Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Elections) शिंदे-भाजप (Shinde Group-BJP) गटाने विजय मिळवला. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या घोषणा देत असताना भाजप-शिंदे गटासोबत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने चक्क 'अजितदादा पवार तुम आगे बढो' अशा घोषणा दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. काय घडलं नेमकं?


 


भाजप-शिंदे गटाच्या विजयात अजित पवारांसाठी घोषणाबाजी?
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव झाला. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होता. या विजयाचा भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. मात्र यावेळी भाजप शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या गराड्यातून संजय पवार या कार्यकर्त्याने 'अजित दादा आगे बढो' अशी घोषणाबाजी केली, विजय भाजप शिंदे गटाचा आणि घोषणाबाजी अजित दादा पवार यांची? यामुळे विविध चर्चांना उधाण आले.  



'या' घोषणेला शिंदे व भाजप गटाच्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
राष्ट्रवादी पक्षाचे संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांची महाविकास आघाडी सोडून, भाजप-शिंदे गटाकडून जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा सर्वाधिक मताधिक्क्याने विजय झाला, या विजयानंतर संजय पवार यांनी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासोबत 'अजित दादा पवार तुम आगे बढो' अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या घोषणेला शिंदे व भाजप गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विजय भाजप शिंदे गटाचा आणि घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या नेत्याची? अशा चर्चा यावेळी रंगल्या होत्या.


एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग


जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं विजय मिळवला आहे. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा  मिळाल्या आहेत. 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


12th December Headlines : भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅली; आज दिवसभरात