दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो


स्मार्ट बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार | एबीपी माझा

१. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाला खासगीकरणावर भर देण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती, संपकरी कामावर न आल्यास भरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवार सेवेत, परिवहन मंत्र्यांचा इशारा
संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आंदोलक एसटी कर्मचारी कामावर परत न आल्यास  नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिलेत. अगोदरच्या भरतीच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं, अनिल परब यांनी म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी अद्याप फुटलेली नाही. आंदोलक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळं आता राज्य शासनाकडून वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी हे मोठं विधान केलंय.  २०१६-१७ आणि २०१९ मधील भरतीतील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची यासाठी चाचपणी सुरू आहे, असं अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंयय.  दरम्यान, 2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. 
 
२. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह 30 दिवसात हजर न झाल्यास मालमत्तांवर टाच येणार, परमबीर यांच्या पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रातल्या प्रॉपर्टींचा पंचनामा माझावर
 
३. समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; कास्ट सर्टिफिकेटची स्क्रूटनी कमिटीकडून पडताळणी होणार

४. आठवड्याभरानंतर अमरावतीतल्या संचारबंदीतील शिथिलतेत बदल, जीवनावश्यक वस्तू आणि कृषी दुकानं उघडण्याच्या वेळेत वाढ, इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता

५. मुसळधार पावसामुळे तिरुपतीत हाहाकार, तिरुमाला डोंगरावरुन वाहणाऱ्या, तिरुपती-हैदराबाद मार्गावर वाहतुकीसाठी अडथळे

६. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात अवकाळीचा मारा, द्राक्ष, कांदा, स्ट्रॉबेरी, गहू पिकांचं नुकसान, हिवाळाही लांबला

७. कळव्यात म्हाडा उभारणार सर्वात मोठा गृह प्रकल्प, तब्बल 29 हजार घरे बांधणार

८. आज शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, 580 वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रग्रहणाची खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता, भारतात ग्रहणाचा कालावधी साडेतीन तास

९. भारताच्या Covaxin अन् Covishield ला 110 देशांची मान्यता; इतर देशांमध्येही मान्यतेसाठी केंद्राचे प्रयत्न

10. भारत आणि न्यूझीलंड संघात आज दुसरा टी-20 सामना, विजयासह मालिका खिशात घालण्यासाठी रोहितसेना सज्ज