मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक जाहीर झालंय. तसंच यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्ध्या तासाचा अधिक वेळ देण्यात आला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमामुळं विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे. त्यामुळं तीन तासांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात येणार आहे. 


ॲानलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम तर झालाच शिवाय त्यांचे हस्ताक्षरं खराब होण्यावर देखील झाला आहे. शिवाय पेपर सोडविण्याची देखील सवय मोडली आहे. अधिक स्पष्ट करून सांगायचं तर 80,90 आणि 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकांसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. 50, 60आणि 70 गुणंच्या प्रश्नपत्रिकांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 26 हजार 960 विद्यार्थी तर दहावीसाठी 15 लाख 27 हजार 762  विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे पेपर लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांच वेळापत्रक आज बोर्डाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच पद्धतीने ७५ टक्के अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे.शाळेत असताना शिक्षक तोंडी सांगून विद्यार्थी भराभर लिहीत असत. शिवाय फळ्यावर लिहिलेलेदेखील ठरावीक वेळेत लिहावे लागत असे. गृहपाठ असल्याने घरीही लिखाण होत होते. परंतु वर्षभरात असे लिखाण 20 टक्क्यावर आल्याने विद्यार्थ्यांची सवय मोडली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :