एक्स्प्लोर

Shaktipeeth Highway : शक्तिपीठवरुन बीडमध्ये घमासान, मोजणीसाठी आलेले अधिकारी-पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी, शेकापचा आरोप

Shaktipeeth Expressway : गरज नसताना शक्तिपीठ महामार्गाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे या महामार्गासाठी जमिनी देणार नाही अशी भूमिका बीडमधील शेतकऱ्यांनी घेतली.

बीड : वर्धा ते गोवा दरम्यान होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी त्याला ठिकठिकाणी विरोध होत असल्याचं चित्र आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका बीडमधील शेतकऱ्यांनी घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान, अंबाजोगाईमध्ये मोजणीसाठी आलेले अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना अरेरावी केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला. 

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात आज शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी करण्यात आल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आला.

राज्य सरकार जर महामार्गासाठी बळजबरीने जमिनी घेतल्या जात असतील तर आम्ही हे होऊ देणार नाही. गरज नसताना शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आला आहे.

Beed Farmers On Shaktipeeth : जमीन न देण्याची बीडमधील शेतकऱ्यांची भूमिका

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला बीड मधील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध केला.अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला.

दरम्यान पोलिस बंदोबस्तात ही मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला. यालादेखील शेतकऱ्यांनी विरोध करत जमीन न देण्याची भूमिका कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. याआधी एप्रिल महिन्यातदेखील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता.

Shaktipeeth Expressway Land Acquisition : शक्तिपीठसाठी भूसंपादनाला मंजुरी

वर्धा ते गोवा दरम्यान होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवल्यानं कॅबिनेटमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. प्रामुख्यानं कोल्हापुरातील मंत्री म्हणजे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला. 

शक्तिपीठ महामार्गाच्या निर्णयामुळे विधानसभा आणि लोकसभेत महायुतीला फटका बसल्याची आठवण या दोन्ही मंत्र्यांनी करून दिली. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या निर्णयामुळे फटका बसू शकतो अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवल्याचं कळतंय. मात्र महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम आहे. दरम्यान महामार्गाला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे. 

Solapur Protest Against Shaktipeeth Highway : सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला तीव्रविरोध केला. शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. दरम्यान विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे धाराशिवमधील शेतकऱ्यांचाही शक्तिपीठ महमार्गाला विरोध आहे. सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप धारशिवमधील शेतकऱ्यांनी केला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित
Ind Beat Aus Womens World Cup : भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया हरवत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक
Abu Azmi : वंदे मातरम् वरून पुन्हा वाद, अबू आझमींच्या विधानाने राजकारण तापलं Special Report
Powai Hostage Crisis: पवईत थरार, स्टुडिओत १७ मुलांना ओलीस; आरोपीचा एन्काऊंटर Special Report
MVA Morcha Meeting : मोर्चासाठी एकी, बैठकीत बेकी? विरोधकांचं प्लॅनिंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Embed widget