मुंबई: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली असली, महाराष्ट्र राज्य किसान सभा मात्र संपावर अजूनही ठाम आहे.

संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही, असं महाराष्ट्र किसान सभेने म्हटलं आहे.

साडेबारा ते साडेचार, 'वर्षा'वर नेमकं काय घडलं?

"संपूर्ण चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं, सदस्यांची दिशाभूल केली आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी गोलमाल उत्तरं दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारं आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही", असं महाराष्ट्र किसान सभेने म्हटलं आहे.

तरी तिकडे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतलेला नाही.

नाशिकमधील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेण्यास नकार दिला आहे. आम्ही आमचा निर्णय स्वत: घेऊ असं त्याचं म्हणणं आहे. आज अकरा वाजता कोअर कमिटीची बैठक आहे, त्यात संपाबाबत निर्णय होणार आहे.

संबंधित बातम्या

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक 

साडेबारा ते साडेचार, 'वर्षा'वर नेमकं काय घडलं?