Maharashtra HSC Result 2022 : राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा देखील राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. नागपूरच्या अर्कजा देशमुख या विद्यार्थीनीने डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर महाविद्यालयात पहिला नंबर मिळवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अर्कजा हिच्या वडिलांचे निधन झाले. घरातील कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभा राहिले. परंतु, या सर्व आव्हानांचा समाना करत कुटुंबाला सावरत अर्कजा हिने अभ्यास केला आणि कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवला.  


अर्कजाने विज्ञान शाखेत 600 पैकी 578 म्हणजेच 96.33 टक्के गुण मिळविले आहेत. ती शिकत असलेल्या नागपूरमधील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून ती पहिली आली आहे.  


अर्कजाची बारावी सुरू झाल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीलाचा कोरोनामुळे तिच्या वडिलांचे निधन झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 13 मे 2021 रोजी अर्कजाचे वडील संजय देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्कजाने आपल्या आई आणि कुटुंबाला सावरले. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्मा झाले, परंतु, अशा परिस्थितीत न डगमगता अर्कजाने अभ्यासाला सुरुवात केली.  
 
आईने सावरले कुटुंब 
अर्कजाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईने खासगी नोकरी सुरू केली. नोकरी आणि अर्कजाच्या मदतीने आई कुटुंबाचा गाडा चालवत आहे. अर्कजाला एक लहान भाऊ असून तो देखील अभ्यासात हुशार आहे. 


गणितात पैकीच्या पैकी गुण
गणित हा अर्कजाच्या आवडीचा विषय आहे. या विषयात तिने 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. पुढे  आपल्याला इंजिनियर व्हायचे आहे, अशी माहिती अर्कजाने दिला आहे.  


अर्कजाला मिळालेले गुण 
गणित : 100
इंग्रजी : 85
फिजिक्स : 97
Chemistry : 98
इलेक्ट्रॉनिक्स : 198


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहा. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.


कसा चेक कराल आपला निकाल


स्टेप 1 - https://marathi.abplive.com//amp वर लॉन ऑन करा


स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा


स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका


स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा


स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 


स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा