MLC Election Result LIVE UPDATE : अमरावतीत अपक्ष किरण सरनाईक विजयी.

विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासह (Maharashtra Legislative Council's graduate and teacher constituencies) धुळे नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणकीची मतमोजणी आज होत आहे.पदवीधर आणि दोन शिक्षकनिवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Dec 2020 09:15 PM

पार्श्वभूमी

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले. राज्यात पुणे पदवीधर...More

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाला धक्का देत वाशीम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.

अमरावती विधान परिषद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे, अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी शेवटपर्यंत लढत दिली.