Jalgaon News : जळगाव (Jalgaon) शहरातील आर. एल. ज्वेलर्स येथे मंगळवारी सीबीआय कडून (CBI) छापेमारी करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र नेमकी कोणत्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे? चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.


 


20 ते 25 जणांचे सीबीआयचे पथक जळगावात दाखल
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस ते पंचवीस जणांचे सीबीआयचे पथक जळगावात दाखल झाले आहे. सराफ बाजारातील आर एल ज्वेलर्स येथे सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे, चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून मोठी गोपनीयता पाळली जात आहे. चौकशीसाठी आलेले अधिकारी सीबीआयचे अधिकारी असल्याची सूत्रांची माहिती सांगण्यात येत असलं तरी याबाबतचा कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तर आर एल ज्वेलर्स यांनी सुद्धा माहिती देण्यास नकार दिला आहे, एकीकडे चौकशी सुरू असताना दुसरीकडे ज्वेलर्स दुकानात मात्र ग्राहकांची ये-जा सुरू होती. 


 


सुवर्णनगरीत चर्चांना उधाण
नेमकी कोणत्या प्रकरणात आणि काय चौकशी केली जात आहे? यावर बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.  त्यामुळे नेमका तपशील कळू शकलेला नाही. चौकशीसाठी आलेले पथक हे  सीबीआयचे सांगितले जात असले तरी इन्कम टॅक्स संबंधित प्रकरणाची चर्चा सराफ बाजारात होती. मात्र चौकशीमुळे जळगावाचे सुवर्ण नगरीत चर्चांना उधाण आले असून अजून कोणा कोणा कडे ही छापेमारी होणार या बाबत ही चर्चा रंगू लागल्या आहेत


 


इतर महत्वाच्या बातम्या


14th December Headlines: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत, पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात