महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2021 | बुधवार | एबीपी माझा
2. नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची वेळ, मेहेरच्या रकमेची माहिती दिली
Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांचा 'सिलसिला' सुरुच आहे. आज सकाळी सकाळी नवाब मलिकांनी पुन्हा ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गुरुवार 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांच्यात लोखंड वाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे निकाह पार पडला. मेहेरची रक्कम रु.33000 होती. साक्षीदार क्रमांक 2 हा समीर दाऊद वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेचा अजिज खान पती होता, असा दावा मलिकांनी केला आहे. सोबतच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे, असं मलिकांनी म्हटलंय.
3.आर्यन खानच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी, आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचा वकील रोहतगींचा युक्तिवाद
4. किरण गोसावी यांचा पुणे पोलिसांना पुन्हा एकदा गुंगारा, उत्तर प्रदेशातूनही फरार झाल्याची माहिती
5. तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यात फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जणांची प्रकृती गंभीर
6. चिमुकल्यांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण दृष्टीक्षेपात, मुंबईत सात वर्षांखालील मुलांवर लशीची यशस्वी चाचणी, लस देण्यात आलेली मुलं ठणठणीत
7. काल दिवसभराच्या लपंडावानंतर पुण्याच्या हडपसरमधील बिबट्या रात्री जेरबंद, सीरम इन्स्टिट्यूटजवळ बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी
8. किलो क्लास पाणबुडी संदर्भातील गोपनीय माहिती गहाळ, मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये कार्यरत कमांडरसह दोघांना अटक, सीबीआयच्या नोएडा, दिल्ली, हैदराबादमध्येही धाडी
9. वर्णद्वेषीविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉकचा नकार, विंडीज विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या क्षणी माघार
10. पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा केला पराभव, तर दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर विजय