मुंबई : राज्यात सुरु असलेल्या मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोर्चांच्या आयोजकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. तसंच मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीसमूह बनवण्याचा प्रस्तावही मांडल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


सरकारने मांडलेल्या प्रस्तावित मंत्रीसमुहात एक मंत्री आणि दोन विरोधी पक्ष नेते असतील. हा मंत्रीसमूह मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा पातळीवरील आयोजकांशी चर्चा करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ही चर्चा केली जाईल.

सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी लवकरच चर्चा करणार आहे. मराठा समाजाचे मूक मोर्चे संपल्यावर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हा मंत्रीसमूह मराठा नेत्यांशी चर्चा करणार आहे, असंही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.