Maharashtra Farmer : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतकऱ्यांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण राज्याकडून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी केला आहे. 


अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा महाविकास आघाडीचा हात दिला आहे. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे.  शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे.  ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के मदतनिधीप्रमाणे मंजूर 2860 कोटींपैकी 502.37 कोटी रूपये (मराठवाड्यात सर्वाधिक) निर्गमित झाले आहेत.


नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. शेतकऱ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.  यापूर्वी सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे


केंद्र शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी


शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी केला आहे. पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये विमा कंपन्यांना कंपन्याकडे वर्ग करण्यात आलेत. त्यामुळे काही अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे दिसते.  


कोणत्या विमा कंपनीला किती रक्कम
रिलायन्स कंपनीला 165 कोटी 58 लाख 


इफ्को कंपनीला 161 कोटी 99 लाख 


एचडीएफसी ला 116 कोटी 20 लाख 


भारती एक्सा 92 कोटी 24 लाख 


बजाज अलायन्स ला 107 कोटी 62 लाख 


भारतीय कृषी विमा कंपनीला 254 कोटी 92 लाख