राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
विधाानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला. महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिला आहे. (वाचा सविस्तर)
सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ; परभणी जिल्ह्यातील घटना
सेप्टिक टॅंकची (septic tank) सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू (workers died) झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टॅंक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (वाचा सविस्तर)
विधानसभा अध्यक्षांसाठी 'ती' योग्य वेळ म्हणजे नेमकी किती? दाव्या प्रतिदाव्यांमध्ये कायदा काय सांगतो?
सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत काल निकाल तर दिला. पण या निकालानं प्रश्न सुटण्याऐवजी काही नवीन प्रश्न निर्माणही झालेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष नेमकं किती वेळात निर्णय देणार याचा....त्यावरुन जोरदार दावे सुरु झाले आहेत. अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांकडे तर सोपवला पण तो सोपवताना योग्य वेळेत निर्णय घ्या असं म्हटलं आहे. ही योग्य वेळ म्हणजे नेमकी किती यावरुन सध्या जोरदार दावे प्रतिदावे होताना दिसत आहेत. (वाचा सविस्तर)
राज्यात तापमानाचा पारा वाढला, पुढील तीन दिवस मुंबईसह कोकणात उष्णतेमुळं अस्वस्थता जाणवणार
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावत आहे. सध्या राज्यातील तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे (वाचा सविस्तर)
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा लम्पी स्कीनचा प्रसार, तीन जनावरं दगावली, शेतकरी चिंतेत
संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रातही थैमान घातलेल्या लम्पी स्कीनच्या आजारानं (Lumpy Skin Disease) पुन्हा डोकं वर काढलं आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. लम्पी स्कीनमुळं एक महिन्यात चिखली येथील तीन जनावरे दगावली आहेत. त्यामुळं गोदिंया जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.