Maharashtra Krushi Day 2022 : आज 1 जुलै आहे. हा दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या कृषी दिनानिमित्त महाराष्ट्राचे नव नियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करुयात असे ट्वीट करत त्यांनी कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  
ट्वीटमध्ये काय म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी


महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम-सुफलाम व्हावा, यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनही त्यांनी केलं आहे. हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो.  महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम-सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान


भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन 1 जुलै हा दिवस 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषी दिन साजरा करण्याचा निर्णय हा 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला होता. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा केला जातो. 
 
देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे. त्यांना राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं. 


महत्वाच्या बातम्या: