राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...   


शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर, उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले? 


 शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल  यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेला निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितला. शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं. असा ठराव आम्ही आज पारित केला आहे. आम्ही हा ठराव घेऊन पवारांना भेटायचा प्रयत्न करु. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येतं असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत", असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.  वाचा सविस्तर


एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, हवामान विभागाची माहिती 


राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची (unseasonal rains) हजेरी लागत आहे. यावर्षी तर उन्हाळ्यात पावसाळा सुरु असल्याचे चित्र जाणवत आहे. कारण राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार एप्रिल (April) महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.  वाचा सविस्तर


राज्याच्या विविध भागात अवकाळीचा कहर, शेती पिकांना मोठा फटका; तर वादळी वाऱ्यामुळं कार्यक्रमात अडथळा 


राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. वाचा सविस्तर


उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, रानतळेमध्ये सभा घेण्याचं होतं नियोजन 


 बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery)  सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत  मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते  वाचा सविस्तर


कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार


 ऐन उन्हाळ्यात  कल्याण - डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्याबाबत  (Kalyan Domibvli Water Cut News) मोठी बातमी समोर आली आहे. पुढील तीन महिने  येत्या सोमवारी  आणि मंगळवारी  पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.  त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे  वाचा सविस्तर