विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच विजय यांना ऑलिम्पिकसाठी देखील मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला चौधरींचा अभिमान असल्याची भावना यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवली. नियम करावे लागल्यामुळे घोषणेनंतर वेळ गेल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
माझा कट्टा :
12-12 किलोचे डंबेल्स, गळ्यात 20 किलोची साखळी, विजय चौधरीची मेहनत
गेल्या दोन वर्षांपासून विजय चौधरी नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे विजय चौधरींना अखेर न्याय मिळण्याची आशा आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला. पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीनं अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला. या विजयासहच विजय चौधरीनं नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.
'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीबद्दल माहिती :
- विजय चौधरी 2014 आणि 2015 साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळण्याचा आणि तो जिंकण्याचाही अनुभव होता. यावेळीही त्या अनुभवाच्या आधारे खेळत सलग तिसऱ्यांदा विजयने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब आपल्या नावावर केला.
- वय - 28 वर्षे
- उंची - 6 फूट 2 इंच
- वजन - 118 किलो
- धूमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र
- प्रशिक्षक - रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे आणि अमोल बुचडे
- मुख्य वैशिष्ट्यं - संयम, बचाव आणि प्रतिहल्ला ही खेळाची वैशिष्ट्यं