राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Sharad Pawar Retirement: शरद पवारांनी निर्णय कायम ठेवला तर, राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? 'ही' दोन नावं चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अन्य कुणाकुणाची पदं बदलणार, नक्की कुणाला महत्त्वाची जबाबदारी मिळणार तर कुणाला अडगळीत टाकलं जाणार, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण जो कुणी नवा किंवा नवी अध्यक्ष होईल, त्या व्यक्तीकडून पक्षात मोठे बदल करणं अपेक्षित असेल. कारण लोकसभा निवडणुकीला एक वर्षंही राहिलेलं नाही. विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर आली आहे. तर चारच महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते आणि किती खोलवर बदल होतात ते आता पाहावं लागेल. वाचा सविस्तर
रस्ते वेगाने बांधण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. आहेत. राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर देण्यात येणार आहे. परिणामी खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होण्यास मदत होणार आहे वाचा सविस्तर
शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय; भाजप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party-NCP ) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष राजकीय गणितं सोडवण्यात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय म्हणजे. राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणं घाई होईल, असं फडणवीस म्हणाले. वाचा सविस्तर
काकानं जीवाचं रान केलं, पण... पुतणीला वाचवण्याच्या नादात काकाचाही विहिरीत बुडून मृत्यू
विहिरीत पडलेल्या आपल्या पुतणीला वाचविण्यास गेलेल्या काकाला पुतणीने पाण्यामध्ये घट्ट मिठी मारल्याने काका-पुतणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ (Sangli News) तालुक्यातील अग्रण धुळगाव गावात घडली आहे. मनोज भास्कर शेसवरे (वय 43) आणि सौंदर्या वैभव शेसवरे अशी मृतांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. काका-पुतणीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. वाचा सविस्तर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधील वेश्याव्यावसायाचा पर्दाफाश; 3 दलाल अटकेत
मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यातच पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणून कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमधून 3 दलालांना अटक केली आहे. वाचा सविस्तर