केलेल्या आरोपीची सिंहगड पोलिसांनी काढली धिंड
ज्या ठिकाणी केली हत्या त्याच ठिकाणी आरोपीचा उतरवला माज
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या वादातून आरोपींनी केली होती तरुणाची हत्या
एकूण ५ जणांकडून करण्यात आली हत्या
तौफिर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव
तर हत्या झालेला तरुण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची पुणे पोलिसांची माहिती
तर या हत्या प्रकरणातील काही आरोपी हे अल्पवयीन
भाजपचे राजकारण हे पाडापाडीचे आणि अंतर्गत गटबाजीचे आहे. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार आहे. केंद्राच्या योजनेवर आणि कामावर जोर मारायला पाहिजे असा आरोपही माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकमध्ये यवतमाळ नगरपरिषद मध्ये भाजप विरुद्ध मित्रपक्ष शिंदे सेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी युती अशी लढत होत असून जिल्याचा आढावा घेण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी माजी आमदार देवेंद्र भुयार यवतमाळ मध्ये आले होते. यावेळी जनता ही नेत्याच्या वारसा नाही तर कर्तृत्वाच्या आरसा ला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करत भाजप कॉग्रेसच्या घराणे शाही वर टीका केली.
अहिल्यानगर : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अहिल्यानगर जिल्ह्यात राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. कोपरगाव येथील रहिवाशी नगर जिल्ह्यातील मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. शेवटपर्यंत वाट पाहून देखील नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसैनिकांना पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला राजीनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे...
भंडारा जिल्हा न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय भेल प्रकल्पग्रस्तांच्या बाजून दिला असून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरला आहे. मागील 13 वर्षांपासून भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या विकलेल्या जमिनी कसायला, त्यावर उत्पादन घ्यायला न्यायालयाच्या निर्माणमुळं मिळणार आहे. भेल प्रकल्पानं मोठ्या प्रकल्पाचे स्वप्न शेतकऱ्यांना दाखवून भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील 470 हेक्टर शेती अधिग्रहित केली होती. मात्र, 13 वर्षांपासून त्यावर कुठलाही उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना रोजगार, भेल प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिला नाही त्यामुळं भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना उद्योग सुरू होत नाही तोपर्यंत शेती करू द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी न्यायालयात केली होती. यावर प्रकल्पाकडून त्या जागेवर कुठलाही उद्योग किंवा रोजगार सुरू असल्याचं भेल प्रकल्प अधिकारी हे न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळं भेल प्रकल्पाने न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली असून आता त्यांच्या शेतीवर उत्पादन घेण्यास मोकळे झाल्याने आनंद व्यक्त करीत आहेत. भाजप आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात जून महिन्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीत भातपिकांची लागवड करून भेल प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Beed : बीडच्या आष्टी तालुक्यातील विविध भागात बिबट्या आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण, घाटा पिंपरी, माळींबा यासह पाटोदा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. अनेकांनी बिबट्याचा हा मुक्त संचार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. मागील महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते आहे.
डीपीडीसीच्या निधीवरून खासदार प्रणिती शिंदे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप
टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला, खा. प्रणिती शिंदेचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप
महाविकास आघाडीच्या खासदारांच्या निधीतून टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून थांबवला जात असल्याचा गंभीर आरोप
आत्तापर्यंत एवढे पालकमंत्री पाहिले मात्र कोणीही महाविकास आघाडीच्या खासदाराचा डीपीडीसीचा निधी थांबवला नव्हता
मात्र पालकमंत्री जयकुमार गोरेनीं जिल्ह्यातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खा. ओमराजे निंबाळकर त्यानंतर आता माझाही डीपीडीसी चा निधी थांबवला
डीपीडीसीच्या निधीवरून कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा देखील प्रणिती शिंदेनी दिला
दरम्यान प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या आरोपाला आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिलंय
पालकमंत्री जयकुमार गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणे म्हणजे तुमच्या जिभेला हाड नाही हे सिद्ध करताय
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी देण्यात आलं आहे
तुमच्या लेटर पॅडवरील पत्राला निधी मिळत नसल्याने तो राग खा. प्रणिती शिंदेच्या मनामध्ये असल्याने त्यांच्याकडून असे बिनबुडाचे आरोप होत असल्याची आ. देवेंद्र कोठेंची टीका
मनी लाँड्रिंग प्रकरणातील खटला रद्द करण्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी दाखल केली याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी मंगळवारी मुंबई सत्र विशेष न्यायालयात याचिका दाखल केली
मनी लॅन्डरिंग प्रकरणात आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी ,याचिकेत वाझेची मांगणी
अनिवार्य खटल्याची मंजुरी नसल्याचा उल्लेख वाझे यांनी केला
त्यांनी असेही म्हटले आहे की ते बार मालकांकडून गोळा केलेल्या पैशांपैकी एक रुपयाचे लाभार्थी नाहीत.
वाझे यांनी दावा केला की ते "परिस्थितीचा बळी" आहेत
त्यांच्या कथित कृती आरोपी अनिल देशमुखांच्या आदेशांचे पालन करण्याच्या गरजेमुळे प्रेरित आहेत
100 कोटी वसुली प्रकरणात ईडी करत असलेल्या मनी लॅन्डरिंग प्रकरण वाझेची याचिका
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची कामे पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीची कामे गुरुवारी सहा तासांत पूर्ण करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान देखभाल, दुरुस्तीसाठी बंद केली होती
या कालावधीत धावपट्टीची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या
धावपट्टीवरून विमानाच्या चाकाचे तुकडे हटवणे, एअरफील्ड ग्राउंड लाइटिंग सिस्टमची देखभाल करणे, इतर पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची कामे करण्यात आली
मुंबईत सुमारे ३० ते ४० हजार भटके श्वान असल्याची शक्यता
जागेअभावी श्वानांसाठी बहुमजली निवारे उभारावे लागणार
शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे अशा सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या श्वानांना हटवून नियोजित निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले
या आदेशानुसार मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणावर श्वान निवारे उभारावे लागणार आहेत
मुंबईत सुमारे ३० ते ४० हजार भटके श्वान असण्याची शक्यता असून जागेअभावी बहुमजली निवारे उभारावे लागणार आहेत
शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे आणि रेल्वे स्थानके अशा संस्थात्मक क्षेत्रात भटक्या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या ठिकाणाहून श्वानांना हटवून निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबरला दिले होते
मुंबईत सुमारे लाखभर भटके कुत्रे असून त्यांच्याकरीता मुंबई महापालिकेकडे पुरेसे निवारे उपलब्ध नाहीत
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यानं मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधू सोबत न जाता स्वबळावर मुंबईत निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचा पहायला मिळत आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित उतरला पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सोबत असावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असताना पहायला मिळतायत.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलीये. तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहेत, असं असताना बंडखोर आणि आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगर पंचायतींचं समिकरण ठरणार आहे. किती ठिकाणी मविआ आणि किती ठिकाणी महायुती याचं चित्रही आज स्पष्ट होणार आहे. तसंच किती नगर पंचायती या बिनविरोध होणार हेदेखील आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार, तर कुणाचं मन वळवण्यात नेत्यांना यश येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...