Maharashtra Board HSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (HSC Result 2023) कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. अशातच आज बोर्डाकडून बारावीच्या निकाल जाहीर (12th Result) करण्यात आला आहे. आज 25 मे 2023, गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज अकरा वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. तसेच, विभागनिहाय टक्केवारीही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. आज दुपारी 2 वाजता बारावीचे विद्यार्थी निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com वेबसाईटवरही विद्यार्थी आपला निकाल अगदी सहज पाहू शकतील. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असतील तर त्यासाठी 26 मे ते 5 जूनपर्यंत बोर्डाकडून मुदत देण्यात आली आहे.
Maharashtra HSC Result 2023 Date : कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, गुरूवारी 25 मे रोजी रोजी जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट mh12.abpmajha.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
'एबीपी माझा'च्या वेबसाईटवर झटपट निकाल पाहण्यासाठी काय कराल?
एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
निकालासंदर्भातील सर्व अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'चा लाईव्ह ब्लॉग पाहा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI