- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन
Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Mahamarg) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. कोल्हापुरातील...More
शहापूर : तालुक्यातील सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याचीवाडी व जळक्याचेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी आज धसई येथे एस.टी. महामंडळाची बस अडवून तीव्र आंदोलन छेडले. या मार्गावर बसची संख्या कमी असून प्रवासी संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांना दररोज प्रवासात अडथळा येतो. बसमध्ये चढता न आल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी बससमोर ठिय्या देत आंदोलन केले व या मार्गावर तात्काळ अतिरिक्त एस.टी. बस सुरू करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
भंडारा : ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भंडाऱ्यात ख्रिस्ती बांधवांनी आंदोलन केलं. त्रिमूर्ती चौकात एकत्र आलेल्या बांधवांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. राज्य सरकारनं समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना ख्रिस्ती बांधवांनी याबाबत निवेदन दिलं.
बीड : जपानमधील Cosmo India कंपनी, इंजा फाउंडेशन आणि बीड जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. कंपनीचे संचालक ह्रोदो रयोतो यांच्या हस्ते शिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जपानी कंपनीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे. यावेळी खास तयार करण्यात आलेल्या जपानी क्लास रूमचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. वर्गात इंटरॲक्टिव बोर्डच्या माध्यमातून थेट जपानहून ही भाषा शिकण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ऑनलाईन पद्धतीने जपानमधील शिक्षकांशी संवाद साधला.
बीड : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षकांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज आरोपींना बीड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर पोलिसांच्या ताब्यात आहेत. आज दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता पाच जुलैपर्यंत दोघांचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे.
गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झालेत. भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली यात दोघांचा मृत्यू झाला. तर, गोंदिया जिल्ह्यात देवरी- चिचगड मार्गावर भरधाव कार उलटून दोघांचा मृत्यू झाला. तर कारमधील एक जण किरकोळ जखमी झाला. गोंदिया जिल्ह्यात तिसरा अपघात कोहमारा मार्गावर झाला. यात शिवशाही बसचा झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणारे 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
शेतकऱ्यांकडून धुळे सोलापूर महामार्गावर तासभर चक्काजाम
बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी थांबवली , लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
महामार्ग वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी करून दिला खुला
धुळे सोलापूर महामार्गावर धाराशिव इथ सुरू होतं चक्काजाम आंदोलन
- नागपूर दंगलीतील मास्टरमाइंड असल्याचआ आरोप असलेल्या फहीम खानच्या जमानतीवर 4 जुलैला सुनावणी होणार आहे...यार या प्रकरणात 80 लोकांनी जामिनासाठी अर्ज केला होता.. त्यापैकी काल 63 जणांना नियमित 1 लाखाचा जात मुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
- तेच 5 आरोपींना आंतरिम जामीन देण्यात आला.. 80 पैकी उर्वरित आरोपीना आज जामीनावर सुनावणी होणार आहे..
- 17 मार्च 2025 रोजी घडलेल्या नागपूर दंगलीच्या संदर्भात पकडण्यात आलेल्या आरोपीना कोणी दंगा करताना पाहिले नाही..त्यांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. ते बेकायदेशीर असल्याचं बचाव पक्षाचे वकील अश्विन इंगोले यांनी सांगितलं..
- तेच 4 जुलैला सरकारी पक्षाचा युतीवादानंतर जामीन मिळण्याची शक्यता वकिलांनी व्यक्त केली आहे..
Bhandara News : भंडारा शहरालगत निर्माणाधीन बायपास महामार्गावर साई समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. सोनू पालवे (२३) आणि मृणाल मानवटकर (२५) असं मृतकांचं नावं आहे. मृतक दुचाकीस्वार हे नागपूरकडून साकोलीच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते. यावेळी महामार्गाचं काम सुरू असल्यानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथं उभा होता. पाऊस सुरू असल्यानं दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटला आणि बॅरिकेटिंगला धडकून नंतर दुचाकी ट्रकच्या मागील भागाला धडकली आणि हा अपघात घडला. भंडारा पोलिसांनी अपघातास कारणीभूत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानिचे आंदोलन सुरू आहे परभणीच्या पिंगळी पूर्णा रस्त्यावरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे मागच्या एक तासापासून हे आंदोलन सुरू असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत महत्त्वाचे म्हणजे बच्चू कडू यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी ही आंदोलनात सहभागी झाले आहेत जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात केली आहे.
राज्य शासनाच्या आकस्मित सेवा रुग्णवाहिका सेवा अर्थात 108 रुग्णवाहिका सेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्यातील जवळपास 800 रुग्णवाहिका जागेवरच उभ्या असल्याने अपघात किंवा गंभीर रुग्णांना सेवा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. आकस्मित सेवा रुग्णवाहिकेवरील चालक व डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाला सुरुवात झाली असून यामुळे मात्र 108 रुग्णवाहिका सेवा कोलमडली आहे.
मीरा रोड येथील बालाजी हॉटेलजवळ असलेल्या जोधपूर स्वीट्स या दुकानातील मालक चौधरी यांना केवळ मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून शनिवारी सायंकाळी मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केली.
या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, काशीमीरा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत रविवारी रात्री संबंधित कार्यकर्त्यांविरोधात लेखी तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली आणि शहरामध्ये तणावाची परिस्थिती निमार्ण केली या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक मराठी भाषिक अस्मिता आणि दुकानदारांचे वर्तन यावरून पुन्हा एकदा भाषाविषयक वाद उद्भवले असून, या घटनेमुळे सामाजिक वातावरण तापले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणी अधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे अंबाजोगाई लातूर महामार्गावर रास्ता रोको
कोणत्याही परिस्थितीत जमिनी महामार्गासाठी देणार नाही
शक्तिपीठ महामार्गाला बीड मधूनही मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला रस्त्यावर उतरून विरोध केलाय.
गडचिरोली : गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात कुठे जोरदार तर कुठे रिपरिप पाऊस सुरू आहे. सोमवारी देसाईगंज उपविभागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक लहान नाल्यांना पूर आला असून कुठे पुलावर पाणी तर कुठे रस्ता वाहून गेल्यामुळे तब्बल 6 जिल्हा मार्ग बंद झाले आहे. यामध्ये कुरखेडा- मालेवाडा हा राज्यमार्ग खोब्रागडी नदीच्या पुरामुळे बंद आहे. तर मांगदा- कलकुली, आंधळी नैनपुर, रामगड-उराडी, कुरखेडा-तळेगाव -पळसगाव, कढोली-उराडी हे जिल्हा मार्ग स्थानिक नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून बंद आहे. सोमवारी जिल्ह्यात सरासरी 64.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून देसाईगंज मंडळात 209 तर मुरुमगाव आणि शंकरपूर या 3 मंडळात 130 मिलिमीटर पाऊस झाला. तर 14 महसूल मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज दोन ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव या ठिकाणी वाशिम नांदेड हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वतीने रोखला जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाहीत अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे सरकार जमिनीचा मोबदला देतोय तो तोकडा आहे याशिवाय आमच्या सुपीक जमिनी महामार्गाला दिल्यास आमची पुढील पिढी उपजीविका कशी करणार यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे महामार्गासाठी आम्ही जमिनीची मोजणी होऊ देणार नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
नाशिकच्या पंचवटी भागात असलेल्या बेंडकुळे मळ्यापासून अव्या काही अंतरावर रामवाडी पुलाजवळ पुन्हा काल सकाळच्या सुमारास बिबट्या दिसलाय... झाडीतून बिबट्या बाहेर येऊन रस्ता ओलांडताना भक्षाच्या शोधात असल्याचे दिसले. नंतर बिबट्याने पुन्हा झाडीत धूम ठोकली. बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय... येथे अवघ्या अर्धा किलोमीटरच्या परिसरात दीड महिन्यात चार ते पाच वेळेस बिबट्याचे दर्शन झाले आहे...बिबट्याने दोन वासरांसह तीन ते चार कुत्र्यांना भक्ष बनविले आहे....काल जेथे बिबट्या दिसून आला तेथून सकाळी सात वाजेनंतर विद्यार्थी शाळेत जात असतात. तसेच नागरिकांची रेलचेलदेखील वाढते. येथून जवळच बालाजी बेंडकुळे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते. बेंडकुळे यांनी घराच्या खिडकीतून बिबट्याचे छायाचित्रही टिपले होते. तर त्याच्या अवघ्या दहा दिवस अगोदर 23 मे रोजी बिबट्याने वासराला गोठ्यातून बाहेर काढत फरफटत नेत ठार मारले होते. त्यामुळे या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शेतकरीविरोधाचा धसका ?, धाराशिव मधील शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी पुढे ढकलली
राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांचा धाराशिव दौरा रद्द , जिल्हा प्रशासनाची माहिती
शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार होते धाराशिव दौऱ्यावर
धाराशिव मधील नितळी आणि सूर्डी गावात होणार होती जमीन मोजणी
मात्र राज्यभर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय, त्या पार्श्वभूमीवर आजची मोजणी रद्द झाल्याची शक्यता
महालक्ष्मी रेसकोर्स वर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस, बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून परवानगी
महालक्ष्मी रेसकोर्स येथे नवीन क्लबहाऊस आणि बँक्वेट हॉल बांधण्याच्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) च्या प्रस्तावाला बीएमसीने मान्यता दिली आहे.
घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै २०२४ मध्ये RWITC ला भाड्याने दिलेल्या ९३ एकर जागेपैकी ३२ एकर जमीन प्रकल्पासाठी वाटप केली जाईल.
लेआउट आणि सब डिव्हिजन प्लॅन मंजूर होत असताना, बांधकामासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) आणि मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) यासह अनेक मंजुरी आवश्यक असतील.
रेस कोर्स आर्किटेक्ट्सच्या प्रस्तावित १७,००० चौरस मीटर क्लबहाऊसमध्ये दोन बेसमेंट पार्किंग लेव्हल आणि सात मजले असतील. वरच्या पाच मजल्यांमध्ये १७७ लॉजिंग रूम असतील.
पहिल्या मजल्यावर बेकरी, डिपार्टमेंट स्टोअर, कार्ड आणि टेबल टेनिस रूम, बँक्वेट हॉल, प्ले एरिया, स्विमिंग पूल आणि स्वयंपाकघर असेल.
दुसऱ्या मजल्यावर लायब्ररी, मिनी थिएटर, मीटिंग रूम, फिटनेस सेंटर, रेस्टॉरंट्स आणि अतिरिक्त स्वयंपाकघर जागा असेल.
बँक्वेट हॉल, स्वयंपाकघर आणि पेंट्रीसह दुसरे क्लबहाऊस देखील नियोजित आहे.
क्लबहाऊस प्रकल्पाचा १२० एकर सार्वजनिक खुल्या जागेवर परिणाम होणार नाही, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आला आहे
सहा महिन्यांच्या संपूर्ण रिव्ह्यू नंतर बीएमसीने २७ जून रोजी अंतिम मंजुरी दिली.
Nashik: नाशिकच्या अंबड परिसरात रविवारी प्रशांत भदाणे या 26 वर्षाच्या युवकाचा गाडीचा कट लागला म्हणून खून करण्यात आला होता. दोघा आज्ञातांनी प्रशांतच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्याचा खून केला होता यावेळी नाशिकच्या सिडको परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अंबड पोलिसांनी खुनातील दोघांना अटक करून अंबड सिडको परिसरात त्यांची धिंड काढली. सिडको परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आता पोलिसांनी देखील कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
रायगड जिल्ह्यात काल रात्री काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसाने पेण शहराला चांगलेच झोडपले या मुसळधार पावसात पेण शहरातील विजेचे पोल कोसळल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून रस्त्यावर पडलेल्या विद्युत पोलमुळे वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. पेण शहरातील गुरुकुल शाळेसमोर कोसळलेल्या या विजेच्या तारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लवकरात लवकर हे विद्युत पोल हटवण्यासाठी मागणी होत आहे.
मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाहीच
महापालिका निवडणूक आशिष शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता
निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड
मुंबई अध्यक्ष पदावरून भाजपात रस्सीखेच
प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा
महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक असल्याचे पक्ष नेतृत्वाचे मत
विश्वसनीय सूत्रांची माहिती
विरार : विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्यावर सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसविण्याच्या वादातून लाठी-काठ्याने मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात हितेश कपिलदेव प्रसाद कुमार हे गंभीर जखमी झाले असून, ते भारतीय रेल्वेत एक प्रतिष्ठित शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
हा धक्कादायक प्रकार सोसायटीच्या आवारात घडला असून, दोन जणांनी लाठी-काठ्यांने आणि छोट्या बुक्क्याने त्यांच्यावर बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पीडित अधिकारी हितेश कुमार यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ मधु गराई व समीर मधु गराई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ११८(१) (हिंसक कृत्याचे कट), ११५(२) (प्राणघातक हल्ला), ३५२ (हल्ला व मारहाण), ३५१(२) (धमकावणे) आणि ३(५) (सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा अधिक तपास बोळिंज पोलीस करत आहेत.
शिवसेनेचं सिमोल्लघंन होणार...
राज्याच्या बाहेरही शिवसेनेचा विस्तार केला जाणार
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीत पुढील राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक दिल्लीला घेण्याबाबतचे वक्तव्य करत, पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिले संकेत
शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा या अनुशंगाने पक्षातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत
महाराष्ट्र राज्याबाहेर २३ राज्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि संघटना ही कार्यरत आहेत
यातील राजस्थानमध्ये ३ आमदार हे शिवसेनेचे आहेत
या शिवाय नागालंड, त्रिपुरा, पंजाब, मनिपूर येथील काही आमदार व छोटे पक्ष शिवसेनेसोबत येऊ इच्छित आहेत
त्यामुळेच महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपसोबत राज्याबाहेरही शिवसेना सोबत येऊ पाहणार्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पक्षातील नेते विचार करत आहेत
या पुढे शिवसेना पक्ष स्व हिंदुह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाकडच्या १९९९ सालाच्या पक्षीय घटनेला प्रमाण माणून पुढील वाटचाल करणार असल्याचे एकमतही शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीत बैठकित ठरले
सर्वत्र मान्सून दाखल झाल्यानं आजपासून राज्यातील विविध भागातील व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांच्या प्रजननाचा काळ असतो आणि याकाळात वन्य प्राण्यांना पर्यटकांकडून कुठलाही त्रास पोहचू नये याची खबरदारी म्हणून या जंगल सफरीला बंद करण्याला प्राधान्य देण्यात येतं. यासोबतचं जंगलातील रस्ते हे कच्चे असल्यानं वाहनं अडकण्याची शक्यता असते. त्यामुळं व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं घेतला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उमरेड - पवनी - करांडला व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प या तीन व्याघ्र प्रकल्पासह विविध भागातील व्याघ्र प्रकल्पही आता बंद करण्यात येत आहेत. दरवर्षी १५ जूनला व्याघ्र सफारी बंद होत होती. मात्र, यावर्षी मान्सून १५ दिवस उशिरा दाखल झाल्यानं जंगल सफारी १५ दिवस पुढं वाढविली होती.
गोंदिया : जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. रात्रीपासून आज सकाळी सुद्धा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी सुखावला असून ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी धान पिकाच्या रोवणी कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये दिसू येते. एकंदरीत येणारा पाऊस हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
महाराष्ट्र शासनाने हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात कर वाढ केल्याने, या झिझीया करवाढी विरोधात हॉटेल व्यावसायिकांनी एकजूट होत आक्रमक भूमिका घेतली आहे. आज वसई तालुका हॉटेल असोसिएशनच्या वतीने महत्वाची बैठक झाली. या बैठकीत हॅाटेल व्यवसायासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येवून, करवाढीविरोधात आक्रमक भूमिका देण्याचे मान्य करण्यात आलं. या बैठकीला वसई विरार मधील दोन हजारच्या वर व्यावसायिक उपस्थित झाले होते.
सध्या महाराष्ट्र शासनाने मद्य उत्पादन शुल्कात (excise duty), ६० टक्के ने वाढ केली आहे. व्हॅट मध्ये ५ टक्के वरुन १० टक्के वाढ करण्यात आली. तसेच वार्षिक परवाना फी दरवर्षी १० टक्के वाढ होत असताना आता सरळ १५ टक्केनी वाढ करण्यात आली. त्यामुळे याचा थेट परिणाम अधिकृत रित्या हॉटेलच व्यवसाय करणा-या हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे. दारुचे रेट वाढल्याने, सामान्य ग्राहक हॉटेलवर बसण्यास पसंती देणार नाहीत. हॉटेल व्यवसायावर निर्माण झालेल्या या संकटांची दखल प्रशासनाने घ्यावी, यासाठी पुढील दिशा या बैठकीत ठरवण्यात आली.
वसई तालुका होटल असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, सरकारच्या या टॅक्स वाढीच्या निर्णयामुळे अधिकृत व्यवसायांवर अन्याय होत असून, या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन उभं केलं जाईल.
- 3 मुलांच्या मृत्यू प्रकरणी दाखल गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी घेतला मागे
- बांधकाम व्यावसायिक विजय शेखालिया आणि कंत्राटदार आकाश गायकवाडवर फक्त निष्काळजीपणाचा ठपका
- सोमवारी दुपारी दाखल केलेल्या गुन्ह्यात आडगाव पोलिसांनी सायंकाळी केला बदल
- बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात आढळून आले होते मृतदेह
- मृतांमध्ये साई जाधव, साई गरड आणि साई उगले या तिन्ही मुलांचा समावेश
- तिन्ही मुलं पोहण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज
- ग्रामस्थांनी केला होते ठिय्या आंदोलन, आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू
राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतेच मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला
आधीच वेगवेगळे शुल्क वाढवलेले असताना हॉटेल व बार व्यावसायिक आणि ग्राहक चिंतेत आहेत.
पुन्हा उत्पादन शुल्कात अचानक मोठी वाढ केल्यामुळे हॉटेलसह ग्राहकांवर परिणाम होत असून याचा फटका पर्यटन क्षेत्रालाही बसतोय
असे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) चे म्हणणे आहे.
त्यामुळे ही शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा हॉटेल आणि बार बंद ठेवत, या अधिवेशन काळात आंदोलन करणार आहेत
शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात विरोध वाढला
महामार्ग रद्द करावा यासाठी 10 गावांनी घेतले ठराव , उर्वरित नऊ गाव दोन दिवसात ठराव घेणार, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची माहिती
शक्तिपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावर आणि संविधानिक लढाई सुरू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या दौऱ्यानंतर विरोधाची धार वाढली
राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आज धाराशिव जिल्ह्यात
नितळी आणि सुर्डी गावात मोजणीचा कार्यक्रम, शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता
बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलात अल्पवयीन मुलीचा शिक्षकांकडूनच लैंगिक छळ करण्यात आला.. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन शिक्षकां विरोधात गुन्हा दाखल असून दोन्ही शिक्षक अटकेत आहेत. दरम्यान सदर प्रकरणाबाबत आणखी कोणी पीडित असेल किंवा कुणाला काही माहिती पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षक अथवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. माहिती व पुरावे सादर करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कींच्या विरोधात 442 तक्रारी
वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी उपोषण सुरू, तोडगा निघेना
आठ शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचे उपोषण
दुसरीकडे वाशी तालुक्यातीलच पारा गावात 12 ते 15 शेतकऱ्यांची चेक बाऊन्स
शेतात पवनचक्कीचे टॉवर उभे राहिलेला मावेजाचे चेक, 45 लाख किमतीची चेक बाऊन्स
पवनचक्कीचे जे ठेकेदारांनी चेक दिले त्यांचे फोन लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार
मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी पार पडेल. भेगडे हे 1972 मध्ये मावळ विधानसभेतून जनसंघाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. मग 1977 ला त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर ते 1978 ला पुन्हा ते विधानसभेवर निवडून आले होते. 2000 साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. विधानसभा आणि विधानपरिषद असं चार टर्म आमदार राहिलेले भेगडे निृवृत्त झाले. अखेरपर्यंत ते शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले.
त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता ५ जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत. ठाकरे येत आहेत अशी टॅगलाईन देत शिवसेनेनं पोस्टही केलीय. या मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. त्यापैकीच महत्त्वाची बैठक आज मुंबईत वरळीतल्या एनएससीआय डोम इथे होणार आहे. शिवाजी पार्क किंवा डोम इथे हा मेळावा होण्याबाबत मंथन सुरू आहे. मात्र एनएससीआय डोम इथे मेळावा घेण्यावर एकमत झाल्याचं समजतंय. आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वत:त सहभागी होणार आहेत.शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन